Mauni Amavasya 2021 | मौनी अमावास्येच्या दिवशी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे

हिंदू धर्मात मौनी अमावस्येला विशेष महत्त्व आहे. माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला ‘मौनी अमावस्या’ म्हणतात.

Mauni Amavasya 2021 | मौनी अमावास्येच्या दिवशी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे
मौनी अमावस्या
Harshada Bhirvandekar

|

Feb 11, 2021 | 10:30 AM

मुंबई : हिंदू धर्मात मौनी अमावस्येला विशेष महत्त्व आहे. माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला ‘मौनी अमावस्या’ म्हणतात. आज (11 फेब्रुवारी) मौनी अमावस्या आहे. तसेच या महिन्यात आंघोळ केल्याने आपल्याला भरपूर पुण्य मिळते, असे म्हटले जाते. मौनी अमावस्येच्या दिवशी आंघोळ केल्याने आपल्या सर्व पापांचा नाश होतो, अशी देखील मान्यता आहे. या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्व आहे (Mauni Amavasya 2021 never do this things on this amavasya).

मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. पुराणानुसार या पवित्र दिवशी देव-देवता नदीच्या संगमामध्ये वास्तव्य करतात. यामुळेच मौनी अमावस्येला गंगा स्नान करण्यास विशेष महत्त्व आहे. या वेळी मौनी अमावस्ये दिवशी चंद्र श्रावण नक्षत्रात आणि सहा ग्रह मकर राशीत असल्याने या दिनी ‘महासंयोग’ तयार होत आहेत. या शुभ मुहूर्ताला ‘महोदय योग’ असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. आजच्या दिवशी जप-व्रत करण्याला महत्त्व आहे. मात्र, या दिवशी काही कामे करणे वर्ज्य आहे. चला तर जाणून घेऊया याविषयी…

मौनी अमावास्येच्या दिवशी करू नयेत ‘ही’ कामे!

– दिवसा उशिरापर्यंत झोपू नका. अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करण्याची परंपरा आहे. जर तुम्हाला पवित्र नदीत अंघोळ करणे शक्य नसेल, तर घरीच स्वच्छ आंघोळ करा. आंघोळ झाल्यावर सूर्य अर्ध्य देण्यास विसरू नका. आंघोळ करण्यापूर्वी काही बोलू नका, शांत रहा.

– अमावस्येला स्मशानभूमीत किंवा स्मशानभूमीतच्या आसपासच्या परिसरात फिरता कामा नये. अमावस्याची रात्र ही काळोखी रात्र आहे, असे म्हटले जाते. असे मानले जाते की यावेळेस भुते किंवा वाईट शक्ती खूप सक्रिय होतात. म्हणूनच, अमावस्येच्या रात्री एकाकी जागी जाऊ नये (Mauni Amavasya 2021 never do this things on this amavasya).

– अमावस्येच्या दिवशी स्वतःवर संयम ठेवला पाहिजे. या दिवशी पुरुष आणि स्त्रीने संभोग करू नये. गरुड पुराणानुसार अमावस्येच्या दिवशी लैंगिक संबंधातून जन्मलेल्या मुलांना आयुष्यभर आनंद मिळत नाही. अमावस्येच्या दिवशी घरात शांततेचे वातावरण असले पाहिजे. आज ज्या घरात वादाचे वातावरण आहे, तेथे पितरांची कृपा होत नाही. या दिवशी भांडणे, कलह आणि वादविवाद टाळले पाहिजेत. या दिवशी वाईट शब्द मुळीच बोलू नयेत.

– अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास शुभ फळ मिळते. परंतु, शनिवारशिवाय इतर कोणत्याही दिवशी पिंपळाला स्पर्श करू नका, म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा, पण झाडाला स्पर्श करू नका. यामुळे आर्थिक नुकसान होते.

– या दिवशी एखाद्याने पलंगावर नव्हे, तर चटईवर झोपावे. अमावस्येच्या दिवशी शरीरावर तेल लावण्यास मनाई आहे. आपण मौनी अमावस्येला बाहेर जात असाल, तर या दिवशी कोणत्याही प्रकारचा मेकअप करू नका.

– या दिवशी, मद्य, मांस इत्यादीपासून दूर रहा आणि साधे सात्विक अन्न खा. जास्तीत जास्त वेळेसाठी शांतपणे ध्यान करा.

(टीप : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित असून, याच्याशी वेबसाईट सहमत असेलच, असे नाही. यातून कुठल्याही अंधश्रद्धेला चालना देण्याचा उद्देश नाही.)

(Mauni Amavasya 2021 never do this things on this amavasya)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें