Giloy Side Effects | सावधान! इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘गिलोय’चे सेवन करताय? वाचा याचे दुष्परिणाम…

गिलोयच्या फायद्यांबद्दल आपणा सर्वांना माहिती असेल. पण त्याचे बरेच तोटे देखील आहेत. जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:24 PM, 26 Jan 2021
Giloy Side Effects | सावधान! इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘गिलोय’चे सेवन करताय? वाचा याचे दुष्परिणाम...
गिलोयचे तोटे

मुंबई : कोरोना काळात रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींची मागणी कमालीची वाढली आहे. यात अग्रक्रमांकावर ‘गिलोय’ या वनस्पतीचे नाव आहे. गिलोय वजन कमी करणे, त्वचेच्या समस्या आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. गिलोयचा उपयोग व्हायरल इन्फेक्शन दूर करण्यासाठी देखील केला जातो. चवीला कडू असणारा ‘गिलोय’ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. गिलोयमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत (Side Effects of Giloy).

गिलोय अनेक रोग बरे करण्यास मदत करतो. गिलोय या वनस्पतीला ‘अमृता’ म्हणूनही ओळखले जाते. आयुर्वेदानुसार, गिलोय हे अमृताचे मूळ असल्याचे म्हटले जाते, ज्यात आयुर्वेदाचे समृद्ध गुणधर्म आहेत. आपणही गिलोयचे सेवन करू इच्छित असल्यास, रस, कॅप्सूल आणि पावडर स्वरुपात ‘गिलोय’ वापरू शकता.

गिलोय चवीला सौम्य कडू असते. गिलोयला अनेक औषधांमध्ये औषध म्हणून वापरण्यासाठी अन्न व औषध संघटनेने मान्यता दिली आहे. काही लोक गिलोय कॅप्सूल, पावडर आणि रस स्वरूपात पितात, तर त्याचवेळी काही जण पाण्यात उकळवून त्याचा रस पितात. गिलोयच्या फायद्यांबद्दल आपणा सर्वांना माहिती असेल. पण त्याचे बरेच तोटे देखील आहेत. जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी घातक

जास्त प्रमाणात गिलोयचे सेवन करण्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. खरं तर, मधुमेह रुग्ण साखरेची पातळी कमी करण्यासाठी गिलोयचे सेवन वापरतात. परंतु गिलोयचे जास्त सेवन केल्याने हायपोग्लाइकेमिया होऊ शकतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच गिलोयचे सेवन करावे (Side Effects of Giloy).

बद्धकोष्ठता समस्या

पाचन तंत्र मजबूत करण्यासाठी गिलोयचे सेवन केले जाते. तथापि, जास्त प्रमाणात गिलोयचे सेवन केल्याने पोटदुखी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

ऑटो इम्युनिटी डिसॉर्डर

कोरोना कालावधीत, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लोकांनी सर्वाधिक गिलोयचे सेवन केले. परंतु जास्त प्रमाणात प्याल्याने शरीरात ‘ऑटो इम्युनिटी डिसॉर्डर’ होण्याचा धोका वाढला आहे. यामुळे, अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.

एका दिवसात ‘गिलोय’चे किती सेवन करावे?

निरोगी राहण्यासाठी दररोज एक ग्लास गिलोयचा रस पिऊ शकता. याशिवाय आपण कॅप्सूल किंवा पावडरच्या स्वरूपात खात असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच खा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Side Effects of Giloy)

हेही वाचा :