Oily Skin | तेलकट त्वचेच्या समस्येने हैराण? मग ‘या’ गोष्टी खाणे टाळा!

प्रत्येक प्रकारच्या त्वचेची स्वतःची वेगळी समस्या असते. परंतु, जर त्वचा तेलकट असेल तर त्वचेच्या या समस्या अधिक त्रास देतात. यामध्ये बहुतेक वेळा मुरुम आणि पिटिका या सामान्य समस्यांचा समावेश असतो.

Oily Skin | तेलकट त्वचेच्या समस्येने हैराण? मग ‘या’ गोष्टी खाणे टाळा!
घरच्या घरी बनवा हे खास घरगुती मॉइश्चरायजर्स
Harshada Bhirvandekar

|

Mar 01, 2021 | 12:43 PM

मुंबई : प्रत्येक प्रकारच्या त्वचेची स्वतःची वेगळी समस्या असते. परंतु, जर त्वचा तेलकट असेल तर त्वचेच्या या समस्या अधिक त्रास देतात. यामध्ये बहुतेक वेळा मुरुम आणि पिटिका या सामान्य समस्यांचा समावेश असतो. यामुळे, आपल्या संपूर्ण चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते (Oily Skin problem avoid these food ingredient in meal).

यामुळेच जर, आपण आपल्या त्वचेची काळजी घेत असाल, तर आपल्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. यामुळे मुरुम आणि पिटिकांच्या समस्येपासून आपण लवकरच मुक्त व्हाल आणि आपला चेहरा देखील चमकदार होईल. आज आपण अशा गोष्टींबद्दल जाऊन घेणार आहोत, ज्या तेलकट त्वचेच्या समस्येस चालना देण्याचे काम करतात. जर हे आपले देखील आवडते पदार्थ असतील, तर आपण त्यांची मात्रा मर्यादित करू शकता. जेणेकरुन चेहऱ्यावर सतत वाढणारी मुरुम तुम्हाला पुन्हा त्रास देणार नाहीत…

डेअरी उत्पादने

वास्तविक, डेअरी उत्पादनांमुळे शरीर आणि त्वचा सुंदर बनते. मात्र, जेव्हा तुमची त्वचा तेलकट असते, तेव्हा स्थिती किंचित बदलते. जर, आपली त्वचा तेलकट असेल, तर आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये टोफू, चीज, मावा, मलई लस्सी, सावर क्रीम, मावा मिठाई इत्यादी गोष्टी समाविष्ट करू नयेत.

या डेअरी उत्पादनांसाठी दही आणि ताक हा उत्तम पर्याय असू शकतो. आपण दही आणि ताक आपल्या आहारात सामील करू शकता. परंतु, या व्यतिरिक्त आपण आपल्या शरीराच्या कॅल्शियम आणि प्रथिने आवश्यकतेसाठी हिरव्या भाज्या, डाळ आणि फळांचा आहारात समावेश करावा.

जास्त मीठाचा वापर

तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी मीठयुक्त स्नॅक्स टाळावे. यामध्ये भरपूर मीठ आणि मसाले वापरले जातात. कारण, हे दोन्ही घटक आपल्या त्वचेतील पाण्याची पातळी कमी करण्याचे काम करतात.

बाजारात उपलब्ध चिप्स, क्रिप्स आणि फ्रेंच फ्राई यांचे सेवन केल्याने आपल्या त्वचेत जळजळ आणि ट्रान्स फॅटची समस्या वाढते. यामुळे त्वचा डल, सैल आणि कुरूप दिसू लागतात. म्हणून, आपण जास्त प्रमाणात मीठ आणि मसाले असलेले पॅकेज्ड, कॅन केलेळे किंवा तयार खाद्य पदार्थ टाळावेत (Oily Skin problem avoid these food ingredient in meal).

लाल मांस खाणे टाळा

आपल्याला जर मांसाहारी खाणे आवडत असेल, तर आपण बकरीचे मांस खाणे टाळावे. यात असणारी चरबी आपल्या शरीरात जमा होते आणि लठ्ठपणा वाढण्याबरोबरच त्वचेचा दाह देखील होतो. या जळजळीमुळे आपल्या त्वचेच्या पेशींना संपूर्ण पोषण मिळत नाही. त्यांना रक्ताचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही आणि परिणामी मुरुम आणि पिटिका आपल्या तेलकट त्वचेत वाढू लागतात.

