घरातील स्विचबोर्ड साफ करण्यासाठी ‘या’ 5 घरगुती उपायांचा अवलंब करून काही मिनिटांत करा स्वच्छ
स्विचबोर्ड साफ करण्याकडे अनेकदा आपलं दुर्लक्ष होते. ज्यामुळे ते खूप खराब दिसतात. पण आता तुम्ही या घरगुती उपायांचा अवलंब करून काही मिनिटांतच स्विचबोर्ड साफ करू शकता. चला तर मग या उपायांबद्दल जाणून घेऊयात...

प्रत्येक व्यक्ती आपलं घर स्वच्छ राहावे यासाठी नियमित साफसफाई करत असतात. मात्र बऱ्याचदा घरातील काही कोपरे तसेच उंच जागा अस्वच्छ राहतात. त्याचपैकी एक म्हणजे घरातील स्विचबोर्ड. त्यांची नीट स्वच्छता केली गेली नाही तर त्यावर धूळ, तेल, ओलावा साचल्याने खराब होतात. यामुळे स्विच बोर्ड केवळ रंगहीन आणि पिवळे होत नाहीत तर ते खूप अस्वच्छ देखील होतात. विशेषतः स्वयंपाकघरात बसवलेल्या स्विच बोर्डवर जमा होणारी घाण अधिक हट्टी असते. याशिवाय बाथरूम किंवा मुलांच्या खोलीचे स्विच बोर्ड लवकर खराब होतात. खराब स्विचवर जमा होणारे जंतू देखील संसर्गाचा धोका वाढवतात. म्हणून, वेळोवेळी ते स्वच्छ करणे आवश्यक आहे, ज्यासाठी ते दररोज कोरड्या कापडाने स्वच्छ केले पाहिजे, परंतु असे असूनही, जर स्विच बोर्ड तेलकटपणा आणि धुळीमुळे खराब झाले असतील तर तुम्ही या घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात.
स्विचबोर्ड स्वच्छ करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच खबरदारी घेणेही महत्त्वाचे आहे. प्रथम घरातील सर्व लाईट मुख्य स्विचवरून बंद करा, जेणेकरून विजेचा धक्का बसण्याची भीती राहणार नाही. याशिवाय, हातमोजे घाला. यामुळे तुम्ही साफसफाई करताना आणखी सुरक्षित राहाल. चला जाणून घेऊया अशा 5 सोप्या घरगुती टिप्स ज्याद्वारे स्विचबोर्ड लवकर स्वच्छ होतील.
लिंबूने स्वच्छ करा स्विचबोर्ड
स्विचबोर्ड स्वच्छ करण्यासाठी साबणात लिंबाचा रस मिक्स करा. तयार मिश्रण कापसाच्या गोळा किंवा कोणत्याही सुती कापडावर थोडा ओला करून स्विचबोर्ड स्वच्छ करा. यानंतर एका साध्या ओल्या कापडाने पुन्हा स्विचबोर्ड स्वच्छ करा आणि नंतर कोरड्या कापडाने पुसून टाका.
स्विचबोर्डमध्ये पाणी अजिबात जाणार नाही याची खात्री करा. हे काम खूप काळजीपूर्वक करा. यामुळे तुमचा स्विचबोर्ड चमकेल.
व्हिनेगरने स्विचबोर्ड चमकदार होईल
जर तुमच्या घरात व्हिनेगर असेल तर तुम्ही त्याचे लिक्विड तयार करू शकता आणि त्याद्वारे तुम्ही वेळोवेळी स्विचबोर्ड सहजपणे स्वच्छ करू शकता, जेणेकरून ते नवीन दिसेल. यासाठी पाणी आणि व्हिनेगर समान प्रमाणात मिक्स करा. आता हे मिश्रण तुम्ही कापडाच्या साहाय्याने किंवा ब्रशच्या मदतीने स्विचबोर्ड स्वच्छ करा, ज्यामुळे घाण आणि बॅक्टेरिया दोन्ही निघून जातील.
स्विचबोर्ड साफ करण्यासाठी टूथपेस्ट देखील उपयुक्त
टूथपेस्ट तुमच्या स्विचबोर्डला चमकदार बनवू शकते. यासाठी ओल्या टूथब्रशवर थोडी टूथपेस्ट घ्या आणि त्याद्वारे स्विचबोर्ड स्वच्छ करा आणि नंतर ते लगेच कोरड्या कापडाने पुसून घ्या.
गरम पाणी आणि सर्फ पावडर
एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि त्यात साबण किंवा सर्फ मिक्स करा. परंतु लक्षात ठेवा की तुम्हाला कमी पाण्यात जास्त साबण घालावे लागेल जेणेकरून लिक्विड घट्ट राहील. कापड किंवा ब्रशच्या मदतीने स्विच बोर्ड स्वच्छ करा आणि लगेच कोरड्या कापडाने पुसून घ्या.
नेल पेंट रिमूव्हर काम करेल
जर तुमच्याकडे स्विचबोर्ड स्वच्छ करण्यासाठी क्लिनर नसेल, तर तुम्ही त्याऐवजी नेल पेंट रिमूव्हर वापरू शकता. यासाठी रिमूव्हर कापसाच्या गोळ्यावर घ्या आणि बोर्ड स्वच्छ करा. यामुळे थोड्याच वेळात सर्व डाग निघून जातील. लक्षात ठेवा की नेल पेंट रिमूव्हर जास्त प्रमाणात वापरू नये. कधीकधी ते स्विचबोर्डचा रंग देखील फिकट करू शकते.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
