AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Holi 2021 | यंदाच्या सणाला घराच्या घरीच तयार करा ‘या’ होळी स्पेशल डिश!

रंगांच्या या उत्सवात, प्रत्येक घरात वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन बनवले जातात, जे केवळ चांगले दिसतात असे नाही, तर ते अतिशय चवदार देखील असतात. होळीच्या या सणानिमित्ताने असे काही पदार्थ खास तयार केले जातात, जे इतर दिवशी घरी बनत नाहीत.

Holi 2021 | यंदाच्या सणाला घराच्या घरीच तयार करा ‘या’ होळी स्पेशल डिश!
गुजिया
| Updated on: Mar 26, 2021 | 2:05 PM
Share

मुंबई : होळीच्या सणाला बाहेर बरीच गर्दी असते, लोक एकमेकांना रंगात भिजवत असतात. लाल, पिवळा, हिरवा, निळा आणि इतर बर्‍याच रंगांसह या दिवशी लोकांच्या चेहऱ्याव्यतिरिक्त त्यांचे आयुष्य देखील रंगीबेरंगी होते आणि नात्यांमध्ये आणखी तजेला येतो. होळी हा आनंदांचा सण आहे. होळी हा नात्यांचा सण आहे. होळी हा प्रेम आणि आनंदाचा सण आहे. जीवनातील असंख्य आठवणींना उजाळा देण्याचा हा सण आहे. हा एकमेव उत्सव आहे, ज्यात एकत्रितपणे रंग उधळून, मिठाई आणि चमचमीत पदार्थ (Holi 2021 traditional food) ग्रहण केले जातात (Holi 2021 Special traditional food dishes you can easily make at home).

रंगांच्या या उत्सवात, प्रत्येक घरात वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन बनवले जातात, जे केवळ चांगले दिसतात असे नाही, तर ते अतिशय चवदार देखील असतात. होळीच्या या सणानिमित्ताने असे काही पदार्थ खास तयार केले जातात, जे इतर दिवशी घरी बनत नाहीत. सणाच्या दिवशी या पदार्थांना सर्वाधिक महत्त्व असते. भारतात कोणताही सण मिठाई आणि खास पदार्थांशिवाय पूर्ण होत नाही.

जरी भारतात बनवलेले सर्व पदार्थ वेगवेगळ्या प्रदेशात नाव आणि रंग-रूप बदलत असले, तरी त्याची चव किंचितही कमी होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पाककृतींबद्दल सांगणार आहोत, ज्या होळीच्या निमित्ताने घरोघरी बनवल्या जातात आणि या पदार्थांनी एकमेकांच्या आयुष्यात गोडवा आणला जातो. चला तर, मग जाणून घेऊया होळीच्या खास दिवशी बनवल्या जाणाऱ्या ‘या’ खास पदार्थांबद्दल…

गुजिया

होळीसाठी बनवल्या जाणाऱ्या खास खाद्यपदार्थांच्या यादीत ‘गुजिया’ या मिठाईला पहिले स्थान आहे. मावा, नारळ आणि शेंगदाण्यांच्या मधुर मिश्रणाबरोबर, तळलेले-कुरकुरीत मिष्टान्न हे खास होळीच्या दिवशी घरोघरी बनवले जातो. याचा सुगंध सर्वांनाच मोहित करणार असतो. होळीसाठी ‘गुजिया’ एक खास गोड पदार्थ आहे, यात कोणतेही दुमत नाही (Holi 2021 Special traditional food dishes you can easily make at home).

गोलगप्पा (पाणी पुरी)

‘गोलगप्पा’ हे नावच चटपटीत आहे. बऱ्याच ठिकाणी या पदार्थाला ‘पाणी पुरी’ देखील म्हटले जाते. कुरकुरीत पुरी तिखट आणि आंबट, मसालेदार, गोड, सिझलिंग पाण्याने भरून खाण्याचा इतका मोह कोणाला होणार नाही? त्यामुळे होळीच्या दिवशी हा खास नाश्ता बनवणे आवश्यक आहे.

डाळ कचोरी

सर्वात लोकप्रिय आणि खमंग स्नॅक्सपैकी एक म्हणजे ‘डाळ कचोरी’. या पदार्थाचा केवळ एक घास त्याच्या उत्कृष्ट चवीने आपल्या जिभेला आणि पोटाला तृप्त करण्यासाठी पुरेसा असतो. मसाल्यांनी आणि सारणाने भरलेली, कुरकुरीत तळलेली ही कचोरी हिरव्या आणि गोड चटणीसह सर्व्ह केली जाते.

थंडाई

जेव्हा आपण होळी या सणाचा विचार करतो, तेव्हा थंडाईचा विषय निघणार नाही, असे होणे अशक्य आहे. या पदार्थाची प्रत्येकाची वेगळी रेसिपी असते. दुधात अनेक मसाले मिसळून, त्यांच्या मिश्रणाने थंडाई तयार केली जाते. काही लोक त्यात भांगही घालतात. वसंत ऋतूतील हे एक मोहक पेय आहे.

कांजी वडा

‘कांजी वडा’ हा एक सुपर क्रिस्पी पदार्थ आहे आणि त्याची आंबट, मसालेदार आणि चटपटीत चव आपल्याला स्फूर्ती देते. हा पदार्थ खरोखरच जिभेचे चोचले पुरवणारा आहे. तेव्हा यंदाच्या होळीत तुम्हीही हे पदार्थ घरी बनवून, त्याचा आस्वाद घेऊ शकता.

(Holi 2021 Special traditional food dishes you can easily make at home)

हेही वाचा :

Holi 2021 | कोरोना काळात होळी साजरी करण्याची चिंता वाटतेय? मग, ‘या’ प्रकारे करा घरच्या घरी आयोजन!

Weight Loss | उन्हाळ्याच्या काळात ‘या’ फळांच्या सेवनाने कमी होईल वजन! आरोग्यालाही होतील अनेक फायदे…

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.