AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात कैरी का खावी? मिळतील ‘हे’ 4 आश्चर्यकारक फायदे

उन्हाळ्यात लोकांना आंबा खायला आवडतो. पण तुम्हाला माहिती आहे का की ते पिकलेल्या आंब्यापेक्षा कच्चा आंबा खाणे जास्त फायदेशीर आहे. उन्हाळ्यात कच्चा आंबा खाल्ल्याने उष्माघात टाळता येतो. कच्च्या आंब्याच्या इतर फायद्यांबद्दल आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया...

उन्हाळ्यात कैरी का खावी? मिळतील 'हे' 4 आश्चर्यकारक फायदे
कैरी खाण्याचे फायदे
| Edited By: | Updated on: Apr 28, 2025 | 12:46 PM
Share

उन्हाळा म्हणजे आंब्याचा हंगाम. या ऋतूत लोकांना भरपूर आंबे खायला आवडतात. पिकलेले आंबे चवीला छान लागतात पण कच्चे आंबे अर्थात कैरीही चवीला अप्रतिम लागते.  कैरी ही चवीला थोडी गोड आणि आंबट तर असतेच, पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. कैरी ही एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही, जर तुम्ही तुमच्या आहाराचा भाग बनवला तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील.

पोषणतज्ञ नमामी अग्रवाल सांगतात की कच्च्या आंब्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे कैरी खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कैरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. कैरी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत हे आपण आजच्या या लेखातून जाणून घेऊया.

उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करा

उन्हाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे उष्माघात. तर यापासून वाचण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात कैरीचा समावेश करावा. कारण कैरी शरीराला थंडावा देते आणि डिहायड्रेशन टाळते. तसेच तुम्ही कैरीचे पन्हं देखील बनवून पिऊ शकता. गोड आणि आंबट असं पन्हं हे शरीराला आतून थंड ठेवतं आणि उष्माघातापासून वाचवतं. त्यात इलेक्ट्रोलाइट्स असतात जे शरीरात पाण्याचे प्रमाण राखतात.

पचनासाठी उपयुक्त

कैरी  पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करते. त्यात फायबर आणि पेक्टिन असते – जे बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनाच्या समस्येपासून आराम देते. जेवणापूर्वी थोडाशी कैरी मीठ आणि काळी मिरी घालून खाल्ल्यास पचन सुधारते आणि भूकही वाढते.

यकृताचे डिटॉक्सिफिकेशन करा

कैरी यकृतासाठी खूप फायदेशीर आहे. हे यकृताला विषमुक्त करते आणि पित्त स्राव नियंत्रित करते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि यकृताचे कार्य चांगले होते.

त्वचा आणि केसांसाठी

कैरीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट-जीवनसत्त्वे त्वचा चमकदार आणि केस मजबूत बनवतात. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते, ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते आणि केस गळण्याची समस्या कमी होते.

कैरी केवळ चवीलाच उत्तम नसून उन्हाळ्यातील अनेक समस्यांवर उपाय देखील आहे. जर तुम्हालाही या उन्हाळ्यात निरोगी आणि फ्रेश राहायचे असेल तर तुमच्या आहारात कच्चा आंबा नक्कीच समाविष्ट करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा