AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंदूर बनवण्यासाठी कोणत्या फळाचं बी वापरतात? महाराष्ट्राशी खास कनेक्शन काय ?

'सिंदूर'चे मूल्य काय असं ते भारताने पाकिस्तानला स्पष्ट भाषेत समजावून सांगितलं आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला 'ऑपरेशन सिंदूर' द्वारे घेण्यात आला आहे. सोशल मीडियावरही सध्या ऑपरेशन सिंदूरची खूप चर्चा आहे. पण सौभाग्याचं प्रतीक असलेला, विवाहीतेसाठी महत्वाचा असलेला सिंदूर कसा बनतो, कोणत्या फळापासून बनवला जातो, हे माहीत आहे का ?

सिंदूर बनवण्यासाठी कोणत्या फळाचं बी वापरतात? महाराष्ट्राशी खास कनेक्शन काय ?
सिंदूर बनवण्यासाठी कोणत्या फळाचं बी वापरतात?Image Credit source: TV9 Gujrati
| Updated on: May 08, 2025 | 12:45 PM
Share

पहेलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई करत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. संपूर्ण देशाल भारतीय सैन्याचा अभिमान आहे. भारतात, बहुतांश भागात, लग्नानंतर महिला सिंदूर लावतात. हिंदू धर्मात, सिंदूर हे सौभाग्याचे लक्षण मानले जाते. पण हा सिंदूर कशापासून बनवला जातो याचा विचार कधी केला आहेत का ? चला जाणून घेऊया.

सिंदूर बनवण्यासाठी कोणत्या फळाचं बी वापरतात?

सिंदूराचे एक झाड असतं आणि या झाडाला इंग्रजीत कुमकुम ट्री म्हणतात. कुंकवाच्या झाडाला कामील वृक्ष असेही म्हणतात. या झाडाच्या फळाचा वापर सिंदूर बनवण्यासाठी केला जातो. या झाडाच्या बिया बारीक करून सिंदूर बनवलं जातं, याची तुम्हाला कल्पना आहे का ?

भारतातील कोणत्या राज्यात सिंदूरची लागवड केली जाते ?

भारतातील 2 राज्यांमध्ये सिंदूरचे झाड सहज आढळते. महाराष्ट्रात या झाडाची लागवड केली जाते. याशिवाय, हिमाचल प्रदेशातील काही भागात सिंदूरची लागवड देखील केली जाते. भारतीय संस्कृतीत इतके महत्त्व असलेले सिंदूरचे झाड महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशात आढळते. या फळाच्या बियांचा वापर हर्बल लिपस्टिक बनवण्यासाठी देखील केला जातो.

कदाचित तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण भारताव्यतिरिक्त काही ठिकाणी या झाडाची लागवड केली जाते. कुमकुमची झाडे दक्षिण अमेरिकेत देखील आढळतात. कुमकुमच्या झाडाची उंची 20 ते 25 फूट असू शकते. सुरुवातीला या झाडाला हिरवी फळे येतात, परंतु हळूहळू या फळाचा रंग लाल होतो.

भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. त्यामध्ये दहशतवाद्यांनी 26 पुरूषांना ठार करत त्यांच्या पत्नींचे सौभाग्य हिरावून घेतलं. अखेर कारवाई करत भारताने पाकिस्तानला ‘सिंदूर’चे मूल्य काय असं ते स्पष्ट भाषेत समजावून सांगितलं आहे. भारताने 9 दहशतवादी तळांवर कारवाई करत सुमारे 100 दहशतवाद्यांना ठार केलं.

Follow Us
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!.
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा....
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग....
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल....
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी...
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी....
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला...
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला....
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी...
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी....
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर....
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर.