फळ विक्रेते फळं नेहमी पेपरमध्येच का गुंडाळून ठेवतात? जाणून घ्या यामागचे रंजक कारण

तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये फळं खरेदी करायला जाता तेव्हा तुम्ही फळं विक्रेते यांच्या दुकानात गेल्यावर आहेत अनेक फळं ही पेपरमध्ये गुंडाळून ठेवलेली असतात. पण फळं पेपरमध्येच का गुंडाळून ठेवलेली असतात असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच? चला तर मग जाणून घेऊयात या मागचं नेमकं कारण काय आहे?

फळ विक्रेते फळं नेहमी पेपरमध्येच का गुंडाळून ठेवतात? जाणून घ्या यामागचे रंजक कारण
fruits
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Feb 26, 2025 | 3:33 PM

आपलं शरीर निरोगी राहावे यासाठी प्रत्येकजण आहारात पौष्टिक आणि निरोगी पदार्थाचा समावेश करत असतो. तसेच हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश केल्याने आपल्या शरीराला भरपूर पोषक तत्वे मिळतात. विशेषतः तज्ञ सर्व वयोगटातील लोकांना दररोज किमान एक किंवा दोन फळे खाण्याचा सल्ला देत असतात. यासाठी तुम्ही सुद्धा तुमच्या आहारात फळांचा समावेश करण्यासाठी बाजारातून ताजी फळं खरेदी करा. संत्री, सफरचंद, पपई, पेरू, आणि द्राक्षे अशी भरपूर हंगामी फळे बाजारात उपलब्ध असतात. तुम्ही जेव्हा बाजारात जात तेव्हा पहिले असेल की फळ विक्रेते काही फळं पेपरमध्ये गुंडाळून ठेवलेले असतात. फळ विक्रेते असे का करतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल तर चला यामागचे कारण जाणून घेऊयात…

फळे पेपरमध्येच का गुंडाळून ठेवली जातात?

फळ विक्रेते काही फळे पेपरमध्ये गुंडाळून ठेवतात हे तुम्ही फळे खरेदी करताना पहिलेच असेल. तर यामागचं खरं कारण म्हणजे फळे पेपरमध्ये गुंडाळल्याने सुरक्षित आणि ताजी राहतात. तसेच पेपरमध्ये गुंडाळून ठेवल्याने तुम्ही फळे जास्त काळ ठेऊ शकता. कधीकधी फळे थेट उन्हात ठेवल्याने लवकर खराब होऊ शकतात. पेपर हे इन्सुलेटर म्हणून काम करते, त्यामुळे फळे उष्ण तापमानात खराब होण्यापासून रोखतात.

जर पिकलेली फळं पेपरमध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवली तर लवकर खराब होता नाही. तसेच पिकलेल्या फळांपैकी एखाद फळ खराब झालं असेल तर त्या पासून दुसरं फळ खराब होत नाही. त्याचबरोबर अशी अनेक लोकं असतात जी फळांची खरेदी करताना फळ कच्च आहे कि पिकलेलं तपासण्यासाठी फळांमध्ये नखं रोवतात. तेव्हा या सगळ्या गोष्टींपासून संरक्षण करण्यासाठी फळ विक्रेते फळं पेपरमध्ये गुंडाळून ठेवण्याचा मार्ग निवडतात.

विशेषतः जर फळे कच्ची असतील तर ती पेपरमध्ये गुंडाळल्याने नैसर्गिकरित्या पिकण्यास मदत होते. लोक सहसा घाईघाईने कच्ची फळे खरेदी करत नाहीत. म्हणूनच फळ विक्रेते कच्ची पपई, संत्री, पेरू इत्यादी कागदात गुंडाळून ठेवतात.

तर दुसरीकडे बघायला गेले तर, कागद हा जैवविघटनशील असल्याने, फळांच्या पॅकेजिंगमध्ये त्याचा वापर केला जातो. प्लास्टिकने भरलेल्या पॅकेजिंगमुळे पर्यावरणाची हानी होते.

बऱ्याच वेळा ग्राहक स्वच्छतेची खूप काळजी घेतात. अशा परिस्थितीत, पेपरमध्ये पॅक केलेली फळे पाहून ते त्याकडे लवकर आकर्षित होतात आणि ते स्वच्छतेचे कारण समजून खरेदी करतात.

त्याचबरोबर अनेक फळविक्रेते हे फळांना धूळ, घाण आणि जंतूंपासून वाचवण्यासाठी त्यांना कागद व पेपरमध्ये गुंडाळून ठेवणे हा सर्वोत्तम उपाय मानतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)