उन्हाळ्यात ‘या’ 7 पद्धतीने साठवा कांदे-बटाटे, खराब होण्याचा सवालच नाही !
उन्हाळ्यात बटाटे आणि कांदे योग्य प्रकारे साठवले नाहीत तर ते लवकर खराब होऊ शकतात. चला तर मग आजच्या लेखात आपण कांदे बटाटे उन्हाळ्याच्या दिवसात साठवून ठेवण्याच्या काही टिप्स जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात अनेक पदार्थ लवकर खराब होतात, विशेषतः कांदे आणि बटाटे. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कांदे बटाटे अधिक दिवस साठवून ठेवणे खूप आव्हानात्म ठरते. तीव्र उष्णतेमुळे बटाटे आणि कांदे अनेकदा लवकर खराब होतात आणि त्यांना वास येऊ लागतो, ज्यामुळे संपूर्ण घरात त्यांचा वास पसरतो. मात्र काही जुने घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही बटाटे आणि कांदे जास्त दिवस ताजे व सुरक्षित ठेवू शकता. चला या काही उपायांबद्दल जाणून घेऊयात.
सर्वप्रथम आपण कांदा उन्हाळ्यात योग्य प्रकारे कसा साठवायचा याबद्दल जाणून घेऊयात.
- कांदे सुरक्षित जागी ठेवण्याची पद्धत:
कांदे जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी ते थंड, कोरड्या आणि हवेशीर जागी ठेवा. थोड्याशा ओलाव्यामुळेही कांदे लवकर खराब होऊ शकतात. तसेच ते थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या, कारण उष्णता आणि प्रकाशामुळे कांद्यांना बुरशी लागण्याची आणि कांदे खराब होण्याचा धोका अधिक वाढतो.
2. जास्त दिवस ताजे व सुरक्षित ठेवण्याची पद्धत:
तुम्हाला जर कांदे जास्त दिवस चांगले ठेवायचे असतील, तर प्रत्येक कांदा हा टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवणे हा एक चांगला उपाय आहे. टिश्यू पेपर अतिरिक्त ओलावा शोषून घेतो, ज्यामुळे कांदे लवकर खराब होण्यापासून वाचतात. कांदे कधीही प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवू नयेत, कारण त्यामुळे हवेचा योग्य संचार होत नाही आणि ओलावा साचून ते खराब होतात. कांदे जाळीच्या पिशव्यांमध्ये किंवा हवाबंद कापडी पिशव्यांमध्ये ठेवणे देखील उत्तम आहे. यामुळे हवेचा योग्य संचार होतो, ज्यामुळे कांदे बऱ्याच दिवस खराब होत नाहीत.
3. कांदे बटाट्यांसोबत का ठेवू नयेत ?
कांदे नेहमी कोरड्या, थंड आणि अंधाऱ्या जागी, जसे की हवेशीर स्वयंपाकघरातील कोपरा किंवा रॅकमध्ये ठेवावेत. ते कधीही बटाट्यांसोबत एकाच ठिकाणी ठेवू नयेत, कारण त्यामुळे एकमेकांच्या आर्द्रतेवर परिणाम होऊ शकतो आणि बटाटे अधिक लवकर खराब होऊ शकतात.
4. कांदे थेट जमिनीवर ठेवू नका
कांदे थेट जमिनीवर ठेवण्याऐवजी टोपलीत किंवा क्रेटमध्ये ठेवणे उत्तम, जेणेकरून कांद्यांमध्ये हवा खेळती राहील. ओलावा साचू नये आणि ते जास्त काळ टिकावेत यासाठी तुम्ही कांदे टांगूनही ठेवू शकता.
आता आपण जाणून घेऊयात की उन्हाळ्यात बटाटे साठवण्याची योग्य पद्धत कोणती आहे.
5. योग्य साठवणूक आवश्यक
बटाटे नेहमी थेट सूर्यप्रकाशापासून दूर आणि तापमान फार जास्त नसलेल्या ठिकाणी ठेवले पाहिजेत. याव्यतिरिक्त बटाटे ठेवत असलेली जागा कोरडी आणि हवेशीर असावी. यामुळे बटाटे बऱ्याच दिवस खराब होत नाहीत.
6. बटाटे कोणत्या पिशवीत ठेवावेत?
बटाटे कधीही प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवू नका. यामुळे हवा खेळती राहत नाही आणि ओलावा साचतो, ज्यामुळे ते लवकर खराब होतात. बटाटे नेहमी जाळीच्या पिशव्या, कागदी पिशव्या किंवा टोपल्यांमध्ये ठेवावेत, जेणेकरून हवा व्यवस्थित खेळती राहील आणि ओलावा साचणार नाही.
7. बटाटे साठवण्यापूर्वी धुवावेत का?
बटाटे साठवण्यापूर्वी अधूनमधून तपासावे. जर कोणतेही बटाटे खराब झाले असेल तर किंवा त्यांना कोंब फुटू लागले, तर ते ताबडतोब काढून टाका, जेणेकरून उरलेले बटाटे सुरक्षित राहतील. शिवाय बटाटे साठवण्यापूर्वी धुऊ नयेत, कारण ओलाव्यामुळे ते लवकर खराब होऊ शकतात. गरज वाटल्यास वापरण्यापूर्वी ते धुवा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.)