AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : दररोज सकाळी प्या ही देशी पेयं, खोकला आणि सर्दी होईल दूर

हर्बल पेय रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्याबरोबरच इतर रोगांपासून दूर राहण्यास देखील मदत करते. (Take this drink every morning to get rid of coughs and colds, beneficial for health)

Health Tips : दररोज सकाळी प्या ही देशी पेयं, खोकला आणि सर्दी होईल दूर
दररोज सकाळी प्या ही देशी पेये, खोकला आणि सर्दी होईल दूर
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 29, 2021 | 9:19 AM
Share

नवी दिल्ली : देशभरात कोरोना थांबण्याचे नावच घेत नाही आहे. दररोज कोविड-संक्रमित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यामुळे कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे फार महत्वाचे आहे. यासाठी आपण हर्बल पेयांचे सेवन करु शकता. हे रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्याबरोबरच इतर रोगांपासून दूर राहण्यास देखील मदत करते. (Take this drink every morning to get rid of coughs and colds, beneficial for health)

1. आले + हळद + अॅपल सायडर व्हिनेगर

हळद, आले आणि एसीव्हीपासून बनविलेले हे हर्बल पेय आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या पेयामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म आहेत. अॅपल सायडर व्हिनेगर बद्धकोष्ठता, रक्तातील साखर, वजन कमी करणे आणि हृदयरोग रोखण्यास मदत करते. याशिवाय आपली रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत करते. तर हळद आणि आल्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि एंटीसेप्टिक गुणधर्म असतात. हळद आयुर्वेदिक औषध म्हणून वापरली जाते. त्याचबरोबर, पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढविण्यासाठीही आले उपयुक्त ठरते, जो विषाणूशी लढण्यास मदत करतो.

असे बनवा पेय

एक ग्लास पाण्यात आले आणि हळद टाकून 10 मिनिटे उकळून घ्या. उकळल्यानंतर हे पाणी थोडा वेळ ठेवा. ते कोमट झाल्यावर मध आणि एक चमचा सफरचंद व्हिनेगर घालून प्या. दररोज त्याचे सेवन केल्यास तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होईल.

2. ओवा + मिरपूड + तुळस

ओव्यामध्ये अनेक औषधी गुण असतात. हे बर्‍याच रोगांच्या उपचारांमध्ये वापरले जाते. याचा उपयोग पोटदुखी, सर्दी-खोकला आणि इतर समस्या दूर करण्यासाठी केला जातो. याशिवाय ओवा रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात खूप उपयुक्त आहे.

असे बनवा पेय

एका पॅनमध्ये 1 ग्लास पाणी, ओवा, काळीमिरी आणि तुळशीची पाने घाला आणि 5 मिनिटे उकळवा. उकळल्यानंतर हे पाणी थोडा वेळ ठेवा. हलके कोमट असताना यात मध मिसळा आणि ते प्या. यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत होईल आणि इतर बर्‍याच समस्यांपासून मुक्त होईल.

3. गिलोय + तुळस

गिलोयमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्याच्या सेवनाने रोग प्रतिकारशक्ती वाढते, तसेच सर्दी-खोकला देखील लवकरच निघून जातो. या व्यतिरिक्त, पाचक प्रणाली देखील योग्य आहे. तसेही तुळस अनेक प्रकारे फायदेशीर आहे. अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या बऱ्या करण्यातही तुळस उपयुक्त ठरते. आयुर्वेदात औषध म्हणून दोन्ही वापरले जातात. (Take this drink every morning to get rid of coughs and colds, beneficial for health)

इतर बातम्या

काळीज पिळवटून टाकणारी घटना, रुग्णवाहिका न मिळाल्याने मुलाने बाईकवरुन नेला आईचा मृतदेह

लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढणार का?, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमकी चर्चा काय?

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...