ग्रीन टीच नाही तर ग्रीन कॉफी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

आजकाल फिटनेसबद्दल लोकांमध्ये ग्रीन कॉफीचा ट्रेंड सुरू आहे. वजन कमी करण्यास अनेकजण ग्रीन कॉफीचे सेवन करतात. कारण त्यात क्लोरोजेनिक अॅसिड असते जे चयापचय वाढवते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन कॉफीचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.

ग्रीन टीच नाही तर ग्रीन कॉफी पिण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे
green tea
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Jul 27, 2025 | 12:58 AM

आजच्या धावपळीच्या जीवनात लोक त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लठ्ठपणा वाढणे त्याचबरोबर मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका या समस्या सर्वाधिक प्रमाणात वाढत आहे. तर या समस्या टाळण्याठी तुमचा आहार योग्य असणे महत्त्वाचे आहे. खरं तर, तुम्ही जे काही खाता आणि पिता त्याचा तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो.

अशातच तंदूरस्त राहण्यासाठी बरेच लोक ग्रीन टी सेवन करतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला खूप फायदा होतो. आजकाल सोशल मीडियावर ग्रीन कॉफीचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. तुम्ही सोशल मीडियावर त्याचे नाव ऐकले असेलच. ही ग्रीन टी सामान्य कॉफीपेक्षा थोडे वेगळी दिसते, परंतु आता लोकं ही कॉफी त्यांच्या दिनचर्येचा भाग बनवत आहेत. त्यांच्या फिटनेसची काळजी घेणाऱ्यांमध्ये ग्रीन कॉफी पिण्याचा ट्रेंड जास्त दिसून येतोय.

सामान्य कॉफीपेक्षा ग्रीन कॉफीला सौम्य चव असते. बरेच लोक ते डिटॉक्स ड्रिंक म्हणून देखील सेवन करतात. तसेच तुम्ही ही कॉफी तुमच्या सकाळच्या दिनचर्येत समाविष्ट देखील करू शकतात. तर आजच्या लेखात आपण आरोग्यासाठी ग्रीन कॉफी पिण्याचे काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊयात…

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

ग्रीन कॉफीमध्ये क्लोरोजेनिक नावाचा घटक असते जे तुमच्या शरीरातील चयापचय वाढवण्याचे काम करते. जर तुम्ही ग्रीन कॉफी पिण्यास सुरुवात केली तर कॅलरीज जलद बर्न होतात. त्यामुळे वजन कमी देखील लवकर कमी होईल.

मधुमेहात फायदेशीर

जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही ग्रीन कॉफीचे सेवन करू शकता. ग्रीन कॉफी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. तसेच त्यात असलेले क्लोरोजेनिक अॅसिड इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते. यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो.

शरीराला डिटॉक्स करा

ग्रीन कॉफी प्यायल्याने शरीर स्वच्छ होते. तसेच शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते. हि कॉफी अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने तुमची त्वचा, केस आणि एकूण आरोग्य सुधारण्यास मदत करते.

तुमचे हृदय निरोगी ठेवा

ग्रीन कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होते आणि रक्तवाहिन्यांची योग्य कार्यक्षमता राखली जाते. जेव्हा रक्तवाहिन्या निरोगी असतात तेव्हा हृदयरोगाचा धोका देखील कमी होतो.

तुमचा मेंदू निरोगी ठेवा

ग्रीन कॉफीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स तुमच्या मेंदूला निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे मेंदूच्या आजाराचा धोका कमी होऊ शकतो. तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक कप ग्रीन कॉफी प्यावी.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)