Jamun Seeds | मधुमेहाच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरतील जांभळाच्या बिया, ‘या’ समस्यांवरही उपयोगी!

जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे, यात काही शंकाच नाही. परंतु, त्याच्या बियांचे देखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जांभळाच्या बियांमध्ये अनेक हेल्दी कंपाऊंडस असतात.

Jamun Seeds | मधुमेहाच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरतील जांभळाच्या बिया, ‘या’ समस्यांवरही उपयोगी!
जांभळाच्या बिया

मुंबई : जांभळाचे आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. जांभळाचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी करण्यात येतो. जांभूळ आहे हे फळ मधुमेह, मुतखडा, अतिसार, मुरडा, संग्रहणी, याकृत रोग आणि रक्तजन्य विकारात अतिशय लाभदायक आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभळाच्या बिया या चूर्णाच्या स्वरूपात देणे सर्वोत्तम उपाय मानला जातो (medicinal Benefits Of Jamun Seed aka Java pulm).

जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे, यात काही शंकाच नाही. परंतु, त्याच्या बियांचे देखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जांभळाच्या बियांमध्ये अनेक हेल्दी कंपाऊंडस असतात. मधुमेह नियंत्रित ठेवण्याबरोबरच शरीरातून हानिकारक केमिकल्स बाहेर टाकण्यास जांभळाच्या बियांचा उपयोग होतो. चला तर, जांभूळ खाऊन बिया फेकून देण्यापूर्वी त्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया…

जांभळाच्या बियांचे फायदे

– जांभळाच्या बीमध्ये अँटी-डायबेटीस गुणधर्म आढळतात. त्यात असलेल्या अल्कोलीड्स केमिकलमुळे स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यास आळा बसतो आणि म्हणूनच रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राखले जाते. टाईप-2 मधुमेह असलेल्या रूग्णांमध्ये रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी या बिया उपयुक्त ठरतात.

– जांभळाच्या बीमध्ये अल्कोलीड्स केमिकल आढळते. सर्व संशोधनात असे दिसून आले आहे की, हाय बीपी कमी करण्यात अल्कोलीड्स आम्ल खूप उपयुक्त आहे. अशा परिस्थितीत, उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना रक्तदाब कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो. बर्‍याच तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, अॅलिक अॅसिडच्या वापरामुळे रक्तदाब सुमारे 36 टक्के कमी केला जाऊ शकतो.

– जांभळाची बी पाण्यात उगाळून चेहऱ्यावरती लेप केल्याने चेहऱ्यावरती आलेल्या तारुण्यपिटिका म्हणजेच मुरुमे बरे होण्यास मदत होते. मुलतानी माती, चंदन पावडर व जांभूळ पावडर यांचे एकत्रित मिश्रण करून याचा लेप चेहऱ्यावरती नियमित लावल्यास मुरमे नाहीसे होतात (medicinal Benefits Of Jamun Seed aka Java pulm).

– या फळामध्ये क्रूड फायबर आढळते. पाचक प्रणाली सुधारण्यासाठी क्रूड फायबर अतिशय उपयुक्त आहे.

– मुतखड्याची समस्या असणाऱ्यांनी जांभळाच्या बियांची पावडर दह्यात मिसळून खावी. यामुळे मुतखडा निघून जातो.

– दात आणि हिरड्या चांगल्या आरोग्यासाठी देखील जांभूळ खूप फायदेशीर आहे. याच्या बियांमध्ये कॅल्शियम असते. त्याचा वापर केल्याने दात आणि हिरड्या मजबूत राहतात.

– जर बोलण्यात काही अडचण येत असेल, तर जांभळाच्या बियांच्या काढ्याने गुळण्या करा. यामुळे आवाज स्पष्ट होतो.

– जर आपल्याला गॅस्ट्रिक समस्येमुळे त्रास होत असेल तर, जांभळाच्या बिया वापरल्यास या समस्येपासून आराम मिळू शकेल. पावडर किंवा जांभळाच्या बियांचा अर्क प्यायल्याने गॅसची समस्या दूर होते.

पावडर कशी बनवाल?

जांभळाच्या बिया स्वच्छ धुवून, त्या उन्हात वाळवा. उन्हात व्यवस्थित वाळल्यानंतर सोलून घ्या. त्यांनतर या बिया चांगल्या वाळल्यानंतर चांगल्या बारीक वाटून पावडर करून घ्या. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा पावडर मिसळून प्या

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(medicinal Benefits Of Jamun Seed aka Java pulm)

हेही वाचा :

Skin Care | चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान!

Dieting Side Effects | डाएटिंग करताय? ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरित थांबणे ठरेल फायदेशीर!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI