AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन चप्पल झाल्या खराब? ‘या’ 5 घरगुती टिप्स वापरा आणि द्या त्यांना पुन्हा नवीन लूक!

चप्पलांवर पडलेल्या स्क्रॅचेसबद्दल आता काळजी करण्याची गरज नाही. फक्त तुमच्याकडे थोडा वेळ आणि वर सांगितलेली सामग्री असेल, तर तुम्ही स्वतःच्या जुन्या चप्पलांना अगदी नव्यासारखं चमकवू शकता.

नवीन चप्पल झाल्या खराब? ‘या’ 5 घरगुती टिप्स वापरा आणि द्या त्यांना पुन्हा नवीन लूक!
shoe scratch removerImage Credit source: Tv9 Bharatvarsh
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Jul 01, 2025 | 8:07 PM
Share

आपण नवीन चप्पलांची खरेदी करतो, तेव्हा त्यांची चकाकी आणि स्वच्छपणा आपल्याला खूप आवडतो. पण जर कुठे स्क्रॅच किंवा डाग पडला, तर त्यांची चमक लगेचच कमी होते. मग त्या कितीही महागड्या असल्या, एकदा खराब वाटू लागल्या की आपण त्या बाजूला ठेवतो आणि नवीन चप्पल घेण्याचा विचार करतो.

पण आता काळजी करण्याची गरज नाही! वारंवार नवीन चप्पल घेण्यापेक्षा, काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या जुन्या चप्पलांना पुन्हा नव्यासारखं रूप देऊ शकता. खाली दिलेले 5 घरगुती उपाय लेदर, रबर, कॅनव्हास किंवा स्वेडच्या चप्पलांवरील स्क्रॅचेस आणि डाग हटवण्यासाठी खूप उपयोगी ठरतात.

1. टूथपेस्ट

लेदर, पेटंट लेदर, सिंथेटिक लेदर किंवा रबरच्या चप्पलांवर स्क्रॅचेस किंवा डाग पडले असतील, तर टूथपेस्ट वापरून ते स्वच्छ करता येतात. एक जुना टूथब्रश घ्या, त्यावर थोडी टूथपेस्ट लावा आणि स्क्रॅच असलेल्या भागावर गोलाकार रगडा. काही वेळाने एक थोडा ओलसर कपडा घेऊन तो भाग स्वच्छ करा आणि चप्पल सुकण्यासाठी ठेवा. स्क्रॅच सहज निघून जातील आणि चप्पल पुन्हा चमकू लागतील.

2. नेल पॉलिश रिमूव्हर (Acetone-Free)

नेल पॉलिश रिमूव्हर, विशेषतः अ‍ॅसिटोन नसलेला, लेदर आणि रबरच्या चप्पलांवरील डाग काढण्यासाठी उपयोगी ठरतो. एक कॉटन बॉल घ्या, त्यावर थोडा रिमूव्हर टाका आणि स्क्रॅच असलेल्या भागावर सौम्यपणे रगडा. काही वेळातच डाग हलके होतील किंवा पूर्णपणे निघून जातील. मात्र अ‍ॅसिटोनयुक्त रिमूव्हर वापरू नका, कारण तो चप्पलांच्या पृष्ठभागाला नुकसान पोहोचवू शकतो.

3. बेकिंग सोडा

कॅनव्हास किंवा फॅब्रिकच्या चप्पलांवर डाग पडले असतील, तर बेकिंग सोडा हा एक प्रभावी उपाय आहे. एका छोट्या वाटीत थोडा बेकिंग सोडा घ्या. टूथब्रश पाण्यात भिजवा आणि त्यावर बेकिंग सोडा लावून डाग असलेल्या भागावर रगडा. ही प्रक्रिया 2-3 वेळा करा. नंतर ओल्या कपड्याने पुसा किंवा पाण्याने हलकं धुवा आणि चप्पल सुकवण्यासाठी ठेवा.

4. डिश वॉशर

फॅब्रिक किंवा कॅनव्हास चप्पलांवरील स्क्रॅचेस काढण्यासाठी बर्तन धुण्यासाठी वापरला जाणारा डिश वॉशर वापरू शकता. एक थेंब डिश वॉशर स्क्रॅच असलेल्या भागावर लावा आणि ब्रशने रगडा. नंतर कोमट पाण्याने धुवा किंवा ओल्या कपड्याने पुसून सुकवण्यासाठी ठेवा. हा उपाय खूपच सोपा आणि प्रभावी आहे.

5. पेंसिल इरेजर

स्वेडच्या चप्पलांवर हलके स्क्रॅचेस असतील, तर पेंसिल इरेजर हा एक उत्तम उपाय आहे. एक सामान्य पेंसिल रबर घ्या आणि स्क्रॅच असलेल्या भागावर सौम्यपणे रगडा. काही वेळात स्क्रॅच निघून जातील आणि चप्पल पुन्हा नव्यासारख्या दिसतील.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळेंची खासदारांसह पंतप्रधानांच्या भेट
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळे खासदारांसह पंतप्रधानांच्या भेटीसाठी दाखल; व्हिडीओ आला समोर
बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही...
Chandrashekhar Bawankule | कुणबी प्रमाणपत्रावरून मोठा ट्विस्ट! बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही; अधिकाऱ्याचं पत्र आलं समोर
अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
Manoj Jarange VS Chandrashekhar Bawankule | अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम; बावनकुळेंवरही जोरदार हल्लाबोल
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं थेट विधान
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं सूचक विधान, म्हणाले...
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायमूर्तींची अचानक बदली, नेमकं काय घडलं?
आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा! आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक
MNS Meeting | राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक; मनसेत मोठे फेरबदल होणार?
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाले, शुद्ध....
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाला, शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या...
नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा
Ganesh Naik | नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा; नेमका निशाणा कुणावर?
मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा निर्णय
Mumbai Water Cut | मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! धरणसाठा 88.70% वर; पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय