AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लो ब्लड प्रेशरने शेफाली जरीवालाचा जीव घेतला? कशी ओळखावी याची लक्षणे?

लो ब्लड प्रेशर जीवावर बेतू शकतं जर त्याच्याबद्दल योग्य माहिती नसेल तर. तसेच त्याची लक्षणे लवकर जाणवली नाही तर. शेफाली जरीवालाच्याबाबतीतही असंच काहीस घडलं असल्याचं म्हटलं जातं. डॉक्टरांच्या मते, शेफालीचे ब्लड प्रेशर खूपच कमी झाले होते. त्यामुळे लो ब्लड प्रेशरबाबतच्या काही गोष्टी वेळीच समजल्या तर नक्कीच आपण गंभीर परिणाम टाळू शकतो.

लो ब्लड प्रेशरने शेफाली जरीवालाचा जीव घेतला? कशी ओळखावी याची लक्षणे?
Low blood pressureImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Jun 30, 2025 | 4:34 PM
Share

वयाच्या 42 व्या वर्षी अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या अचानक झालेल्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. असे म्हटले जात आहे की शेफालीला हृदयविकाराचा झटका आला होता. डॉक्टरांच्या मते, शेफालीचे ब्लड प्रेशर खूपच कमी झाले होते ज्यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आला. हृदयविकाराच्या झटक्यामध्ये हृदय अचानक रक्त पंप करणे थांबवते. यामागे अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी कमी रक्तदाब देखील एक आहे. रक्तदाब वाढणे आणि कमी होणे दोन्ही धोकादायक असतात. अनेक वेळा त्यांची लक्षणे जाणून न घेतल्याने धोका वाढतो. जाणून घेऊयात की रक्तदाब कमी होण्याची कारणे, त्याची लक्षणे काय आहेत? आणि त्यावर काय उपाय करता येतील?

किती रक्तदाब (ब्लड प्रेशर) कमी मानला जातो? कमी रक्तदाबाला वैद्यकीय भाषेत हायपोटेन्शन म्हणतात. जर त्यात थोडासा चढ-उतार झाला तर फारसा धोका नाही. तथापि, रक्तदाबात अचानक घट होणे प्राणघातक ठरू शकते. रक्तदाब सिस्टोलिक (वरचा क्रमांक) आणि डायस्टोलिक (खालचा क्रमांक) मध्ये मोजला जातो. जर तुमचा रक्तदाब 90/60 पेक्षा कमी असेल तर तो कमी मानला जातो. सामान्य रक्तदाब सुमारे 120/80 मिमी एचजी असतो.

लक्षणे काय असतात?

एका अहवालानुसार, कमी रक्तदाब कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो. त्यामागील कारणे देखील वेगवेगळी आहेत. वय 50 पेक्षा जास्त झाल्यावर त्याची लक्षणे दिसून येतात. जरी तुम्ही खूप शारीरिकदृष्ट्या स्ट्रॉंग असलात तरीही, तुमचा रक्तदाब कमी असू शकतो आणि तुम्हाला लक्षणे कळणारही नाहीत. हे बहुतेक तरुणांमध्ये घडते.

याची लक्षणे कशी ओळखावी

चक्कर येणे ,क्षीण होणे, उलट्या किंवा मळमळ, अस्पष्ट दिसणे, जलद श्वास घेणे, थकवा, अशक्तपणा, लक्ष केंद्रित करू न शकणे, गोंधळलेले वाटणे, चिडचिडेपणा किंवा विचित्र वागणे, हृदयाचे ठोके वाढणे, गुडघे थंड होतात, लघवी कमी होणे. ही सर्व लक्षणे लो ब्लड प्रेशरची आहेत.

कारणे काय असू शकतात?

जर तुम्हाला पर्किंसन्स सारखा आजार असेल तर तुमचा रक्तदाब कमी असू शकतो.

दुखापतीमुळे किंवा पाण्याअभावी रक्तस्त्राव झाल्यामुळे देखील कमी रक्तदाब होतो.

अनियमित हृदयाचे ठोके, फुफ्फुसीय एम्बोलिझम, फुफ्फुसांशी संबंधित आजार, अचानक एलर्जीची प्रतिक्रिया किंवा कोणत्याही संसर्गामुळे रोगप्रतिकारक शक्तीची प्रतिक्रिया यामुळे कमी रक्तदाब होतो.

जर डॉक्टरांनी तुम्हाला उच्च रक्तदाब, हार्ट फेलियर, इरेक्टाइट डिसफंक्शन, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लम,डिप्रेशन इत्यादींसाठी औषधे दिली असतील तर ती स्वतःहून थांबवू नका.

तसेच अती थंडी किंवा उष्णतेमुळे देखील रक्तदाब कमी होतो.

खूप वेळ उपाशी राहणे किंवा काहीही न खाता उपवास करणे यामुळेही रक्तदाब कमी होतो.

रक्तदाब इतक्या लवकर का कमी होतो? जर तुमचा रक्तदाब वेगाने कमी झाला तर याचा अर्थ असा की रक्त शरीराच्या कोणत्याही भागात पोहोचत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला गोंधळ वाटू शकतो पण ते धोकादायक देखील असू शकते. तुमचा रक्तदाब कमी होताच, तुमचे शरीर ते सामान्य करण्यासाठी सक्रिय होते. त्यामुळे तुमच्या हृदयाची गती वाढते रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. ही लक्षणे काहींना दिसून येतात तर काहींना कळतही नाही.

कमी रक्तदाब असल्यास काय करावे? जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला रक्तदाबाची समस्या आहे तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या आणि काही टेस्ट करून घ्या. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय रक्तदाबासाठी औषध घेऊ नका. जर तुमचा रक्तदाब कमी असेल तर घरी एक मशीन ठेवा आणि डॉक्टरांकडून ते मोजायला शिका. तुमचा आहार बदला. त्यात मीठाचे प्रमाण थोडेसे वाढवा. तुमच्या जेवणात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी ठेवा आणि कमी प्रमाणात अन्न खा. जास्त पाणी प्या.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा