शरीरात व्हिटॅमिन बी, ई आणि के ची कमतरता मग ‘हे’ घटक आहारात घ्या…

चांगल्या आरोग्यासाठी शरीरात व्हिटॅमिन बी, ई आणि के अत्यंत आवश्यक आहे. खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी आढळते.

शरीरात व्हिटॅमिन बी, ई आणि के ची कमतरता मग 'हे' घटक आहारात घ्या...
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 6:49 PM

मुंबई : चांगल्या आरोग्यासाठी शरीरात व्हिटॅमिन बी, ई आणि के अत्यंत आवश्यक आहे. खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी आढळते. तसेच खजूरमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम असते, जे आपल्या हाडांसाठी फायदेशीर आहे. खजूरमध्ये कोलेस्ट्रॉल आणि साखरेचे प्रमाण कमी असते. यामुळे हृदय चांगले राहते. साखरेचे प्रमाण कमी असणं हे देखील फायदेशीर आहे. खजूर जगभरात सर्वात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या फळांपैकी एक आहे. (Special tips to increase vitamins B, E and K in the body)

डाळिंबाचे फळ दिसायला जितके सुंदर आहे, तितकेच ते आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. डाळिंब खाण्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. याशिवाय टाईप-2 डायबिटीसशी लढण्यातही यामुळे बरीच मदत मिळते. डाळिंबामध्ये व्हिटामिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात आढळतात. यात अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल आणि अँटी-ट्यूमर गुणधर्म देखील आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.

डाळिंब तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्यास मदत करतो. डाळिंबामध्ये अँटी-ऑक्सिडेंट उपस्थित असल्यामुळे ते फ्री रॅडिकल्सशी लढते. यासह, हे आपल्या शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण देखील कमी करते. डाळिंबामुळे रक्ताच्या गाठी तयार होण्यास प्रतिबंध होतो. केळी हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. हे सर्व वजन कमी करण्यासाठी खूप मदत करतात. केळी पोटॅशियमने समृद्ध आहेत.

केळी आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. केळीमध्ये 100 कॅलरी उर्जा असते, ज्यामुळे तुमचे शरीर दिवसभर सफुर्तीवान राहते. याव्यतिरिक्त, त्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे देखील शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. पचनासाठी सगळ्यांत चांगली केळी ही पिवळी आणि ज्याच्या सालीवर तपकिरी रंगाचे छोटे छोटे ठिपके असतात.

संबंधित बातम्या : 

तुम्हीसुद्धा सकाळी नाश्त्यामध्ये ‘पोहे’ खाता का? मग जाणून घ्या आरोग्यावर काय होतो परिणाम!

Good fat vs Bad fat : फॅटयुक्त पदार्थ खाणे टाळताय, फायद्यांपेक्षा तोटे जास्त!

(Special tips to increase vitamins B, E and K in the body)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.