साखरयुक्त खाद्य आणि ज्यूस

मुख्यतः फळांचा रस तयार करताना, त्यात गोडवा वाढवण्यासाठी आणखी साखर मिसळली जाते. म्हणून, हा रस आपल्यासाठी तितका फायदेशीर नाही. यापेक्षा ताजी फळे खावीत. म्हणून, रस पिण्याऐवजी फळांचे सेवन करा. केक, डोनट्स, पेस्ट्रीसारखे पदार्थ खाणे टाळा, जे तयार करताना जास्त साखर वापरतात. कारण, जर साखर तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात गेली, तर ती तुमच्या रक्तात विरघळते आणि संपूर्ण शरीरात पसरते. यामुळे आपल्या त्वचेच्या पेशींना पुरेसे पोषण आणि ऑक्सिजन प्रदान करणार नाही.

तसेच, साखरेच्या प्रभावांमुळे, आपल्या त्वचेमध्ये असलेल्या सेबम ग्रंथी अधिक सक्रिय होतील आणि आपल्या चेहऱ्यावर चिकटपणा जास्त वेळ राहीला, तर तेलाची समस्या वाढेल. म्हणून, आपण कमी साखर आणि कमी मीठ वापरून बनवलेल्या कुकीज आणि स्नॅक्स खावेत (Oily Skin problem avoid these food ingredient in meal).

मैदायुक्त अन्न

बाजारपेठेत मिळणारे बरेच कॅन केलेले पदार्थ आणि फास्ट फूड मैद्यापासून तयार केले जातात. मैदा आपल्या आतड्यांमधील अन्न पचवण्याची क्षमता कमी करते. कारण, मैदा पूर्णपणे पचत नाही आणि आतड्यांमध्येही अडकते. ज्यामुळे पोट योग्य प्रकारे साफ होत नाही.

जेव्हा, पोट साफ नसते, तेव्हा बद्धकोष्ठतेची समस्या सुरू होते. जर, आपली त्वचा तेलकट असेल आणि बद्धकोष्ठता समस्या असेल, तर आपल्या शरीरावर मुरुम आणि पिटिकांना प्रतिबंधित करू शकत नाही. म्हणून, केवळ गव्हाच्या पीठापासून बनवलेल्या गोष्टी वापरा. नियमितपणे मैद्याचे पदार्थ खाऊ नका आणि खायचेच असतील, तर जास्त खाऊ नका.

‘या’ गोष्टी खाणे तुमच्यासाठी फायदेशीर

बाजारात उपलब्ध असलेले स्नॅक्स तुम्हाला खायचे असेल, तर तुम्ही तांदूळ, गव्हाचे पीठ, बेसन किंवा मिक्स फ्लोअरपासून तयार केलेले स्नॅक्स निवडा. बाजारात गव्हाच्या पीठापासून तयार केलेल्या कुकीज आणि हरभरा पीठाने बनवलेले स्नॅकही तुम्हाला सापडतील.

जेव्हा जेव्हा बाहेर काही खावे वाटत असेल, तेव्हा आपण दक्षिण भारतीय भोजन निवडले तर ते चांगले. आपणास हे पदार्थ सर्वत्र सहज सापडतील आणि त्यामध्ये साखर किंवा मीठाचे प्रमाण देखील कमी असते. तसेच, ते तयार करण्यासाठी जास्त तेलाचा वापर केला जात नाही. म्हणून तुम्ही इडली, डोसा, दही-वडा, रसम किंवा दक्षिण भारतीय शैलीमध्ये बनवलेले विविध प्रकारचे पदार्थ खावेत.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Oily Skin problem avoid these food ingredient in meal)

हेही वाचा :

Rice Water | केस आणि त्वचेचे आरोग्य सुधारेल ‘तांदळाचे पाणी’, वाचा याचे फायदे…

Pudina Benefits | आरोग्यवर्धक गुणांचा खजिना ‘पुदीना’, ‘या’ आजारांवर ठरेल गुणकारी!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें