World Smile Day 2022: फक्त 2 मिनिटांत ब्लड प्रेशर, तणाव आणि वेदनांपासून मिळेल आराम ! आता तरी हसा

दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी जागतिक हास्य दिवस (World Smile Day) साजरा केला जातो.

World Smile Day 2022: फक्त 2 मिनिटांत ब्लड प्रेशर, तणाव आणि वेदनांपासून मिळेल आराम ! आता तरी हसा
हसणे आरोग्यासाठी फायदेशीर
Follow us
| Updated on: Oct 07, 2022 | 5:16 PM

तुम्ही हसत-खेळत जगाल तर मोठ्यात मोठी समस्याही पटकन दूर होईल, असे पूर्वीच्या काळी म्हटले जायचे. तुमचे एक हास्य जीवन बदलू शकेल. दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी जागतिक हास्य दिवस (World Smile Day) साजरा केला जातो. सर्वप्रथम 1999 साली जागतिक हास्य दिवस साजरा करण्यात आला होता. यावर्षी आज, म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी हा हास्य दिवस साजरा होत आहे. हसण्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे (benefits for health) आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण, तुम्ही जर रोज हसलात तर तुम्ही अनेक आजारांना क्षणात दूर करू शकता. हसण्याने तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यही (mental health) सुधारते. हसण्यामुळे आपल्या आरोग्याला काय फायदे मिळतात हे जाणून घेऊया.

ताण होतो क्षणात दूर :

व्हेरीवेल माइंडच्या रिपोर्टनुसरा, हसल्यामुळे आपल्या शरीराचा थकवा दूर होतो आणि तणाव कमी होतो. खास गोष्ट म्हणजे आपल्याकडे हसण्याचं काहीही कारण नसलं आणि तरीही आपण हसलो, तर तणावाची पातळी कमी होते. त्यामुळे तुम्ही अधिक तणावात असाल तर हसण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा मूडही सुधारेल. हसल्यामुळे न्यूरोपेप्टाइड्स रिलीज होतात, ज्यामुळे त्या व्यक्तीचा मूड सुधारतो.

हे सुद्धा वाचा

ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते : जगभरातील कोट्यावधी लोकं हाय ब्लड प्रेशरचा (उच्च रक्तदाब) त्रास सहन करत आहे. ब्लड प्रेशर वाढले कर हार्ट ॲटॅकसह अनेक धोकादायक आजारांचा धोका वाढतो. तुम्ही जर दररोज हसलात तर तुमचे ब्लड प्रेशर कमी होईल. ही बाब अनेक अभ्यासातून समोर आली आहे. ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी रोज (अवश्य) हसले पाहिजे.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते : ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते ते लवकर आजारी पडतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी , ती मजबूत करण्यासाठी लोकं औषधांची मदत घेतात. मात्र ते हसत राहिले तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. त्यामुळे ऋतूमानानुसार होणारे आजारा, ताप, सर्दी, खोकला यांपासून बचाव करता येणे शक्य होते.

वेदनांपासून होते सुटका : जर तुमच्या शरीरात वेदना होत असतील तर तुम्ही हसून त्या कमी करू शकता. हसण्यामुळे आपल्या शरीरातून एंडोर्फिन आणि सेरोटोनिन हार्मोन्स रिलीज होतात, जे नैसर्गिक वेदनाशामक (पेन किलर) म्हणून कार्य करतात. यामुळे शरीराला रिलॅक्स वाटतं आणि मूडही सुधारतो. हसण्यामुळे तुमची वेदना कायमची दूर होऊ शकते.

लूकही सुधारेल : हसण्यामुळे तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आनंदी राहता, ज्यामुळे तुमचं सौंदर्य वाढतं. जर तुम्ही रोज हसायला लागलात, तर काही दिवसांतच तुमचा चेहऱ्यावर चमक येईल, चेहरा आकर्षक दिसण्यास सुरुवात होईल आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल. यामुळे तुम्हाला लवकरच यशही मिळू शकेल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.