AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DMart मध्ये कोणत्या दिवशी सामान सर्वात स्वस्त असतं? 99 टक्के लोकांना माहित नसेल

DMart मध्ये सामान खरेदी करण्यासाठी सगळ्यांनाच आवडतं. कारण सर्वांना आपल्या बजेटमध्ये खरेदी करता येते पण तुम्हाला माहितीये का की, Dmart मध्ये असेही काही दिवस असतात ज्यादिवशी सामान हे नेहमीपेक्षा कमी किंमतीत असतं. पाहुयात ते खास दिवस कोणते आहेत ते.

DMart मध्ये कोणत्या दिवशी सामान सर्वात स्वस्त असतं? 99 टक्के लोकांना माहित नसेल
DMartImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 04, 2025 | 3:25 PM
Share

महिन्याच्या सुरुवातीला सामान भरायचं म्हटलं की सर्वांना एकच ठिकाण आठवतं ते म्हणजे Dmart. कारण हव ते आणि चांगल्या दर्जाचं शिवाय आपल्या बजेटमध्ये बसणारं अन् भरपूर सूट असणारं हे सर्वांच्या आवडीचं ठिकाण आहे. DMart ही भारतातील सर्वात लोकप्रिय रिटेल साखळींपैकी एक आहे. इथून हजारो लोक आपल्या महिन्या भराचं सामान भरतात. मग त्यात धान्य असोत, मसाले असोत किंवा मग लॉन्ड्री सामान. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांसाठीचं हे एक आवडीचं ठिकाणं आहे.

इथे काही वस्तू इतक्या स्वस्त मिळतात की थेट अर्ध्या किंमतीत तुम्ही वस्तू विकत घेऊ शकता. यासाठी बायवन-गेट-वन अशी स्पेशल स्कीम देखील डिमार्टमध्ये असते. त्यामुळे तिथे ग्राहकांची नेहमीच मोठी गर्दी असते.

सामान सगळ्यात स्वस्त कधी असतं?

पण तुम्ही कधी एक गोष्ट लक्षात घेतली आहेत का? की बऱ्याचदा DMart मध्ये वेगवेगळ्या दिवशी सामानाची किंमत किंवा डिस्काउंट वेगवेगळा असतो. DMart मध्ये दररोज अनेक वस्तूंवर डिस्काउंट्स असतात, पण एखादा ठराविक वार किंवा दिवस असा नाही की ज्या दिवशी सर्वच वस्तू स्वस्त मिळतात. DMart चं मॉडेलच असं आहे की ते नेहमीच MRP पेक्षा कमी दरात वस्तू विकतात. पण असाही एक दिवस असतो ज्याजिवशी सामान सगळ्यात स्वस्त असतं? होय DMart असा दिवस असतो जेव्हा सामान नेहमीच्या दरापेक्षाही स्वस्त असतं. ही गोष्ट कदाचितच लोकांना माहित असेल.

ते खास दिवस कोणता जेव्हा DMart मध्ये सामानाची नेहमीपेक्षा कमी किमंत असते

वीकेंड सेल म्हणजे शुक्रवार ते रविवार. या दिवांमध्ये तुम्हाला बऱ्याच चांगल्या ऑफर पाहायला मिळतात. विकेंड असल्याने या दिवसांमध्ये ग्राहकांची गर्दीही जास्त असते. या काळात FMCG, ग्रोसरी, कपडे, ब्यूटी प्रॉडक्ट्स यावर विशेष ऑफर्स असतात. काही स्टोअर्समध्ये Buy 1 Get 1 Free किंवा त्याहून जास्त फायदेशीर डील्सही दिल्या जातात.

सोमवारी काही वेळा ‘क्लीन-अप डिस्काउंट’

रविवारनंतर काही स्टोअर्समध्ये सोमवारी मालाची स्टॉक क्लिअरन्स असते. यावेळी काही निवडक वस्तूंवर थोडासा अधिक डिस्काउंट असलेला पाहायला मिळतो. पण ती ऑफर प्रत्येक सोमवारी नसते.

DMart Ready App वर ऑनलाइन डील्स

जर तुम्ही DMart Ready म्हणजे त्यांचं ऑनलाइन अ‍ॅप वापरत असाल, तर तुम्हाला विशिष्ट दिवसांमध्ये ऑनलाइन डील्स आणि कूपन्स मिळू शकतात. काहीवेळा सोमवार किंवा बुधवारच्या दिवशी ऑनलाइन खरेदीवर अधिक फायदा मिळतो.

सणांच्या दिवशी असते ही खास ऑफर

DMartमधील वस्तुंच्या किंमती सणांच्या दिवसांमध्ये देखील नेहमीपेक्षाही कमी असतात. जसं की दिवाळी, होळी, नाताळ, नवीन वर्ष यावेळी इथे अनेक मोठ्या ऑफर्स येतात. या वेळी खरेदी केल्यास अधिक फायदा होतो.

तर अशा पद्धतीने तुम्हाला आता समजलं असेलच की DMart मध्ये खरेदी करण्याचा खास वार कोणता ते. तसेच सणांच्या दिवसांमध्ये तर आवर्जून भेट द्या कारण DMart आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवीन वस्तू आणि नवीन ऑफर घेऊन येतच असतात. त्यामुळे बजेट कायम राखून आपण नक्कीच खरेदीही करू शकतो.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.