AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्क फ्रॉम करताना वजन कमी करण्याचे आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचे 7 प्रभावी मार्ग

योगा आणि ध्यान धारणा आपल्याला तणावमुक्त राहण्यासा मदत करते. रात्री साऊंड स्लिप घ्या. कमीत कमी 7-8 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. (Seven effective ways to lose weight and control diabetes while working out)

वर्क फ्रॉम करताना वजन कमी करण्याचे आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचे 7 प्रभावी मार्ग
पुण्यातील बहुतांश आयटी कंपन्यांचे अजूनही 'वर्क फ्रॉम होम'
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Edited By: Anish Bendre | Updated on: May 03, 2021 | 9:06 AM
Share

मुंबई : जग अद्याप कोरोना व्हायरसशी लढत आहे. आपल्या देशात कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी लोकांना कोविड प्रोटोकॉलचे अनुसरण करण्यास सांगितले आहे. वर्क फ्रॉम होम त्यापैकी एक आहे आणि आपल्यातील बहुतेक जण जवळजवळ वर्षभर तेच करत आहेत. सतत घरी राहणे, साखरयुक्त पदार्थ आणि जंक फूड खाणे, शारीरिक व्यायामाचा अभाव इत्यादी गोष्टी बर्‍याच लोकांमध्ये वजन वाढवण्यासाठी प्रभावी ठरल्या आहेत. यापैकी काही लोक मधुमेह ग्रस्त आहेत. सध्या, मधुमेह रूग्ण वजन नियंत्रणात आणण्यास आणि कोरोना काळात रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास असमर्थ आहेत. काही घरगुती उपायांनी आपण वजन कमी करण्यासोबत मधुमेहावर नियंत्रण ठेवू शकता. (Seven effective ways to lose weight and control diabetes while working out)

तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवा

माइंडफुल ईटिंग अर्थात मनपसंत खाणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही खात असलेल्या पदार्थांची प्रोटीन, चरबी आणि कार्बोहायड्रेट यात वर्गवारी करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला मधुमेह आहे किंवा तुम्ही स्थूलपणा असेल तर कार्बोहायड्रेटपासून साखर आणि हायफूड खाणे टाळा.

शारीरिक रूपात अॅक्टिव्ह रहा

कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी आपल्याला कामाशिवाय घराबाहेर पडणे, प्रवास करणे टाळावे लागत आहे. अशा परिस्थितीत आपल्या फिजिकल अॅक्टिव्हिटी अर्थात शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. आपण बाहेर जात असाल तर शारीरिक अंतर राखून वेगाने चालले पाहिजे. हाही एक प्रकारचा व्यायाम आहे. सतत अॅक्टिव्ह आणि फ्रेश राहण्यासाठी दिवसभर स्ट्रेचिंग करीत राहा. डेस्क वर्कआउटसाठी ऑप्ट, स्क्वाट्स, पुश-अप्स, पुल-अप्स आणि लाइट-वेट बेयरिंग एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करा.

जेवणाचे वेळापत्रक बनवा

वर्क फ्रॉम होम करताना आपल्याला जेवणाकडे अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. यासाठी तुम्ही तुमच्या जेवणाचे वेळापत्रक बनवा. प्रोसेस्ड, तेलकट आणि जंक फूड टाळण्याचा प्रयत्न करा. स्नॅक्स विकत घेण्यापूर्वी त्यावरील न्यूट्रीशन लेबल वाचा. तळलेले पदार्थ खात आपल्या दिवसाची सुरुवात करू नका. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण दिवसभर सुस्ती आल्यासारखे वाटेल. तुम्ही काम करीत असलेला टेबल किचनपासून लांब असू द्या. नाहीतर सतत खात राहिल्यामुळे तुमचे वजन वाढतच राहील. नेहमी जेवणाची एक वेळ ठरवा.

संतुलित आहाराचे पालन करा

दररोज संतुलित आहार ठेवा. आहारात पुरेशी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. जेवणासोबत सलाड किंवा सूप घ्या. त्यामुळे ग्लूकोजची पातळी कंट्रोलमध्ये राहील तसेच इंसुलिन रेसिस्टेंस रोखण्यास मदत होईल. दिवसातून जर तुम्ही 5 वेळ जेवण करत असाल, तर कमीत कमी एकदा सलाड आणि फळे खा. ताजी फळे अँटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन आणि मिनरल्सने भरलेली असतात. त्यामुळे पुरेशी ताजी फळे खा. सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास सुरुवातीच्या डिनरचा पर्याय ठेवा. दिवसाच्या सुरुवातील मिठाई खा. तसेच खूप पाणी पिऊन हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न करा. तसेच मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी ग्रीन टी, काळी चहा किंवा काळी कॉफी घ्या.

डायबिटीजवर लक्ष ठेवा

तुमची नियमित औषधे घेणे टाळू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळेवर औषधे घ्या. स्वतःहून कोणतीही औषधे घेऊ नका, त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

रात्री साऊंड स्लिप घ्या, ताण घेऊ नका

कोर्टिसोल एक स्ट्रेस हार्मोन आहे. हायकोर्टिसोलची पातळी वाढली तर ब्लड शुगरची पातळी धोकादायक बनते. रात्री साऊंड स्लिप घ्या. कमीत कमी 7-8 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर योगा करून तणावमुक्त राहा. तुमच्या आवडीच्या गोष्टींमध्ये मन व्यस्त ठेवा.

स्ट्रेस कमी करा

योगा आणि ध्यान धारणा आपल्याला तणावमुक्त राहण्यासा मदत करते. आपल्या आवडत्या गोष्टी करा. व्हिडीओ कॉल किंवा फोन करून आपल्या परिवाराशी आणि मित्रांशी गप्पा मारा. (Seven effective ways to lose weight and control diabetes while working out)

Tamil Nadu Assembly Election Result 2021: अभिनेता कमल हसन यांचा पराभव, भाजपच्या वनाथी श्रीनिवासन विजयी

संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव, राज्यांच्या स्वायत्तेसाठीचा आग्रही आवाज तुम्ही बनाल : राज ठाकरे

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