Gestational Diabetes | गर्भात वाढत असलेल्या बाळाला हानी पोहचवू शकतो Gestational Diabetes, जाणून घ्या या आजाराबद्दल…

र्भधारणेदरम्यान होणाऱ्या या मधुमेहाला 'जेस्टेशनल डायबिटीस' असे म्हणतात. यामध्ये, स्त्रियांच्या रक्तातील साखरेची पातळी लक्षणीय वाढते.

Gestational Diabetes | गर्भात वाढत असलेल्या बाळाला हानी पोहचवू शकतो Gestational Diabetes, जाणून घ्या या आजाराबद्दल...
गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या या मधुमेहाला 'जेस्टेशनल डायबिटीस' असे म्हणतात.
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 1:20 PM

मुंबई : गर्भधारणेदरम्यान शरीरात होणार्‍या सर्व बदलांच्या दरम्यान स्त्रियांना बर्‍याच समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत काही स्त्रिया गर्भधारणेदरम्यान मधुमेहाच्या शिकार ठरतात. गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या या मधुमेहाला ‘जेस्टेशनल डायबिटीस’ असे म्हणतात. यामध्ये, स्त्रियांच्या रक्तातील साखरेची पातळी लक्षणीय वाढते. तथापि, ही समस्या तात्पुरत्या स्वरुपाची असते आणि बाळाच्या जन्मानंतर त्याचे निराकरण होते. परंतु, यामुळे प्रसूतीमध्ये बर्‍याच अडचणी येऊ शकतात (know about Gestational Diabetes causes and precautions).

सामान्य भाषेत समजून घ्या ‘जेस्टेशनल डायबिटीस’बद्दल…

सहसा गर्भवती महिलांमध्ये इन्सुलिन नैसर्गिकरित्या तयार होत असते. या इन्सुलिनमुळे शरीरात ग्लूकोजचे प्रमाण नैसर्गिकरित्या वाढत असते. परंतु, ही चिंतेची बाब नाही. कारण, ग्लूकोजची वाढीव संख्या जन्माला येणाऱ्या बाळाचे पोषण करण्याचे काम करते. परंतु, जर गर्भवती स्त्रीच्या पाचक ग्रंथी त्यांचे कार्य योग्यरित्या करण्यास सक्षम नसतील, तर ‘जेस्टेशनल डायबिटीस’ होण्याची शक्यता वाढते.

कोणतीही लक्षणे दिसत नाहीत!

सामान्य मधुमेहाप्रमाणे ‘जेस्टेशनल डायबिटीस’ या मधुमेहाच्या प्रकारची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. परंतु, उच्च रक्तदाब, जास्त तहान, वारंवार लघवी होणे आणि थकल्यासारखे वाटणे ही लक्षणे पाहिल्यानंतर बरेच वेळा डॉक्टर ‘जेस्टेशनल डायबिटीस’ची तपासणी करतात. वेळेवर योग्यप्रकारे उपचार न केल्यास गर्भाशयात वाढणार्‍या बाळाला बर्‍याच अडचणी येऊ शकतात. कारण अशा परिस्थितीत, आईच्या आत वाढलेला ग्लूकोज प्लेसेंटामध्ये जातो आणि बाळाच्या रक्तात पोहोचतो. ज्यामुळे बाळाच्या रक्तातील साखर देखील वाढू शकते. यामुळे होणाऱ्या बाळाला मज्जासंस्थेचे विकार, स्पाइना बिफिडिया, वातरोग, मूत्राशय किंवा हृदयात त्रास असे विकार उद्भवू शकतात (know about Gestational Diabetes causes and precautions).

‘या’ महिलांना अधिक धोका :

– त्या गर्भवती महिला ज्यांचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त आहे.

– उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्या स्त्रिया.

– मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास.

– गर्भवती होण्यापूर्वी वजन वाढलेल्या महिला.

– गरोदरपणात वजन खूप वाढलेल्या स्त्रिया

– पहिल्या गर्भधारणेत मधुमेह झालेल्या स्त्रिया

(know about Gestational Diabetes causes and precautions)

या समस्येपासून कसा बचाव कराल?

– वेळोवेळी लघवीमधील केटोन अॅसिडची तपासणी करा.

– रक्तातील साखरेची पातळी सतत तपासून घ्या.

– वजन नियंत्रित करा आणि आहाराची काळजी घ्या. शक्य असल्यास, डॉक्टरांकडून आहार योजना बनवून घ्या.

– कोल्ड ड्रिंक्स, पेस्ट्री आणि मिठाईसारख्या गोड पदार्थांपासून दूर रहा.

– तज्ज्ञांनी निर्देशित केलेले योग आणि व्यायाम नियमितपणे करा.

(टीप : वरील माहिती संशोधनावर आधारित असून, कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(know about Gestational Diabetes causes and precautions)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.