AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केसातला कोंडा आणि खाज होईल कायमची गायब! फक्त 15 मिनिटांत घरीच बनवा नैसर्गिक शॅम्पू

उन्हाळ्याच्या दिवसात अनेकांना केसांमध्ये कोंड्याची समस्या सतावत असते. ज्यामुळे स्कॅल्पमध्ये मोठ्या प्रमाणात खाज सुटते. अशावेळेस केमिकलयुक्त शॅम्पू वापरण्याऐवजी तुम्ही घरीच कडुलिंबाच्या पानांपासून हर्बल शॅम्पू बनवू शकतात.

केसातला कोंडा आणि खाज होईल कायमची गायब! फक्त 15 मिनिटांत घरीच बनवा नैसर्गिक शॅम्पू
shampoo
| Edited By: | Updated on: May 06, 2026 | 4:09 PM
Share

वाढत्या उष्णतेचा पारा आणि त्यामुळे येणारा घाम यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या अनेकांना सतावत असते. ऐवढेच नाहीतर कोंड्यामुळे स्कॅल्पला खाज देखील येते. अशावेळेस बहुतेकजण या समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी विविध प्रकारचे केमिकलयुक्त शॅम्पू वापरतात, परंतु दीर्घकाळात ते केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. जर तुम्ही सोपा आणि नैसर्गिक उपाय शोधत असाल तर कडुलिंबाच्या पानांपासून एक उत्तम पर्याय ठरू शकतो. कारण आपल्या सर्वांनाच माहित आहे की कडुलिंबाच्या पानांमध्ये बॅक्टेरिया-विरोधी गुणधर्म आहेत आणि या गुणधर्मांमुळे स्कॅल्प स्वच्छ होते आणि केसांच्या आरोग्यास प्रोत्साहन देतात. चला तर मग आजच्या लेखात आपण घरच्या घरी कडुलिंबाच्या पानांपासून हर्बल नीम शॅम्पू कसा बनवू शकतो ते जाणून घेऊयात.

हर्बल नीम शॅम्पू बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • 1 मूठभर कडुलिंबाची ताजी पाने
  • 2 कप पाणी
  • 2-3 चमचा सौम्य लिक्विड साबण किंवा कॅस्टाईल साबण
  • 1 टीस्पून कोरफडीचा गर
  • खोबरेल तेलाचे 5-6 थेंब

हर्बल नीम शॅम्पू कसा बनवायचा?

  • सर्वप्रथम कडुलिंबाची पाने नीट धुवून घ्या.
  • आता एका पातेल्यात 2 कप पाणी घालून त्यात कडुलिंबाची पाने टाका आणि उकळी येऊ द्या.
  • जेव्हा पाणी निम्मे होईल, तेव्हा गॅस बंद करा.
  • हे पाणी थंड होऊ द्या आणि मग गाळून घ्या.
  • आता त्यात लिक्विड साबण चांगले मिक्स करा. तुमची इच्छा असल्यास तुम्ही त्यात कोरफडीचा गर आणि खोबरेल तेलसुद्धा टाकू शकता.

हर्बल नीम शॅम्पू कसा वापरावा?

केस हलके ओले करा. हा कडुलिंबाचा शॅम्पू स्कॅल्पवर लावा आणि हळुवारपणे मालिश करा. 2-3 मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा याचा वापर केल्यास काही दिवसातच याचा उत्तम परिणाम तुम्हाला जाणवेल.

कोणासाठी हे अधिक चांगले आहे?

ज्यांना कोंडा, खाज सुटणारी किंवा तेलकट स्कॅल्पचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा शॅम्पू विशेषतः फायदेशीर आहे. तसेच ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांच्यासाठीही हा एक चांगला पर्याय असू शकतो.

या गोष्टी लक्षात ठेवा

या शॅम्पूमध्ये कोणतेही प्रिजर्व्हेटिव्ह घटक नसल्यामुळे जास्त काळ ठेवू नका. वापरण्यापूर्वी नेहमी पॅच टेस्ट करा. कोणतीही जळजळ किंवा ॲलर्जीची प्रतिक्रिया जाणवल्यास, त्याचा वापर ताबडतोब थांबवा.

कडुलिंबाचा शॅम्पू हा एक सोपा, स्वस्त आणि प्रभावी घरगुती उपाय आहे, जो तुमचे केस नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यास मदत करतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा