Beauty Tips | काजळ लावताना ते पसरण्याची भीती वाटतेय? मग ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स!

खरं तर, तेलकट त्वचा हे काजळ पसरण्याचे मुख्य कारण असू शकते. तेलकट त्वचेमुळे काजळ आय-लिड्सवर पसरते. काजळ पसरू नये म्हणून थंड पाण्याने डोळे आणि पापण्या पुसा.

Beauty Tips | काजळ लावताना ते पसरण्याची भीती वाटतेय? मग ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स!
काजळ टिप्स
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 10:56 AM

मुंबई : महिला आपले सौंदर्य आणखी वाढवण्यासाठी डोळ्यांमध्ये ठळक काजळ वापरतात. थोडेसे काजळ आपल्या सोप्यासाध्या लूकला आणखीनच खुलवते. एवढेच नाही तर, यामुळे तुमचे डोळेही किंचित मोठे आणि उठावदार दिसतात. मोठे डोळे आपले सौंदर्य वाढवण्यात मदत करतात. आजच्या काळात मुलींसाठी काजळ लावणे हे एक फॅशन स्टेटमेंट बनले आहे. परंतु, काजळ लावण्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे, काही काळानंतर ते सहज पसरते आणि आपला लूक खराब करू शकते. आपण देखील काजल पसरण्याच्या भीतीने ते लावणे टाळत असला, तर चिंता सोडा. आम्ही आपल्याला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे काजळ दिवसभर व्यवस्थित टिकून राहील (Makeup tips how to prevent kajal from smudging on eyelids).

खरं तर, तेलकट त्वचा हे काजळ पसरण्याचे मुख्य कारण असू शकते. तेलकट त्वचेमुळे काजळ आय-लिड्सवर पसरते. काजळ पसरू नये म्हणून थंड पाण्याने डोळे आणि पापण्या पुसा. त्यानंतर काही वेळ ते व्यवस्थित कोरडे होऊ द्या. असे केल्याने, आपल्या डोळ्याभोवती तेलकटपणा राहणार नाही आणि काजळ देखील पसरणार नाही.

पापण्यांवर फाउंडेशन लावा.

काजळ लावण्यापूर्वी पापण्यांवर व्यवस्थित फाउंडेशन लावा. यामुळे, आपले काजळ अधिक काळ टिकेल आणि हायलाईट देखील होईल.

पावडर लावा.

डोळ्यांना उठावदार लूक देण्यासाठी काजळ लावल्यानंतर पापण्यांवर पावडर लावा. आपण मेकअप पावडर वापरू शकता. असे केल्याने तुमच्या डोळ्यांभोवतीची त्वचा कोरडे होईल आणि फार काळ घाम येणार नाही.

काजळ खरेदी करताना तपासून घ्या.

काजळ खरेदी करताना नेहमी काळजी घ्या. नेहमी स्मज प्रूफ, स्मुज फ्री आणि लाँग स्टे काजळ खरेदी करा. अशा प्रकारचे काजळ आपला लूक बराच काळ टिकवून ठेवेल. तसेच, आपल्या डोळ्यांना ठळक लूक देईल (Makeup tips how to prevent kajal from smudging on eyelids).

नियमित टोनर वापरा.

त्वचेला तेलकटपणा घालवण्यासाठी नेहमी मेकअप करण्यापूर्वी टोनरचा वापर करा. कॉटन बॉलच्या मदतीने तुम्ही पापण्यांवर टोनर लावू शकता. यानंतरच काजळ लावा.

डोळ्यांच्या मेकअपसाठी आणखी काही टिप्स :

– डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी सर्वात आधी डोळ्यांच्या आस-पास कन्सीलर लावा. यामुळे तुमचे डार्क सर्कल लपले जातील. नेहमी लाईट शेड कन्सीलरची निवड करा.

– जर तुमचे डोळे छोटे असतील तर डोळ्यांवर आयलाईनरचा वापर करुन मोठे दाखवता येतात. त्यानंतर जर तुम्ही डोळ्यांना ब्लॅक, ग्रे आणि ब्राऊन कलर देऊ इच्छित असाल तर मेकअप लावण्याआधी पावडरने सेट करा.

– तुम्ही ब्रशच्या सहाय्याने डोळ्यांना हलका स्मज लुक द्या. यामुळे तुमच्या डोळ्यांना स्मोकी लुक येतो. तुम्ही हवं तर ब्रश किंवा कॉटन बॉलचा वापर करु शकता.

– डोळ्यांना स्मोकी लुक दिल्यानंतर आयब्रो हायलाईट करायला विसरु नका. यामुळे तुमचा मेकअप अधिक खुलून दिसेल.

(Makeup tips how to prevent kajal from smudging on eyelids)

हेही वाचा :

Weather change sickness । बदलत्या हवामानात चुकूनही करु नका या 5 चुका, आजारी पडाल

Food Tips | आयुर्वेद सांगतंय मधासोबत ‘या’ गोष्टी खाऊ नका एकत्र, अन्यथा आरोग्याला होऊ शकते हानी!

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.