AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्भावस्थेदरम्यान ऊसाचा रस पिताय? आधी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या!

सध्या उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. उन्हाळा येताच आपण भरपूर ऊसाचा रस (Sugarcane juice) पिण्यास सुरुवात करतो. ऊसाचा रस उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतो.

गर्भावस्थेदरम्यान ऊसाचा रस पिताय? आधी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या!
ऊसाचा रस
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Edited By: Anish Bendre | Updated on: Mar 27, 2021 | 9:09 AM
Share

मुंबई : सध्या उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. उन्हाळा येताच आपण भरपूर ऊसाचा रस (Sugarcane juice) पिण्यास सुरुवात करतो. ऊसाचा रस उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतो. ऊसाच्या रसामध्ये व्हिटामिन ए, बी 1, बी 2, बी 3, बी 5, बी 6 आणि व्हिटामिन सी हे घटक असतात. याशिवाय मॅग्नेशियम, लोह आणि कॅल्शियमही हे घटकही त्यात आढळतात. परंतु, गर्भवती महिलांनी उन्हाळ्यात ऊसाचा रस पिण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे (Sugarcane juice is beneficial during pregnancy know the benefits).

गर्भावस्थेदरम्यान आपण जे काही खातो किंवा पितो त्याचा थेट परिणाम आपल्या गर्भातील बळावर पडतो. अशा परिस्थितीत जर, आपल्याला ऊसाचा रस पिण्यास आवडत असेल, तर ‘या’ गोष्टींबद्दल जाणून घेणे फार महत्वाचे आहे. चला तर, जाणून घेऊया की, गर्भधारणेदरम्यान ऊसाचा रस पिणे फायदेशीर आहे का?

गरोदरपणात उसाचा रस पिण्याचे फायदे :

– गरोदरपणात महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत ऊसाचा रस सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

– गर्भावस्थेदरम्यान पौष्टिक गोष्टींचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. ऊसाच्या रसामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. ऊसाचा रस गरोदरपणात अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करतो. म्हणून गर्भावस्थेत ऊसाचा रस पिणे फायदेशीर आहे.

– गरोदरपणात थकवा आणि इतर आजार टाळण्यासाठी ऊसाचा रस खूप फायदेशीर ठरतो. याच्या सेवनाने रोग प्रतिकारशक्ती वाढते.

– गर्भावस्थेदरम्यान ऊसाचा रस पिण्यापूर्वी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. अशावेळी रस्त्याच्या कडेला रस पिणे टाळा. यामुळे अन्न विषबाधा किंवा संसर्ग होऊ शकतो (Sugarcane juice is beneficial during pregnancy know the benefits).

ऊसाच्या रसाचे इतर फायदे :

– ऊसामध्ये अल्कधर्मीचे प्रमाण जास्त असल्याने हे कर्करोगापासून आपले संरक्षण करते. हे स्तन, पोट आणि फुफ्फुसांच्या कर्करोगापासून आपले संरक्षण करते.

– ऊस आपल्या शरीरात ग्लूकोजच्या प्रमाणाचे संतुलन राखतो, ज्यामुळे ते मधुमेहाच्या आजारामध्येही हा रस प्यायला जाऊ शकतो. नैसर्गिक मधुरता असलेला ऊसाचा रस मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानीकारक नाही.

– उसामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, जे आपल्या शरीरातील वाढते वजन कमी करण्यास मदत करते, यामुळे आपल्या शरीरातील सर्व हानिकारक कोलेस्ट्रॉल कमी होते.

– उन्हाळ्यात, तीव्र सूर्यप्रकाशामुळे आणि घामामुळे, चेहर्याचा चमक कुठेतरी कमी होणे सुरू होते, ऊस तो हरवलेला रस परत आणण्यास मदत करतो.

– हा रस आपल्या चेहऱ्यावरील मुरुम काढून टाकण्यास मदत करतो. ऊसामध्ये सुक्रोजचे प्रमाण अधिक असते, जे कोणत्याही जखमेला लवकर बरी होण्यास मदत करते. तसेच, चेहऱ्यावरील सर्व डाग काढून टाकते आणि आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करते.

– ऊसाच्या रसामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि लोह आणि पोटॅशियम असते, जे आपल्या शरीरातील हाडे मजबूत करण्यास मदत करते.

(Sugarcane juice is beneficial during pregnancy know the benefits)

हेही वाचा :

Holi 2021 | यंदाच्या सणाला घराच्या घरीच तयार करा ‘या’ होळी स्पेशल डिश!

Weight Loss | उन्हाळ्याच्या काळात ‘या’ फळांच्या सेवनाने कमी होईल वजन! आरोग्यालाही होतील अनेक फायदे…

Follow Us
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
Priyanka Gandhi | पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार! सरकारला दिलं थेट आव्हान
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
Dharmendra Pradhan News |  धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सराकर नेमकी काय भूमिका घेणार?
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय!
Uddhav Thackeray | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय! म्हणाले...
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट म्हणाले....
मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
PM Modi Tweet | मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ,
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ, म्हणाले आजच उपोषण...
अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; मौन आंदोलनाची घोषणा
Anna Hajare | दिल्लीनंतर अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; सरकारविरोधात मौन आंदोलनाची घोषणा
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक.

Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक

कुत्रे, कबुतरे पाहण्यासाठी वेळ पण कॉकरोचकडे.. उद्धव ठाकरे यांची न्यायालयावर टीका.

कुत्रे, कबुतरे पाहण्यासाठी वेळ पण कॉकरोचकडे.. उद्धव ठाकरे यांची न्यायालयावर टीका

Raj Thackeray: दिल्लीतील मोर्चा सारखं आमच्या मोर्चात केलं तर फटकावून काढेल; राज ठाकरेंचा इशारा.

Raj Thackeray: दिल्लीतील मोर्चा सारखं आमच्या मोर्चात केलं तर फटकावून काढेल; राज ठाकरेंचा इशारा

मोठी बातमी! दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान...

मोठी बातमी! दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान..

Delhi Metro Stations : लंच पर्यंत बघतो, नाही तर मग..16 मेट्रो स्टेशन्स बंद, मुख्य न्यायाधीशांचं महत्वाचं वक्तव्य.

Delhi Metro Stations : लंच पर्यंत बघतो, नाही तर मग..16 मेट्रो स्टेशन्स बंद, मुख्य न्यायाधीशांचं महत्वाचं वक्तव्य

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट...

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट..