Health Tips : उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टी आहारात समाविष्ट करा

उन्हाळ्याच्या हंगामात शरीराला हायड्रेट ठेवणे महत्वाचे आहे. उन्हाळ्यात निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या आणि अशा फळांचा आहारात समावेश करावा.

Health Tips : उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी 'या' गोष्टी आहारात समाविष्ट करा

मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामात शरीराला हायड्रेट ठेवणे महत्वाचे आहे. उन्हाळ्यात निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. आहारात अशा फळांचा समावेश करावा, ज्यामध्ये पाण्याची मात्रा अधिक आहे. फळे आणि भाज्यांमध्ये बरेच पौष्टिक पदार्थ आहेत जे रोगांशी लढायला मदत करतात. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात जास्त फळ आणि भाज्या खाव्यात. (Special tips to keep the body hydrated in summer)

कलिंगड

कलिंगडमध्ये भरपूर पोषक घटक असतात. कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे उन्हाळ्यात शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जातात. यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर मन शांत राहते आणि शरीराला उर्जाही मिळते.

आंबट फळे

संत्री, मोसंबी, लिंबू, द्राक्षे हे व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम आणि फोलेटमध्ये समृद्ध असतात. त्यात बरीच महत्त्वाची पोषक तत्त्वे असतात. उन्हाळ्यात ही फळं खाऊन तुम्ही स्वत: ला हायड्रेटेड ठेवू शकता. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात या फळांचा आहारात समावेश करा.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स आहेत. विशेष म्हणजे या फळांमध्ये कॅलरी खूप कमी असते. ही फळे डिहायड्रेशनची समस्या दूर करतात. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या आहारात या फळांचा समावेश केला पाहिजे.

खरबूज

खरबूजात भरपूर पाणी असते आणि त्यात चरबीचे प्रमाण खूप कमी असते. जर, तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर उन्हाळी आहारात खरबूज नक्की सामील करा. या फळामध्ये जीवनसत्त्वे अ, सी, बी 6, मॅग्नेशियम आणि फायबर आहेत.

काकडी

उन्हाळ्यात तर काकडी जास्तीत जास्त खाल्ली पाहिजे. कारण काकडीमध्ये 80 टक्के पाणी आढळते, ज्यामुळे काकडी खाल्ल्याने आपल्या शरीरात पुरेसे पाणी मिळते. याशिवाय काकडीमध्येही जीवनसत्त्वे आढळतात.

मुळा

मुळा व्हिटॅमिन सी समृद्ध आहे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. बहुतेक लोक कोरोना कालावधीत व्हिटॅमिन सी पूरक आहार घेत असतात. अशावेळी मुळाचे सेवन करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते. हे नियमित खाल्ल्याने सर्दीसारख्या समस्या उद्भवत नाहीत.

पालक

पालकामध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, रेशे असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात असते. उन्हाळ्याच्या हंगामात आहारात पालकाचा समावेश केला तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Special tips to keep the body hydrated in summer)