Puducherry Popular Museums : पुद्दुचेरीतील पाच सर्वात लोकप्रिय संग्रहालय

पुद्दुचेरीची ‘युरोप ऑफ इंडिया’ म्हणूनही ओळख आहे. देश-विदेशातील लोक येथे फिरायला येतात. पुद्दुचेरीमधील काही संग्रहालये खूप प्रसिद्ध आहेत. (The five most popular museums in Puducherry)

Puducherry Popular Museums : पुद्दुचेरीतील पाच सर्वात लोकप्रिय संग्रहालय
पुद्दुचेरीतील पाच सर्वात लोकप्रिय संग्रहालय
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 7:50 AM

नवी दिल्ली : पुद्दुचेरी हा दक्षिण भारतातील एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा केंद्रशासित प्रदेश पर्यटनस्थळांसाठी खूप लोकप्रिय आहे. 1954 पर्यंत येथे फ्रेंच वसाहती होत्या. त्यांच्या सभ्यतेचे अवशेष आजही पाहायला मिळतात. येथे अनेक वसाहती इमारती, चर्च, पुतळे आणि शहरासह तमिळ शैलीची वास्तुकला अस्तित्त्वात आहे. पुद्दुचेरीची ‘युरोप ऑफ इंडिया’ म्हणूनही ओळख आहे. देश-विदेशातील लोक येथे फिरायला येतात. पुद्दुचेरीमधील काही संग्रहालये खूप प्रसिद्ध आहेत. पुद्दुचेरीच्या ट्रीपदरम्यान तुम्ही या संग्रहालयानांच्या आवारात नक्की भेट देऊ शकता. (The five most popular museums in Puducherry)

पुद्दुचेरी संग्रहालय

या संग्रहालयाला ‘पोंडी संग्रहालय’ म्हणून देखील ओळखले जाते. पुद्दुचेरी संग्रहालय हे सर्व इतिहास आणि संस्कृतीप्रेमींचे आकर्षण केंद्र आहे. हे संग्रहालय सेंट लुईस स्ट्रीटमध्ये आहे. या संग्रहालयात पुद्दुचेरी आणि कराईकलच्या चोळ आणि पल्लव शासन काळातील काही उत्कृष्ट दगड आणि कांस्याच्या मूर्ती आहेत. याशिवाय या ठिकाणी अरिकामेडू रोमन वस्तीतून मिळवलेल्या कलाकृतीदेखील पाहायला मिळतात. बॅरिअल कलश, फ्रेंच फर्निचर, टेराकोटा शिल्पे, क्रोकरी, बंदूक, तलवारी, पेंटिंग्ज, आरसे आणि वेगवेगळ्या बऱ्याच गोष्टी येथे जतन करून ठेवलेल्या आहेत. पुद्दुचेरीजवळच्या समुद्रकिनाऱ्यावरून गोळा केलेल्या गोगलगाईसुद्धा येथे जतन केलेल्या आहेत.

भारतीदासन संग्रहालय

भारतीदासन संग्रहालय हे आणखी एक लोकप्रिय संग्रहालय आहे. हे पुद्दुचेरीमध्ये एक संशोधन केंद्र म्हणूनही काम करते. महान तमिळ कवी आणि अभ्यासक कनक सुब्बुरत्नम यांच्या नावावर असलेले हे संग्रहालय कवी सुब्बुरत्नम यांच्या भव्य जीवन आणि कार्याचे दर्शन घडवते. पुद्दुचेरीमध्ये भेट देण्यासाठी हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी एका ख्यातनाम कवीचे निवासस्थानसुद्धा होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्याचे संग्रहालयात रूपांतर झाले.

सुब्बुरत्नम यांची सुब्रह्मण्य भारती यांच्यावर भक्ती होती. त्यामुळे ते भारतीदासन म्हणजेच भारतीचे शिष्य म्हणून अधिक प्रसिद्ध आहेत. संग्रहालयात सुब्बुरत्नम यांच्या सर्वोत्कृष्ट साहित्यिक कामांचे जतन केले असून ते पर्यटकांना प्रेरक स्त्रोत म्हणून काम करते. महिला सक्षमीकरणासाठी सुब्बुरत्नम यांनी लिहिलेल्या काही लिपी येथे सापडतात. हस्तलिखिते आणि साहित्यकृतींबरोबरच पुद्दुचेरीतील हे प्रसिद्ध संग्रहालय भारतीदासन यांनी वापरलेल्या काठी, चष्मा, शाल, क्लिपबोर्ड, घड्याळ आणि डायरी यांसारख्या विविध गोष्टी येथे पाहायला मिळतात.

जवाहर टॉय संग्रहालय

पुद्दुचेरीच्या भेटीदरम्यान जवाहर टॉय संग्रहालयात नक्कीच भेट दिली पाहिजे. हे मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहे. गौबर्ट एव्हेन्यूवर जुन्या दीपस्तंभाजवळील या संग्रहालयात सुमारे १२० खेळणी आहेत. ही खेळणी महाराष्ट्र, गुजरात, आसाम, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब आदी अनेक राज्यांमधून गोळा केली आहेत.

भारथियार संग्रहालय

भारथियार संग्रहालय हे एक लोकप्रिय संग्रहालय आहे. या संग्रहालयाचे नाव प्रसिद्ध तामिळ कवी आणि देशभक्त सुब्रह्मण्य भारती यांच्या नावाने ठेवलेले आहे. हे कवीचे घर म्हणून मानले जायचे. आता हे एक तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला आले आहे. यात 3 खोल्या आहेत. पहिल्या खोलीत भारतीच्या जीवनावर परिणाम घडविलेल्या सर्वांची चित्रे आहेत. दुसऱ्या खोलीत कवी सुब्रम्हण्य भारती यांनी लिहिलेली सर्व जर्नल्स आणि त्यांचे प्रकाशित झालेले सर्व लेख प्रदर्शित झाले आहेत. तिसऱ्या खोलीमध्ये भारती यांच्या पेंटिंगसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांची छायाचित्रे आणि त्या काळातल्या प्रमुख स्वातंत्र्य सैनिकांसाठी त्यांनी लिहिलेल्या देशभक्तीपर कविता आणि पत्रे पाहायला मिळतात.

आनंद रंगा पिल्लई संग्रहालय

आनंद रंगा पिल्लई संग्रहालय पुद्दुचेरीमधील सर्वात प्राचीन इमारतींपैकी एक आहे, जे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. हवेली 1735 मध्ये बांधण्यात आली होती आणि याचे नाव आनंद रंगा पिल्लई यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. पिल्लई हे राज्यपाल जोसेफ फ्रेंकोइस डुप्लेक्स यांच्या दरबारी होते. हे संग्रहालय पुद्दुचेरीमधील फ्रेंच वसाहतींचा काळ समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. (The five most popular museums in Puducherry)

इतर बातम्या

सोन्याच्या हॉलमार्किंगशी संबंधित नियमात 2 बदलांची तयारी, सरकार मोठा निर्णय घेणार

ऐकावं ते नवलंच! कोरोनाला रोखण्यासाठी गल्लोगल्ली आमदारांकडून होमहवन, थेट शहरात फिरवला होमयज्ञ

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.