नीता अंबानी यांचा मेकअप आर्टिस्ट एका दिवसाचे घेतो इतके लाख रुपये
Nita Ambani : नीता अंबानी या आपल्या डाएटवर जितकं लक्ष देतात तितकंच ते आपल्या दिसण्याकडे ही देतात. म्हणूनच त्यांनी आपल्यासाठी एक खास मेकअप आर्टिस्ट नेमला आहे. ही व्यक्ती बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध व्यक्ती असून त्यांची एका दिवसाची फी इतकी आहे की तुम्हाला विश्वास ही बसणार नाही.

Nita Ambani makeup artist : बॉलिवूडमध्ये असे अनेक मेकअप आर्टिस्ट आहेत ज्यांची स्वतःची वेगळी ओळख आहे. सिनेमाचं जग खूप मोठं आहे त्यामुळे या क्षेत्रात अनेक लोकं काम करतात. पण सगळ्यांनाच प्रसिद्धी आणि यश मिळत नाही. मोजक्या लोकांनाच ते मिळतं. अभिनयात काम करणाऱ्या कलाकारांचा मेकअप हा देखील खूप महत्त्वाचा असतो. कारण त्याशिवाय अभिनय पूर्णच होऊ शकत नाही. अभिनेत्रींचा मेकअप हा त्या भूमिकेशी संबंधित असतो. ज्या भूमिकेत त्या दिसणार आहेत. मेकअपच्या दुनियेत असंच एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे मिकी कॉन्ट्रॅक्टर. नीता अंबानी यांनी त्यांची त्यांचा वैयक्तिक मेकअप आर्टिस्ट म्हणून नियुक्ती केली आहे. नीता अंबानी प्रत्येक कार्यक्रमात अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस दिसतात कारण त्यांचा मेकअप मिकी कॉन्ट्रॅक्टर करतात.
अनंत आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये देखील नीता अंबानी यांचा मेकअप त्यांनीच केला होता. ज्यामुळे त्यांच्या लूकची बरीच चर्चा रंगली होती. आता जर एवढा मोठा कलाकार असेल आणि तो जर नीता अंबानी यांचा मेकअप करणार असेल तर मग त्याचा पगार देखील किती मोठा असेल याची कल्पना तुम्ही पण केली नसेल. तुम्ही एक अंदाज लावू शकता का. नसेल तर आज आम्ही तुम्हाला मिकी कॉन्ट्रॅक्टर किती पगार घेतात याबाबत सांगणार आहोत.
View this post on Instagram
मिकी कॉन्ट्रॅक्टर यांचा पगार किती
मेकअपच्या दुनियेतील कलाकार मिकी जे सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्टपैकी एक आहे. त्यांनी अनेक मोठ्या व्यक्तींचा मेकअप केला आहे. आपल्या उत्कृष्ट कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या मिकी यांची फी देखील प्रचंड आहे. तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की मिकी प्रति व्यक्ती प्रतिदिन सुमारे 7.5 लाख रुपये शुल्क घेतात. सर्वाधिक फी घेणाऱ्या मेकअप आर्टिस्टमध्ये त्याचे नाव सामील आहे.
नीता अंबानी यांची पहिली पसंती का?
अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये नीता अंबानी यांचा लूक हा नॅचरल असल्या सारखा वाटतो. त्यांच्यासमोर इतर कोणीटी टिकू शकत नाही. नीता अंबानी यांचा वैयक्तिक मेकअप आर्टिस्ट आहे. ज्याच्याकडे अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळेच उन्हाळा असो की पावसाळा प्रत्येक ऋतूत नीता अंबानी यांचा चेहरा नैसर्गिक त्वचा असल्याप्रमाणे चमकतो. त्यामुळे अंबानी कुटुंबातील महिलांची पहिली पसंती मिकी आहेत.
View this post on Instagram
प्रत्येक कलाकाराची मेकअप करण्याची स्वतःची वेगळी पद्धत असते. जशीच मिकी यांचीही आहे. मिकी यांनी केलेला मेकअप अतिशय वेगळा असतो. अभिनेत्रीच्या डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी ते अनेकदा काजल आणि स्मोकी आय मेकअपचा वापर करतो. पण मिकी यांनी केलेला बहुतेक मेकअप नो मेकअप लुक किंवा न्यूड मेकअपच्या श्रेणीत आहे, जो प्रत्येक सौंदर्याचे ग्लॅमर वाढवतो.
या बॉलिवूड अभिनेत्रींचा मेकअप करा
मिकी कॉन्ट्रॅक्टर यांच्या कामाचे कौतुक होतंच. दीपिका पदुकोण असो की आलिया भट्ट, करीना कपूर असो की माधुरी दीक्षित प्रत्येक दिग्गज अभिनेत्रीसोबत त्यांनी काम केले आहे. आता नीता अंबानींचे वैयक्तिक मेकअप आर्टिस्ट असूनही, प्रत्येक वेळी त्यांचा मेकअप वेगळा असतो.