जर एखाद्याला किडनी स्टोन असेल तर दही खावे की नाही?
किडनी स्टोन असल्यास, कोणत्याही प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थ किंवा दह्याचे सेवन करावे की नाही असा प्रश्न अनेकदा लोकांना पडतो. खरंच दही खाणे सुरक्षित आहे की नाही. त्याचं नक्की उत्तर जाणून घेऊयात

किडनी स्टोन असणे ही एक गंभीर समस्या आहे. आपल्या देशातील सुमारे 12 टक्के लोकांना किडनी स्टोनचा त्रास आहे. काही जण ते ऑपरेशन करून काढतात तर काहीजण औषधांच्या मदतीने लघवीवाटे म्हणजे नैसर्गिक पद्धतीचा वापर करतात. पण एकदा हा स्टोन शरीराच्या बाहेर निघाला तरी ते वारंवार होतच असतात. मग भलेही ते काही काळानंतर का असेना पण ते पुन्हा तयार होतात. याची कारणं असतात लठ्ठपणा, वजन वाढणे, वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया किंवा आहारात जास्त साखर आणि मीठ सेवन करणे असू शकते.
किडनी स्टोन असेल तर दही खावे की नाही?
त्यामुळे किडनी स्टोनच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराची विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. काही भाज्या ज्या स्टोन तयार करण्यासाठी कारण ठरतात अशा भाज्या तर नक्कीच न खाण्याचा सल्ला दिला जातो. पण अनेकांमध्ये एका पदार्थाबाबत नेहीमच संभ्रम राहिला आहे. तो पदार्थ म्हणजे दही. होय अनेकदा हा पश्न विचारला जातो की किडनी स्टोन असेल तर दही खावे की नाही? आणि बऱ्यापैकी लोकांना याबाबत फारशी माहिती नाहीये. खरंतर दह्यामध्ये कॅल्शियम, प्रथिने, प्रोबायोटिक्स आणि व्हिटॅमिन डी सारखे पोषक घटक असतात. त्यामुळे पचन सुधारते, परंतु किडनी स्टोनच्या रुग्णांनी दह्याचे सेवन करावे का? ते जाणून घेऊयात
आहारतज्ज्ञांच्या मते किडनी स्टोनच्या रुग्णांनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खावेत का?
आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ञांच्या मते किडनी स्टोनच्या रुग्णांनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना तुमच्या संतुलित आहाराचा भाग बनवण्यापूर्वी काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते किडनी स्टोन असलेले रुग्ण देखील दही खाऊ शकतात पण त्यांनी मर्यादित प्रमाणात त्याचं सेवन करावं. दह्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतात. जास्त प्रमाणात कॅल्शियम सेवन केल्याने स्टोनचा धोका वाढतो. ऑक्सलेट आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात सेवन केल्याने स्टोन तयार होण्याची शक्यता जास्तच वाढते.
किडनी स्टोनच्या रुग्णांनी दह्याचे सेवन कसे करावे?
किडनी स्टोनच्या रुग्णांनी दही खाताना खूप काळजी घ्यावी. ते खूप मर्यादित प्रमाणात खावे. जर किडनी स्टोनचा रुग्ण नियमितपणे दुधापासून बनवलेले इतर पदार्थ जरी खात असेल तर ते टाळणेच चांगले. त्यांच्या आहारातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पूर्णपणे कमी करू नये. पण कॅल्शियमयुक्त पदार्थ कमी घेण्यावर लक्ष द्यावं.
किडनी स्टोनच्या रुग्णांनी दही कधी खाऊ नये?
किडनी स्टोन व्यतिरिक्त, जर किडनीशी संबंधित इतर कोणतीही समस्या असेल तर त्या रुग्णांनी दही खाऊ नये. जर किडनी स्टोन असलेल्या व्यक्तीला हायपरॉक्सॅलुरिया असेल तर त्या व्यक्तीने दही खाऊ नये. हायपरॉक्सॅलुरिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये लघवीमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे दही शक्यतो खाणे टाळा.