
भारतातील बरेच लोक वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहेत. यामुळे अनेकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. लठ्ठपणामुळे शरीराचा आकार खराब होतो तसेच आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अनेकजन डाएटिंग, वर्कआउट आणि आणि इतर अनेक गोष्टी वापरून पाहतात. मात्र यामुळे वजन कमी होत नाही. आज आपण रामदेव बाबांनी सांगितलेला वजन कमी करण्याचा मार्ग जाणून घेणार आहोत.
अनेकजण एका महिन्यात 1 किलो वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र हे शक्य होत नाही. मात्र योगगुरू बाबा रामदेव यांनी एक असा मार्ग सांगितला आहे, ज्यामुळे तुम्ही दररोज 1 किलो वजन कमी करु शकता. योग आणि व्यायामांमुळे हे शक्य होते. रामदेव बाबांनी यासाठी खास आहार आणि टिप्स सांगितल्या आहेत ज्यामुळे दररोज 1 किलो वजन कमी होऊ शकते.
वजन कसे कमी करायचे?
रामदेव बाबा यांनी आपल्या सोशल मीडियावर वजन कमी करण्याबाबत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. याच त्यांनी लठ्ठपणा कमी करण्याचा एक मार्ग सांगितला आहे. बाबा रामदेव यांच्या मते वजन वाढणे हे अनेक आजारांचे घर आहे. यांमुळे रक्तदाब आणि साखरेची पातळी वाढते. तसेच हृदयरोग होतो आणि पाठदुखी देखील होते. त्यामुळे वजन कमी करणे गरजेचे आहे.
या गोष्टी खाणे टाळावे
बाबा रामदेव यांनी लठ्ठपणा कमी करण्यासाठी मीठ, धान्य, मिठाई, दूध, तूप अशे पदार्थ खाणे बंद करण्यास सांगितले आहे. तुम्ही हे पदार्थ न खाल्ल्यास तुमच्या शरिरातील चरबी वितळेल आणि ती अन्न म्हणून काम करेल. यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळेल. याचाच अर्थ तुम्हाला अन्नातून मिळणारी ताकद ही चरबीतून मिळेल, यामुळे तुमचे वजन कमी होईल.
कोणते पदार्थ खावेत
रामदेव बाबांनी सांगितले की, तुम्हाला 1 दिवसात 1 किलो वजन कमी करायचे असेल तर आहारात काही गोष्टी सामील कराव्या लागतील. तुम्हाला धान्य खाणे बंद करावे लागेल त्याऐवजी फक्त सॅलड, टरबूज, खरबूज आणि उकडलेल्या भाज्या खाव्या लागतील. यामुळे तुमचे वजन वेगाने कमी होईल. एक वर्ष हा आहार घेतल्याने पोटाची चरबी पूर्णपणे कमी होऊल आणि तुमचे वजन नक्कीच कमी होईल.