गर्भावस्थेमध्ये जास्त वेळ उभे राहणे किती सुरक्षित? जाणून घ्या…

गर्भावस्थामध्ये स्त्रीच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात. हे बदल सहजतेने स्वीकारताना स्त्रीने देखील तिच्या काही सवयी बदलल्या पाहिजेत.

गर्भावस्थेमध्ये जास्त वेळ उभे राहणे किती सुरक्षित? जाणून घ्या...
प्रेग्नन्सी
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 3:28 PM

मुंबई : गर्भावस्थामध्ये स्त्रीच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात. हे बदल सहजतेने स्वीकारताना स्त्रीने देखील तिच्या काही सवयी बदलल्या पाहिजेत. अन्यथा स्त्री आणि मूल दोघांनाही धोका निर्माण होऊ शकतो. जसे की गर्भावस्थादरम्यान सतत उभे राहणे बाळासाठी आणि आई या दोघांसाठी धोकादायक आहे. जर एखाद्या महिलेचे कामच जास्त वेळ उभे राहण्याचे असेल तर अशावेळी डाॅक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. (Pregnancy problem know about how much time standing is safe during pregnancy)

-जास्त काळ उभे राहिल्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका निर्माण होऊ शकतो, तर काही स्त्रियांचा रक्तदाब कमी होऊ शकतो. त्याचप्रमाणे जास्त काळ उभे राहिल्याने अशक्तपणा येऊ शकतो. म्हणून, शक्यतो गर्भावस्थामध्ये जास्त काळ उभे राहून कोणतेही काम करणे टाळावे.

-गर्भावस्थादरम्यान महिलांना बहुतेक वेळा एडिमाची समस्या उद्भवते. यात पायात सूज आणि दाब जाणवते. जास्त काळ उभे राहिल्यास पायांची सूज वाढू शकते. गर्भावस्थामध्ये जास्त काळ उभे राहिले तर चक्कर येण्याची देखील शक्यता असते.

-जोपर्यंत गर्भावस्थेमधील स्त्रीला पायात किंवा पाठीत वेदना होत नाहीत किंवा जोपर्यंत ती सहजतेने काम करू शकते तोपर्यंत तिने उभे रहावे. मात्र, पायाला किंवा पाठीला वेदना होत असतील असावेळी बसले पाहिजे थोडा वेळ

असे म्हटले जाते की, बाळामध्ये अनेक सवयी या आईच्या गर्भात असतानाच येतात. गर्भावस्थेच्या तिमाहीत, मुलाला गर्भाशयात त्याच्या आईने सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्याची व ऐकण्याची सवय होते. म्हणूनच गरोदरपणात सक्रिय रहा, कथा ऐका, धार्मिक पुस्तके मोठ्याने वाचा, हलक्या पावलांनी चाला आणि व्यायाम करा. यामुळे शरीरात इंडोरफिन संप्रेरक तयार होते, यामुळे आपण नेहमी आनंदी राहाल आणि हा हार्मोन प्लेसेंटामधून गर्भातील बाळाकडे जाईल. याशिवाय व्हिटामिन डीची कमतरता टाळण्यासाठी, सकाळी 10 वाजण्यापूर्वीच्या कोवळ्या उन्हात किमान 20 मिनिटे बसा. यामुळे, गर्भातील बाळाची हाडे मजबूत होतात आणि शरीर विकसित होते.

संबंधित बातम्या : 

(Pregnancy problem know about how much time standing is safe during pregnancy)

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.