Gen Z ना होत आहेत ‘हे’ 5 गंभीर आजार, तरूण्यातच मृत्यूचा धोका वाढण्याची शक्यता

मध्यम वयात म्हणजे वयाच्या 40-50 शी नंतर होणारे आजार हे सामान्य आहे. परंतु हेच आजार जर तारूण्यातच होऊ लागले तर हा चिंतेचा विषय ठरत आहे. कारण अनेकवेळा हे आजार तरूणांना मृत्यूच्या उंबरठ्यावर घेऊन जात आहे, आणि हे आजार आजकाल Gen Z जनरेशनच्या मुलांना होत आहे. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात...

Gen Z ना होत आहेत हे 5 गंभीर आजार, तरूण्यातच मृत्यूचा धोका वाढण्याची शक्यता
These 5 serious diseases are affecting Gen Z
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 01, 2025 | 12:38 PM

आजच्या तरूण पिढीच्या काही चुकीच्या जीवनशैलीमूळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे कमी वयातच अनेकजण बळी पडत आहेत. कारण पूर्वी जे आजार वयाच्या 40-50 वर्षांनंतर लोकांना होते, तेच आजार आता 20-30 वर्षांच्या तरुणांना वेगाने प्रभावित करत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे बदलती जीवनशैली, ताणतणाव, झोपेची कमतरता, आहार वेळेवर सेवन न करणे आणि वाढता स्क्रीन टाइम. या सर्व कारणामुळे यांचा लवकरच आरोग्यावर परिणाम होत आहे. आता जनरेशन झेड मध्ये कोणते आजार मुलांना सतावत आहेत ते जाणून घेऊयात.

Gen Z यांना कोणते आजार सतावत आहे?

1. मधुमेह आणि प्री- डायबेटीस

पूर्वी टाइप-२ मधुमेह हा अनुवशिंक कारणांमुळे आजार होत असल्याचे मानले जात होते, परंतु आता 20-30 वर्षे वयोगटातील मुलांनाही हा आजार झपाट्याने होऊ लागला आहे. याचे कारण म्हणजे शारीरिक हालचालींचा अभाव, प्रक्रिया केलेले अन्न आणि साखरेयुक्त पेये यांचे जास्त सेवन.

2. उच्च रक्तदाब:

ताणतणाव, झोपेची कमतरता आणि जेवणात जास्त मीठ यामुळे तरुणांनाही उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ लागली आहे. पूर्वी ही समस्या साधारणपणे 40 वर्षांच्या वयानंतर होत असे, परंतु आता ती कॉलेज आणि ऑफिसला जाणाऱ्या तरुणांमध्येही दिसून येते.

3. लठ्ठपणा आणि चयापचय सिंड्रोम

फिजिकल इनॲक्टिव्हिटी आणि जंक फूडच्या सवयींमुळे, तरुणांच्या शरीरामध्ये लठ्ठपणा तसेच फॅटी लिव्हर आणि कोलेस्टेरॉल असंतुलन यासारख्या समस्याही वेगाने वाढत आहेत.

4. नैराश्य आणि चिंता

मानसिक आरोग्याच्या समस्या आता तरुणांवर झपाट्याने परिणाम करत आहेत. सोशल मीडियाचा प्रेशर, करिअरची चिंता सतावणे आणि नातेसंबंधातील ताण यामुळे, पिढीमध्ये नैराश्य आणि चिंता वाढल्या आहेत.

5. हृदयरोग

हृदयविकार हा एकेकाळी मध्यम वयातील लोकांना होत होता. परंतु आता हा धोका कमी वयातील मुलांना देखील होत आहे. धूम्रपान, मद्यपान, चुकीचे आहार आणि ताणतणाव ही याची प्रमुख कारणे आहेत. तुम्ही पाहिले असेलच की तरुण वयातील अनेकांचा मृत्यू हृदयविकारामुळे होत आहेत.

ते टाळण्यासाठी काय करावे?

जर Gen Zला हे आजार टाळायचे असतील तर त्यांनी त्यांच्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, वेळेवर झोपणे आणि मानसिक शांतता राखणे महत्वाचे आहे. अन्यथा जे आजार 40 वर्षांच्या वयानंतर होतात, ते आता 20 वर्षांच्या वय असलेल्या मुलांच्या आयुष्यावर परिणाम करत आहेत.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)