Vitamin : नाहीतर पडेल लवकरच टक्कल…! केस पातळ होणे, नखे तुटने.. ही लक्षणे आहेत ‘बायोटिन’ च्या कमतरतेची; वेळीच आहारात करा ‘या’ गोष्टी समाविष्ट

हवामान, प्रदूषण आणि इतर कारणांमुळे केस पातळ आणि निर्जीव होऊ शकतात. पण जर तुमचा आहार योग्य नसेल तर त्यामुळे केस गळण्याची शक्यता असते. आहाराकडे दुर्लक्ष केल्याने, शरिरात आवश्यक पोषण घटक जात नाहीत त्यामुळे केस गळतीची समस्या वाढते.

Vitamin : नाहीतर पडेल लवकरच टक्कल...! केस पातळ होणे, नखे तुटने.. ही लक्षणे आहेत ‘बायोटिन’ च्या कमतरतेची; वेळीच आहारात करा ‘या’ गोष्टी समाविष्ट
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 4:47 PM

मुंबई : तुमचे केस गळत असतील, कमकुवत होत असतील किंवा नखे तुटत असतील तर, तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी7 ची कमतरता (Vitamin B7 deficiency) असू शकते. याला बायोटिनची कमतरता म्हणून ओळखले जाते. त्याच्या कमतरतेमुळे, स्नायूंचा थकवा, कमकुवतपणा, चक्कर येणे, वारंवार मुंग्या येणे (Frequent tingling) किंवा पाय सुन्न होणे यासारखी लक्षणे दिसतात. सेलेब्रेटी न्यूट्रिशन नमामी अग्रवाल यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने बायोटिनच्या कमतरतेचा शरीरावर कसा परिणाम होतो आणि कोणते पदार्थ खावून, तुम्ही बायोटिनची कमतरता भरून काढीत, तुमचे केस निरोगी आणि मजबूत बनवू शकता हे सांगितले आहे. बायोटिन हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व (Water soluble vitamins) आहे. हे व्हिटॅमिन बी ची कमी पूर्ण करते. शरीराला काही पोषक घटकांचे ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी बायोटिनची गरज असते. हे केस, त्वचा आणि नखे निरोगी ठेवण्यास देखील मदत करते.

बायोटिनची कमतरता असल्यास

जर शरीरात बायोटिनची कमतरता असेल तर केस गळणे किंवा त्वचेवर पुरळ येण्याची समस्या असू शकते. त्याच्या कमतरतेमुळे नखांमध्ये कमकुवतपणा सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. दरम्यान, त्याच्या कमतरतेची प्रकरणे दुर्मिळ आहेत. बहुतांश प्रकरणांमध्ये, अन्नातील बायोटिन हे व्यक्तीला कार्य करण्यास प्रवृत्त करते. परंतु जर एखाद्याला पुरेसे बायोटिन मिळत नसेल, तर त्यांना केस गळणे, त्वचेवर लाल पुरळ उठणे, केसांत कोंडा होण्याची समस्या सुरू होते.

इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून दिली माहिती

सेलेब्रेटी न्यूट्रिशन नमामी अग्रवाल यांनी इंस्टाग्रामवर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, बायोटिन आपल्या शरीरात अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर करण्याचे काम करते. तिच्या मते, त्याची कमतरता फार कमी प्रकरणांमध्ये दिसून आली आहे, परंतु जर ती असेल तर केस पातळ होणे, फाटणे, नखे तुटणे, थकवा आणि इतर लक्षणे दिसून येतात. त्यांनी पुढे सांगितले की, शरीरातील त्याची कमतरता तुम्ही अंडी, मासे यांसारख्या पदार्थांनी पूर्ण करू शकता.

हे सुद्धा वाचा

बायोटिनच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हे पदार्थ खा

अंड्यांसोबत भाज्या खाल्ल्याने शरीराला केवळ बायोटिनच नाही तर इतर अनेक पोषक तत्वांचा पुरवठा होतो. यासाठी एका भांड्यात चिरलेली उकडलेली अंडी घाला आणि त्यात पालक, लिंबू, भाजलेले जिरे, बुंदी आणि इतर भाज्या घाला. नाश्ता किंवा दुपारच्या जेवणात ते खा. यामध्ये तुम्हाला हेवी कुकिंग करावे लागणार नाही आणि बनवायलाही सोपे आहे.

चीज कोबी

तुम्ही कधी चीझी कोबी डिश खाल्ले आहे का? मुलांनाही खूप आवडेल. यासाठी कोबीचे फूल कापून त्यावर चीज पसरवा. त्यात मीठ व इतर मसाले घालून बेक करावे. आठवड्यातून दोनदा हे खा आणि तुम्हाला फरक दिसेल.

फिश करी

मासे हे अनेक महत्त्वाच्या पोषक तत्वांचे भांडार मानले जाते. भाज्यांसोबत फिश बनवून तुम्ही ते आणखी हेल्दी बनवू शकता. फिश करी बनवताना त्यात मसाले आणि ताज्या भाज्या वापरा. हेल्दी असण्यासोबतच ते चवदारही असते.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.