Paneer | आवडतं म्हणून जास्त ‘पनीर’ खाताय? थांबा, याचे दुष्परिणाम वाचा…

ज्या लोकांच्या शरीरात युरिक ऑसिडचं प्रमाण वाढलेलं असतं, त्यांना प्रोटीनयुक्त पनीर न खाण्याचा सल्ला दिला जातो.

Paneer | आवडतं म्हणून जास्त ‘पनीर’ खाताय? थांबा, याचे दुष्परिणाम वाचा...
पनीर
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 12:27 PM

मुंबई : पनीर हा पदार्थ सगळ्यांच्या घरी आवर्जून खाल्ला जातो. दुधापासून तयार करण्यात आलेलं पनीर अत्यंत पौष्टिक असतं. यात चांगले फॅट्स देखील असतात. आपल्या आहारात पनीरचा योग्य पध्दतीने वापर कसा करावा हे माहिती असणं आवश्यक आहे. पनीर खाण्यामुळे शरीराला प्रथिनं मिळतात. पनीरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक सुद्धा मुबलक प्रमाणात असतं. पनीर खाणं सर्वांसाठी आरोग्यदायी असतं. तसेच ज्या लोकांच्या शरीरात युरिक ऑसिडचं प्रमाण वाढलेलं असतं, त्यांना प्रोटीनयुक्त पनीर न खाण्याचा सल्ला दिला जातो. जे नियमित व्यायाम करतात त्यांनी मात्र पनीर खाणं गरजेचं असतं. मात्र ते कधी आणि किती प्रमाणात खायला हवं, हे जाणून घेणे गरजेचे आहे. याचे जितके फायदे आहेत, तितकेच तोटे देखील आहेत (Paneer over eating harmful side effects).

पनीरचं नियमित सेवन केल्याने शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होत नाही. तसेच, लिव्हर मजबूत राहते. वाढत्या वयासोबत उद्भवणाऱ्या समस्यांपासून बचाव करण्यात पनीरच सेवन फायदेशीर ठरतं. पनीरच नियमित सेवन केल्यान सांधेदुखी समस्या दूर राहते. पनीर एका दिवसात 200 ग्रॅमहून अधिक खाऊ नये.

एका वेळेत केवळ 100 ग्रॅम पनीर शरीराला पुरेसं असतं. तसेच, रात्री उशिरा पनीर खाऊ नये. पनीर नेहमी वेगवेगळ्या भाज्यासोबत मिक्स करून खावं. त्यातील प्रोटीन आणि फायबरमुळे पोट खूप वेळेसाठी भरलेलं जाणवतं. पनीर आणि हंगामी भाज्या बरोबर प्रमाणात खाव्यात, कारण पनीरमध्ये सोडियमचं प्रमाण खूप असतं जे भाज्यांमध्ये असलेल्या पोटॅशियमसोबत मिसळून हाय फायबर डाएटमध्ये रूपांतरीत होतं.

जास्त पनीर सेवन करण्याचे दुष्परिणाम

– जर आपण आपले हृदय निरोगी ठेऊ इच्छित असाल आणि कोलेस्ट्रॉल देखील आपल्या नियंत्रणात ठेवू इच्छित असाल तर पनीरचे सेवन कमी करा. पनीरचे जास्त सेवन केल्याने तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते आणि जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला हृदयरोगाचा धोका देखील संभवतो (Paneer over eating harmful side effects).

– यात सोडियमचे अर्थात मीठाचे प्रमाण खूप जास्त आहे. यामुळे, जर आपण जास्त पनीर सेवन केले तर त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. ज्यांना आधीच रक्तदाबचा त्रास आहे, त्यांनी विशेषतः पनीर खाणे टाळावे.

– अॅसिडीटीचा त्रास असणाऱ्या लोकांनी देखील पनीरचे सेवन कमी करणे आवश्यक आहे. जर, तुम्हाला पनीर खायचेच असेल, तर रात्रीच्या वेळी खाऊ नका. जर आपण ही पद्धत लक्षात ठेवली, तर अॅसिडीटीची समस्या उद्भवणार नाही.

– दुधापासून बनणारा पनीर प्रोटीनचा चांगला स्रोत मानला जातो. परंतु, शरीरात प्रथिनांचे प्रमाण जास्त झाल्यास अतिसाराचा त्रास होऊ शकतो. म्हणून, पनीर जास्त प्रमाणात खाऊ नये.

– बऱ्याच लोकांना कच्चा पनीर खाणे फार आवडते.  पण, ही फार चांगली सवय नाही. वास्तविक, कच्चे पनीर सेवन केल्याने आपल्याला संसर्गाचा धोका संभवतो.

(Paneer over eating harmful side effects)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.