जर विमान उडवताना पायलटचा मृत्यू झाला तर… प्रवाशांचे प्राण कसे वाचवले जाणार?
विमानप्रवासाबद्दल सध्या अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यात अनेक प्रश्न प्रवाशांच्या मनात उपस्थित होत असतात. पण जर समजा उड्डाणादरम्यान पायलटचा मृत्यू झाला तर प्रवाशांचा जीव नक्कीच धोक्यात येऊ शकतो. अशावेळी कोणत्यापद्धतीने प्रवाशांची काळजी घेतली जाते हे जाणून घेऊयात.

आजकाल सर्वांसाठी विमान प्रवास सोपा झाला आहे. जगभरातील विमान कंपन्यांच्या विमानांमध्ये दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. विमानाबाबतच्या काही दुर्घटना अशा घडल्या आहेत की त्यामुळे विमान प्रवास करताना आताही लोकांना भीती वाटतेय. प्रवशांना सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी ही वैमानिकाची असते. पण कधी कधी परिस्थिती त्याच्या हातातही नसते आणि त्यामुळे दुर्घटना होतात.
अचानक वैमानिकाचा मृत्यू झाला तर प्रवाशांचे प्राण कसे वाचवले जाणार?
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जर विमान प्रवासादरम्यान अचानक वैमानिकाचा मृत्यू झाला तर प्रवाशांचे प्राण कसे वाचवले जाणार ते. विमान उडवताना जर एखाद्या वैमानिकाचा मृत्यू झाला तर काय होईल? विमानाने प्रवास करणाऱ्या लोकांनी याबद्दल क्वचितच विचार केला असेल. मोठी विमाने उडवणारे व्यावसायिक वैमानिक खूप कुशल आणि व्यावसायिक असतात. सर्व प्रकारच्या आरोग्य तपासणीनंतरच ते कॉकपिटमध्ये प्रवेश करतात.
विमानातील प्रवाशांचा जीव नक्कीच धोक्यात येऊ शकतो
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तसेच सुरक्षित प्रवासासाठी तेवढी काळजी तर नक्कीच घेतली जाते. पण काहीवेळेला वैमानिकालाही उड्डाण करताना आजारपण, दुखापत किंवा जीवघेण्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशा परिस्थिती विमानातील प्रवाशांचा जीव नक्कीच धोक्यात येऊ शकतो. मग अशा वेळेसे प्रवाशांची सुरक्षा हा एक मुद्दा महत्त्वाचा असतो. अशावेळी त्यांची सुरक्षा कोण करणार हा प्रश्न असतो.
एका वृत्तानुसार, ऑक्टोबर 2024 मध्ये टर्किश एअरलाइन्सचे जेट उड्डाणादरम्यान कोसळून पायलट इल्सेहिन पेहलिवान (59) यांचा मृत्यू झाला. त्यानंतर विमानाचे न्यू यॉर्कमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमान सिएटलहून इस्तंबूलला जात होते.
उड्डाणापूर्वी त्यांच्या वैमानिकांच्या आरोग्याची तपासणी केली जाते
स्कायवेस्ट एअरलाइन्सचे कॅप्टन अॅडम कोहेन यांच्या मते, काही एअरलाइन्स प्रत्येक उड्डाणापूर्वी त्यांच्या वैमानिकांच्या आरोग्याची तपासणी करतात. जर एखादा वैमानिक आजारी असेल, औषधोपचार घेत असेल, किंवा तणावाखाली असेल, मद्यधुंद, थकलेला किंवा आजारी दिसला तर त्याला उड्डाण टाळण्याचा सल्ला दिला जातो.
उड्डाणादरम्यान कर्णधार आजारी पडला किंवा त्याचा मृत्यू झाला तर
प्रत्येक व्यावसायिक उड्डाणात फक्त एकच नाही तर किमान दोन वैमानिक असतात. एक कॅप्टन आणि एक सह-वैमानिक. म्हणजे पायलट आणि को-पायलट. जर उड्डाणादरम्यान कर्णधार आजारी पडला किंवा त्याचा मृत्यू झाला तर को-पायलट ताबडतोब उड्डाणाची संपूर्ण जबाबदारी घेतो.
आपत्कालीन लँडिंग केले जाते.
जर वैमानिक उड्डाणादरम्यान आजारी पडला किंवा त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या को-पायलटने ताबडतोब उड्डाणाच्या सर्व जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजेत. अशा परिस्थितीत, को-पायलटने आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली पाहिजे आणि मानक कार्यपद्धतींचे पालन केले पाहिजे. यामुळे अनेकदा आपत्कालीन लँडिंग केले जाते. अशावेळी आपत्कालीन परिस्थिती घोषित करून एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे (ATC) शी संपर्क साधते. त्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी जवळच्या विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले जाते.
म्हणजे उद्या अशी कोणती परिस्थीत आली तर नक्कीच को-पायलटच्या मदतीने प्रवाशांचा जीव वाचवला जातो. त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जातात.
