Blood Pressure: उच्च रक्तदाबामुळे किडनीचे होऊ शकते नुकसान ? या टिप्सचा करा वापर

उच्च रक्तदाबामुळे किडनीच्या आसपास असलेल्या रक्तवाहिन्या कडक होतात किंवा आकुंचन पावतात. त्यामुळे किडनीपर्यंत पुरेसे रक्त पोहोचू शकत नाही.

Blood Pressure: उच्च रक्तदाबामुळे किडनीचे होऊ शकते नुकसान ? या टिप्सचा करा वापर
Follow us
| Updated on: Oct 11, 2022 | 3:57 PM

उच्च रक्तदाब हे किडनीचा आजार किंवा किडनी फेल होण्यामागचे एक प्रमुख कारण असू शकते. हाय ब्लड प्रेशरमुळे (high blood pressure) रक्तवाहिन्या आणि किडनीचे (kidney) फिल्टर्स यांचे नुकसान होऊ शकते. यामुळे शरीरात असलेले विषारी (toxins) घटक बाहेर पडणे कठीण होऊ शकते. उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शनमुळे किडनीच्या आसपास असलेल्या रक्तवाहिन्या कडक होतात किंवा आकुंचन पावतात. अशा परिस्थितीत पुरेसे रक्त किडनीपर्यंत पोहोचू शकत नाही. ज्यामुळे किडनी फेल होऊ शकते.

जेव्हा रक्तवाहिन्यांमधून रक्त ढकलण्यासाठी जास्त दबाव येतो तेव्हा उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शनची समस्या उद्भवते. उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी निरोगी आहारासह जीवनशैली बदलली जाऊ शकते. यामध्ये योगाभ्यासही फायदेशीर ठरू शकतो.

उच्च रक्तदाबामुळे किडनीवर पडतो प्रभाव –

हे सुद्धा वाचा

उच्च रक्तदाब किडनीचे नुकसान करू शकतो. मधुमेहानंतर उच्च रक्तदाब हे किडनी निकामी होण्याचे दुसरे मोठे कारण मानले जाते. वेब एमडीच्या नुसार, उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्या कमकुवत आणि खराब होतात आणि त्याचा इतर अवयवांवर देखील परिणाम होतो. किडनीमध्ये जर रक्तवाहिन्यांचे नुकसान झाले असेल, तर किडनी पूर्ण दाबाने काम करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत शरीरातून द्रव आणि कचरा बाहेर पडण्यास त्रास होऊ शकतो. रक्तातील अतिरिक्त द्रव रक्तदाब आणखी वाढवू शकतो. रक्तातील अतिरिक्त द्रवामुळे रक्तदाब आणखी वाढू शकतो. ज्यामुळे किडनी फेलही होऊ शकते.

रक्तदाब कमी करण्याचे उपाय –

स्ट्रेस कमी करा – स्ट्रेस कमी करण्यासाठी कामाचे तास, शारीरिक हालचाल आणि रिलेशनशिप यामध्येही बदल करावा.

मंद, लयबद्ध श्वासोच्छ्वास – मेडिटेशन, योगासने यांच्या आधारे श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि शांत होण्याचा प्रयत्न करा.

व्यायाम – मित्र मंडळी किंवा एखाद्या ग्रुपच्या सोबतीने व्यायाम करा. त्यामुळे व्यायाम करण्यात लक्ष लागेल.

किडनी विकाराचे लक्षण –

– सूज

-स्नायूंमध्ये वेदना

– भूक न लागणे

– लक्ष एकाग्र करण्यात येणारी अडचण

या गोष्टींकडेही द्या लक्ष –

– निरोगी हृदयासाठी चांगला, पौष्टिक आहार घ्या

– भाज्या, फळे , धान्य यांचे अधिक सेवन करा.

– शारीरिक हालचाल वाढवा.

– वजन नियंत्रणात ठेवा.

– धूम्रपान करू नका.

– मद्यपान करत असाल तर तत्काळ थांबवा.

– कमी मीठ असलेले पदार्थ सेवन करा किंवा जेवणात मीठाचा कमीतकमी वापर करा.

उच्च रक्तदाब कमी करण्यासाठीची योगासने –

वक्रासन, गोमुखासन, पवनमुक्‍तासन, उत्‍तानपादासन, नौकासन, सेतुबंधासन, उष्‍ट्रासन, भुजंगासन, मर्कटासन, पश्चिमोत्‍तासन, शलभासन, सूर्य नमस्‍कार, शशांकासन

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.