Video | पोटावरची चरबी कमी करायचीय? मग, शिल्पा शेट्टीने सांगितलेली ‘ही’ योगासने नक्की ट्राय करा!

बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि आरोग्याबाबत जागरूक सेलिब्रिटींची यादी पाहिली तर, अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.

Video | पोटावरची चरबी कमी करायचीय? मग, शिल्पा शेट्टीने सांगितलेली ‘ही’ योगासने नक्की ट्राय करा!
शिल्पा शेट्टी

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि आरोग्याबाबत जागरूक सेलिब्रिटींची यादी पाहिली तर, अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. शिल्पा शेट्टी हिचे स्वत:चे हेल्थ अॅपही आहे आणि ती तिच्या सोशल मीडिया हँडलवरून तिच्या चाहत्यांसमवेत वेगवेगळ्या फिटनेस टिप्स शेअर करताना दिसली आहे. शिल्पाच्या फिटनेसमध्येही योगाचा मोठा हात आहे आणि ती नेहमी योगाची नवनवीन आसन करताना दिसत आहे (Shilpa Shetty Yoga tips to reduce belly fat naturally).

शिल्पाने योगाचा व्हिडीओ केला शेअर

अलीकडेच शिल्पाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती योगाची 3 वेगवेगळी आसने करताना दिसली आहे. ही आसने आहेत :

  1. एक हस्त उत्थान चतुरंग दंडासन (Low Plank Pose)
  2. वशिष्ठासन (Side Plank Pose)
  3. उत्थान चतुरंग दंडासन (Plank Pose)

पाहा व्हिडीओ

आपला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना शिल्पाने लिहिले की, योगाच्या या आसनांचे सामर्थ्यवान संयोजन मनगट, हात आणि खांदे यांना बळकटी देण्यास मदत करतात. ही आसने कोर स्ट्रेन्थ निर्माण करतात आणि शरीराचे संतुलन राखण्यास मदत करतात. यामुळे व्यक्तीची एकाग्रता सुधारते आणि हातांना टोन करण्यास देखील मदत करते. ही अशी योगासने आहेत, जी संपूर्ण शरीरावर प्रभावीपणे कार्य करतात (Shilpa Shetty Yoga tips to reduce belly fat naturally).

या आसनांचे फायदे कोणते?

योगाच्या या आसनांच्या फायद्यांविषयी, उत्थान चतुरंगा दंडासन आणि एक हस्त उत्थान चतुरंग दंडासन – या दोन्ही आसनांमुळे तुमच्या मणक्याचे हाड बळकट होते आणि मेरुदंडाच्या दोन्ही बाजूंच्या स्नायूंवरही काम होते. यासह हे आसन बेली फॅट कमी करण्यामध्येही मदत करते. हे योगासन शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्याच वेळी, वसिष्ठासनाबद्दल बोलायचे, तर हे आसन आपल्या पोटावर, तसेच हात पायांच्या स्नायूंवर काम करते आणि त्यांना लवचिक बनवण्यात मदत करते. एकंदरीत, ही तिन्ही आसने आपल्या पोटावरील चरबी कमी करून, बॉडी टोन करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

या लोकांनी करू नये हे आसन!

तथापि, कोणताही योगासन करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी, कृपया तज्ञाच्या सल्ला अवश्य घ्या. जर तुम्हाला खांदा, कोपर किंवा मनगटात दुखापत असेल किंवा तुमचा पाय दुखत असेल, तर ही आसने करू नका. ज्या लोकांना ब्लड प्रेशरची समस्या आहे, त्यांनी देखील ही आसने करू नयेत.

(टीप : कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमीच एखाद्या विशेषज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

(Shilpa Shetty Yoga tips to reduce belly fat naturally)

हेही वाचा :

Kriti Sanon | ‘उन्हाळा आलाय…’ म्हणत शेअर केले फोटो! क्रिती सॅनोनचा बोल्ड लूक करतोय चाहत्यांना घायाळ…

Malaika Arora | मलायका अरोराची मित्रपरिवारासोबत धमाल पार्टी, बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत खास फोटो…

Published On - 12:48 pm, Thu, 25 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI