‘या’ 3 प्रकारचे लोकं कधीच नसतात आनंदी, त्यांचा चेहरा पाहूनच लोकं करतात तिरस्कार; तुमच्यामध्ये तर नाहीत नं असे गुण
तुम्ही तुमच्या आजूबाजूला इतरांना आनंदी पाहून त्यांचा द्वेष करणारे लोकं पाहिलेच असतील. जे इतरांच्या आनंदात कधी आनंदी नसतात असे लोक आयुष्यात कधीही आनंदी राहू शकत नाहीत. कारण इतरांना आनंदी पाहून ते त्यांच्या वैयक्तिक जीवनात आनंद अनुभवू शकत नाहीत. त्यांचा संपूर्ण दिवस इतरांचा हेवा करण्यात आणि द्वेष करण्यात जातो. म्हणूनच ते जास्त दुःखी असल्याचे पाहायला मिळते.

आपल्या भोवताली असे काही लोकं असतात ज्यांना इतरांच्या आयुष्यात नेमकं काय सुरूये हे जाणून घेण्यास जास्त रस असतो. अशा लोकांना स्वतःच्या दुःखाची कमी चिंता असते, मात्र इतरांना आनंदी पाहून असे लोकं त्याचा द्वेष करू लागतात. इतकंच नाहीतर त्यांचा हेवा देखील करतात. असे लोक आयुष्यात जास्त काळ कोणतेही नाते निभावू शकत नाहीत. हेच लोकं समाजात एकत्र राहतात पण इतरांच्या आयुष्यात अडचणी निर्माण करू पाहतात. मात्र ते कधीही आनंदी राहू शकत नाहीत.
१. इतरांवर जळणारे किंवा त्यांचा हेवा करणारे
तुमच्या आसपास असे लोकं तुम्ही पाहिलेच असतील जे इतरांना आनंदी पाहून त्यांच्यावर जळतात, त्यांचा द्वेष करतात. असे लोक आयुष्यात कधीही आनंदी राहू शकत नाहीत. कारण इतरांना सुखी पाहून ते त्यांच्या वैयक्तिक जीवनात आनंद अनुभवू शकत नाहीत. त्यांचा संपूर्ण दिवस इतरांचा हेवा आणि द्वेष करण्यात जातो. परिणामी अशा लोकांचा दिवस हा इतरांचा विचार करण्यात जातो. त्यामुळे ते कधीच आनंदी राहू शकत नाहीत. अशा लोकांपासून नेहमीच सावध राहणं कधीही योग्य ठरेल.
२. एकमेकांविरोधात निंदा करणारे लोकं
विश्वासात घेऊन एखाद्याने जर एखादी गोष्ट सांगितली असेल आणि तीच गोष्ट तुम्ही ऐकून दुसरीकडे कुठेतरी सांगितली तर याला गॉसिप करणं किंवा चुगली करणं असं म्हणतात. समाजात अशा सवयीचे लोकं तुम्ही सर्वाधिक पाहिले असतील. हे लोकं विश्वासाने एखाद्याचे ऐकतात पण नंतर त्या व्यक्तीचा विश्वास घात करून त्या गोष्टीला अतिशयोक्ती करून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता. असे लोकं दोन व्यक्तींमध्ये मतभेद, दरी निर्माण करण्याचे काम करतात. मात्र एकदा अशा लोकांची सवय लक्षात आली तर लोकं त्या व्यक्तीचा तिरस्कार करू लागतात आणि त्यांचा चेहरा पाहणं देखील पसंत करत नाही.
३. इतरांना त्रास देऊन समोरच्याला अडचणीत आणणारे
जे लोक इतरांना त्रास देतात, त्यांच्या सरळ आयुष्यात अडचणी निर्माण करतात किंवा इतरांच्या मदतीने काही लोकांना त्रास देतात असे लोकं आपल्या वैयक्तिक आयुष्यात कधीही आनंदी नसतात. कारण त्या व्यक्तींना शिव्या आणि शाप मिळत असतात. म्हणूनच पूर्वीच्या काळातील लोकं म्हणायचे की जर तुम्ही एखाद्याला मदत करू शकत नसाल तर त्याला त्रास देऊ नका किंवा त्यांच्याबद्दल वाईट देखील चिंतू नका. मात्र आजकाल जे सुखी आहेत, आनंदी आहे. हे बघून काही लोकं इतरांना त्रास देण्यासाठी संधी शोधतात आणि त्यांच्या आयुष्यात दुःख निर्माण करतात. त्यामुळे तुमच्या आसपास असे लोकं असतील तर त्यांच्यापासून वेळीच लांब व्हा…