AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरोग्याचा खजिना! घरच्या घरी बनवा पपईचा हलवा

तुम्ही अनेक गोष्टी खाल्ल्या असतील, पण आज आम्ही तुम्हाला पपईचा हलवा कसा बनवायचा ते सांगणार आहोत. पचनक्रिया चांगली करणारी पपईची ही गोड डिश तुम्हाला नक्कीच आवडेल. चवीबरोबरच हा हलवा आरोग्याचाही खजिना आहे. त्यामुळे गोड पदार्थ खाऊन निरोगी राहायचे असेल तर पपईचा हलवा घरीच बनवा.

आरोग्याचा खजिना! घरच्या घरी बनवा पपईचा हलवा
papaya halwa
| Updated on: Aug 10, 2023 | 3:54 PM
Share

मुंबई: पपई हे सर्व फळांमध्ये प्रत्येक ऋतूत आढळणारे फळ आहे. पपई पोटासाठी खूप फायदेशीर आहे. असे मानले जाते की जर पपईचे सेवन दररोज केले तर यामुळे त्वचा चमकदार आणि निष्कलंक राहते. पपई तुम्ही फ्रूट चाट किंवा नॉर्मल कापून खाल्ली असेलच. पण तुम्ही कधी पपईपासून बनवलेला गोड पदार्थ खाल्ला आहे का? होय, तुम्ही बरोबर वाचलंत.

तुम्ही अनेक गोष्टी खाल्ल्या असतील, पण आज आम्ही तुम्हाला पपईचा हलवा कसा बनवायचा ते सांगणार आहोत. पचनक्रिया चांगली करणारी पपईची ही गोड डिश तुम्हाला नक्कीच आवडेल. चवीबरोबरच हा हलवा आरोग्याचाही खजिना आहे. त्यामुळे गोड पदार्थ खाऊन निरोगी राहायचे असेल तर पपईचा हलवा घरीच बनवा. हे खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल. तसेच अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहाल. चला तर मग जाणून घेऊया पपईचा हलवा बनवण्याची सोपी रेसिपी जी तुम्ही अवघ्या काही मिनिटांत बनवू शकता…

पपईचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • शिजवलेली पपई – १
  • दूध – १/२ लिटर
  • साखर – १/२
  • कप वेलची पावडर – अर्धा चमचा
  • ड्रायफ्रूट्स – १ कप
  • देशी तूप – २ चमचे

पपईचा हलवा कसा बनवायचा

  1. सर्वप्रथम एक पिकलेली पपई घेऊन सोलून त्याचे मोठे तुकडे करावेत.
  2. आता एक कढई घेऊन त्यात देशी तूप घालून मंद आचेवर गॅसवर ठेवावे. मग तूप वितळल्यानंतर त्यात पपईचे तुकडे घालावेत.
  3. दोन ते तीन मिनिटे ढवळत राहा आणि पपईचे तुकडे चांगले मॅश करा.
  4. यानंतर शिजवलेल्या पपईत दूध घालून शिजवून ढवळत राहावे.
  5. यानंतर पपई वेलची पूड घालून चांगले मिक्स करावे.
  6. आता २ ते ३ मिनिटे शिजू द्या. नंतर त्यात साखर घाला.
  7. थोड्या वेळाने त्यात ड्रायफ्रूट्स घालून परतून घ्या.’
  8. थोड्या वेळाने पुडिंगला चांगला वास येऊ लागेल. आता गॅसवरून काढा.
  9. तुमचा पौष्टिक आणि स्वादिष्ट पपईचा हलवा तयार आहे. बाऊलमधून काढा, नंतर ड्रायफ्रूट्सच्या तुकड्यांनी सजवून सर्व्ह करा.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.