AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Food | फळे खाण्याच्या योग्य पद्धती माहितीयेत? जाणून घ्या, अन्यथा फायद्याऐवजी होऊ शकते नुकसान!

फळे अगदी सहज पचतात, कारण त्यात 80 ते 90 टक्के पाणी असते. पौष्टिक घटकांनी समृद्ध फळे आपल्या संपूर्ण आहारात महत्त्वाचे कार्य करतात.

Food | फळे खाण्याच्या योग्य पद्धती माहितीयेत? जाणून घ्या, अन्यथा फायद्याऐवजी होऊ शकते नुकसान!
फळे खाण्याचा योग्य मार्ग
| Updated on: Feb 09, 2021 | 1:41 PM
Share

मुंबई : फळ ही एक अशी गोष्ट आहे, ज्यामध्ये बरीच खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात, जी सर्वसाधारणपणे मानवी शरीरासाठी आवश्यक असतात, या बद्दल आपल्याला बहुदा माहितीच नसते. जर एखादी व्यक्ती अन्न सोडून केवळ फळे खात असेल, तर तो आपले संपूर्ण आयुष्य सहजपणे जगू शकेल. एकाच फळाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीस जीवनसत्त्वांसह भरपूर प्रमाणात पाणी, कार्बोहायड्रेट, फॅटी अॅसिडस्, अमीनो अॅसिडस् मिळतात (Know the right way to eat fruit for more benefits).

याशिवाय फळे अगदी सहज पचतात, कारण त्यात 80 ते 90 टक्के पाणी असते. पौष्टिक घटकांनी समृद्ध फळे आपल्या संपूर्ण आहारात महत्त्वाचे कार्य करते, म्हणून ते खाण्याचा योग्य मार्ग जाणून घेणे फार महत्वाचे आहे. कारण जर आपल्याला फळ खाण्याचा योग्य मार्ग माहित नसेल, तर हे आपल्या आरोग्यासाठी बर्‍याच समस्या निर्माण करू शकते. चला तर, फळे खाण्याच्या योग्य पद्धती आणि त्या संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया…

‘अशा’ प्रकारे फळे खाल्ल्यास होते नुकसान

आपल्यापैकी बहुतेकजण फळे खाताना काही सामान्य चुका करतात. जसे की आपण आंबा किंवा इतर कोणतेही फळ जेवल्यानंतर खातो, किंवा एखाद्या फंक्शनमध्ये असताना प्रथम फ्रुटचाट भरभरून खातो आणि नंतर जेवतो. अशा परिस्थितीत फळ आपल्या शरीराला लाभदायी ठरण्याऐवजी हानिकारक ठरतात आणि आम्लपित्त, पोट फुगणे, आंबट ढेकर, गॅस यासारख्या समस्या उद्भवू लागतात. अशावेळी आपण खाण्याला दोष देऊन मोकळे होतो (Know the right way to eat fruit for more benefits).

‘या’ हानीमागचे कारण जाणून घ्या!

वरील परिस्थिती आपल्याला शरीराला झालेला तोटा हा अन्नामुळे नव्हे, तर फळांमुळे आहे. कारण, फळ स्वतःच एक संपूर्ण आहार आहे. त्यासोबत आणखी काही खाण्याची गरज नाही. याशिवाय फळाला स्वतःची नैसर्गिक साखर असते. साखर कोणत्याही गोष्टीमध्ये किण्वन सुरू करते. म्हणून फळांसोबत खाल्लेले अन्न किंवा फळ खाल्ल्यानंतर लगेच खाल्लेले अन्न, त्या फळात असलेल्या साखरेमुळे सडण्यास सुरुवात होते आणि आपल्याला पचनासंबंधित समस्या उद्भवू लागतात.

फळे खाण्याचा ‘हा’ आहे योग्य मार्ग

खरं तर, फळ खाण्याचा योग्य मार्ग म्हणजे फळाचे सेवन केल्यानंतर किमान 45 मिनिटे ते तासाभर काहीही खाऊ नये. याशिवाय जेव्हा जेव्हा फळ खाता तेव्हा लक्षात ठेवा की, आपले पोट त्यावेळी रिक्त असले पाहिजे. यामुळे आपल्या शरीराला संपूर्ण पोषण मिळेल आणि ते सहज पचतील. लक्षात ठेवा की, फळांना इतर कशाचीही आवश्यकता नसते, ते स्वतःमध्ये एक परिपूर्ण आहार आहेत. हेच कारण आहे की, जुन्या काळातही ऋषी मुनि केवळ फळे खाऊन आपले जीवन जगत असत. म्हणून भरपूर फळे खा आणि निरोगी राहा.

(Know the right way to eat fruit for more benefits)

हेही वाचा :

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.