Study | वाढत्या वयानुसार केस गळतीची समस्या सगळ्यांनाच, मग केवळ पुरुषांनाच का पडते ‘टक्कल’?

टक्कल पडणे ही समस्या पुरुषांमध्ये इतकी सामान्य आहे की, त्यावर 'बाला' आणि 'उजडा चमन' सारखे चित्रपटही बनले आहेत.

Study | वाढत्या वयानुसार केस गळतीची समस्या सगळ्यांनाच, मग केवळ पुरुषांनाच का पडते ‘टक्कल’?
टक्कल पडण्याची समस्या
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 5:49 PM

मुंबई : बहुतेक वेळा असे दिसून येते की, पुरुषांच्या वयानुसार त्यांच्या डोक्याचे केस देखील कमी होण्यास सुरुवात होते. वयाच्या 50व्या वर्षाचा आकडा ओलांडताना डोक्यावर अक्षरशः चंद्र दिसू लागतो. बहुतेक केस एकतर कपाळाच्या बाजूने गळून पडतात किंवा डोक्याच्या वरील क्षेत्रातील केस गळतात. कधीकधी तर पूर्णपणे टक्कलही पडते (Know why baldness problem is more common in men than women).

टक्कल पडणे ही समस्या पुरुषांमध्ये इतकी सामान्य आहे की, त्यावर ‘बाला’ आणि ‘उजडा चमन’ सारखे चित्रपटही बनले आहेत. परंतु आपण कधी असा विचार केला आहे का की, ही समस्या केवळ पुरुषांमध्येच का उद्भवते? महिलांना देखील केस गळतीची समस्येला सामोरे जावे लागते, परंतु त्यांना सहसा टक्कल पडत नाही. चला तर, यामागचे कारण जाणून घेऊया…

‘या’ समस्येला हार्मोन्स जबाबदार

सर्व संशोधन असे दर्शवते की, टक्कल पडण्याच्या समस्येसाठी ‘टेस्टोस्टेरॉन’ नावाचा सेक्स हार्मोन जबाबदार आहे. पुरुषांमध्ये स्राव असलेल्या ‘अँड्रोजन ग्रुप’चा हा ‘स्टिरॉइड’ हार्मोन आहे. पुरुषांच्या शरीरात विशिष्ट एंझाइम असतात, जे टेस्टोस्टेरॉनला डिहायड्रोटेस्टोस्टेरॉनमध्ये रूपांतरित करतात. डिहायड्रोटेस्टोस्टेरॉन केस पातळ आणि कमकुवत बनवते.

कधीकधी समस्या असू शकते ‘अनुवांशिक’

जेव्हा डिहायड्रोटेस्टोस्टेरॉन जास्त असेल, तेव्हा केसांच्या फोलिकल्समधील ‘अँड्रोजन रीसेप्टर्स’ हे हार्मोन अधिक शोषून घेतात. यामुळे केस जलद गतीने गळू लागतात. बर्‍याच वेळा, हार्मोन्समध्ये हे बदल करणारे एंजाइम पुरुषांमध्ये जनुकांद्वारेच म्हणजेच अनुवांशिकरित्या आढळतात. अशा परिस्थितीत ही समस्या अनुवांशिक बनते (Know why baldness problem is more common in men than women).

…म्हणूनच स्त्रियांना टक्कल पडत नाही!

स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरॉनचा स्राव नाममात्र असतो. टेस्टोस्टेरॉनला डिहायड्रोस्टेस्टोस्टेरॉनमध्ये रुपांतर होण्यापासून प्रतिबंधित करणारे, इस्ट्रोजेन नावाचे हार्मोन देखील स्त्रियांमध्ये तयार होते. म्हणूनच, महिलांमध्ये टक्कल पडण्याची कोणतीही समस्या नसते. रजोनिवृत्ती आणि गर्भधारणेदरम्यान बर्‍याच वेळा महिलांचे केस जलद गळू लागतात. परंतु, हे सर्व हार्मोनल बदल विशिष्ट वेळेसाठीच असतात.

‘ही’ देखील कारणे असू शकतात

आजकाल, पुरुषांच्या केसांची गळती वयाच्या 30व्या वर्षापासूनच होऊ लागली आहे. याचा अर्थ असा होत नाही की, ते फक्त हार्मोन्समुळे होते. टेस्टोस्टेरॉनला डिहायड्रोस्टेस्टोस्टेरॉनमध्ये रूपांतरित करणे ही एक लांबलचक प्रक्रिया आहे, जी प्रौढ होण्यापूर्वी त्याच्यावर परिणाम करत नाही. बर्‍याच वेळा जास्त ताण, कोणताही आजार, धूम्रपान, मद्यपान आणि चुकीच्या आहारशैलीमुळे शरीराला पोषण मिळत नाही, याशिवाय केसांमध्ये डाय किंवा रासायनिक उत्पादने वापरल्यामुळे देखील ही समस्या वेळेपूर्वीच आपले ‘रंग’ दाखवू लागते.

(Know why baldness problem is more common in men than women)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.