हिवाळ्यात का असतो पॅनिक अटॅकचा धोका; जाणून घ्या लक्षणे

हिवाळ्यात का असतो पॅनिक अटॅकचा धोका; जाणून घ्या लक्षणे
panic attack

सध्याच्या जगात पॅनिक अटॅक आणि चिंताग्रस्ततेची समस्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या रोगांकडे कधीही दुर्लक्ष करून चालणार नाही. या रोगाचीच आज आम्ही तुम्हाल लक्षणे सांगणार आहोत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 20, 2022 | 12:55 PM

मुंबईः पॅनिक अटॅक ( panic attack) किंवा चिंताग्रस्ततेचा धक्का (Anxiety Attack) हे रोग आजच्या काळातील पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. हे रोग ऐकताना आणि कुणालाही सांगताना सहजपणे सांगता आले तरी हे आरोग्यासाठी धोकादायक आहेत.खरंतर हे रोग मानसिक रोग आहेत. पॅनिक अटॅकमध्ये लोकांना एखाद्या गोष्टीविषयी विनाकारण भीती वाटते. आणि मन चिंताग्रस्त बनते. जेव्हा एखादा माणसाच्या मनात सतत नकारात्मकतेचे विचार येऊ लागतात तेव्हा पॅनिक अटॅक किंवा माणूस तणावग्रस्त बनतो. आयुष्यातील वाईट घटनांमुळे माणसांना पॅनिक अटॅक येण्याची भीती असते.

काय आहे पॅनिक अटॅक आणि चिंताग्रस्तता

फोबिया झालेल्या व्यक्तिला काही गोष्टींपासून भीती वाटत असते. फोबिया झालेल्या व्यक्तीला कोणत्याही भीती वाटू शकते. त्याला कोणताही तर्क नसतो. आरोग्यशास्त्रातील काही अहवालानुसार फोबियामध्येच पॅनिक अटॅक असण्याची लक्षणे दिसू लागतात. अचानक घडलेल्या एखाद्या घटनेमुळेही पॅनिक अटॅक येऊ शकतो.

पॅनिक अटॅक येण्याची कारणे शारीरिक कारणे

काही वेळा आपल्या शरीरातील काही रोगांमुळेही पॅनिक अटॅक किंवा चिंताग्रस्तता येऊ शकते. आरोग्यशास्त्रातील अहवालानुसार ह्रदयविकाराशी संबंधित असलेल्या समस्या किंवा कॅन्सरसारख्या रोगामुळेही पॅनिक अटॅक येऊ शकतो.

मानसिकता मुख्य कारण

पॅनिक अटॅक येण्याचे मुख्य कारण असू शकते व्यक्तिची मानसिक चिंता. काही वेळा कौटुंबिक तर काही इतर कारणामुळे जेव्हा व्यक्ती चिंताग्रस्त होते, आपल्या मनातील भावना कुणालाही सांगत नाही त्यावेळी पॅनिक अटॅकचा धोका जास्त संभवू शकतो. छोट्या छोट्या गोष्टीमुळे जी लोकं चिंताग्रस्त होतात त्यांनाही पॅनिक अटॅक येऊ शकतो.

जाणून घ्या पॅनिक अटॅक आणि चिंताग्रस्ततेची लक्षणे

अचानक ह्रदयाची धडधड वाढणे, भीती वाटणे, श्वास घेताना त्रास होणे, रक्तदाब वाढणे, घाम येणे, शरीर थरथरणे, डोके दुखी वाढणे, पूर्ण शरीराला वेदना होणे, शरीर थंड किंवा गरम होणे, डोके गरगरणे, उल्टी होणे अशी लक्षणे दिसू लागतात.

असा करू शकता या रोगांपासू बचाव

१. प्रत्येक गोष्टीचा विचार सकारात्मकतेने करा, ताणतणावापासून लांब रहा
२. सामाजिक कार्यात सक्रीय रहा. एकमेकांना भेटत रहा
३. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीवर ताबा ठेवा. त्यासाठी संतुलित आहार ठेवा. फास्टफूडपासून लांब रहा
४. नियमित व्यायामाची सवय लावून घ्या. योगासन आणि प्राणायम करा. यामुळे मज्जासंस्था सशक्त राहते.
५.रोज ध्यानधारणा करण्याची सवय लावून घ्या. ध्यानधारणेमुळे तणावमुक्त राहण्यासाठी मदत होते.
६. आपल्याला विनाकारण, भीती, चिंता आणि चक्कर येत असेल तर त्याची कल्पना डॉक्टरांना द्या. विनाकारण चिंताग्रस्त वाटत असेल तर मानसोपचार तज्ज्ञांची भेट घ्या.

हिवाळा आणि पॅनिक अटॅक किंवा चिंताग्रस्तता

पॅनिक अटॅक किंवा चिंताग्रस्तता ही तणावाची कारणे असू शकतात. ही लक्षणे हिवाळ्याच्या महिन्यामध्ये अधिक जाणवू लागतात. यामुळे शारीरिक हालचाली कमी होतात, उशिरापर्यंत झोप घेतली जाते. आणि दिवसभर मनात नकारात्मकतेच्या विचारांमुळेही याचा धोका वाढू शकतो.

पॅनिक अटॅक येतो तेव्हा…

एखाद्या व्यक्तीला पॅनिक अटॅक येतो त्यावेळी त्याला भावनिक आधार द्या. त्याचे सांत्वन करा. तुम्ही त्याच्यासोबत असल्याचा विश्वास त्या व्यक्तिला द्या. त्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्याला धीर द्या. हळूहळू पाणी पाजण्याचा प्रयत्न करा. ज्या व्यक्तिला असा त्रास होत असेल त्याचे हात-पाय दाबून द्या, आणि त्या व्यक्तिला लिंबूपाणी किंवा ओआरएस घेणे सगळ्यात जास्त चांगले असते.

संबंधित बातम्या

आयुर्वेदिक उपचारांनी खरंच उंची वाढू शकते का? डॉक्टरांनी सगळ्या शंकांच निरसन केलंय!

योगा करण्याचा विचार करत आहात…पण कळतं नाही कुठले योगाचे प्रकार कराचे…मग जाणून घ्या एका क्लिकवर कुठला योगा तुमचासाठी आहे बेस्ट

तुम्ही गर्भवती आहात…आणि तरीही अकोल्होलचं सेवन करता आहात…मग सावधान

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें