
Harmful food for Hair : केस हे आपल्या डोक्यावर मुकुटाप्रमाणे असतात. सौंदर्य वाढवण्यात केसांचाही महत्वाचा भाग असतो. तुमचे केस किती (strong hair) मजबूत, लांब आणि घनदाट आहेत, हे तुमच्या डाएटवर ठरतं. याच कारणामुळे हेल्थ एक्स्पर्ट हे बदाम, अक्रोड आणि व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ भरपूर खाण्याचा, त्यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात.
पण कळत-नकळतपणे आपण काही असे पदार्थ खातो, ज्यामुळे केस कमकुवत होऊन ते गळू लागतात. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया. असे पदार्थ खाणं टाळणं हे केसांच्या दृष्टीने उत्तम ठरतं.
जास्त साखरयुक्त पदार्थ
जास्त साखर असलेले, गोड पदार्थ आणि पेय हे शरीराच्या दृष्टीने आणि केसांसाठीही चांगले नसतात. त्यामुळे हार्मोनल बॅलन्स बिघडतो. ज्याच्या केसांच्या वाढीवर परिणाम दिसून येतो.
प्रोसेस्ड फूड
प्रोसेस्ड फूड किंवा प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये पोषक तत्वं म्हणजे न्यूट्रिएंट्सची कमतरता असते. त्यामध्ये फॅट्स, साखर आणि आर्टिफिशिअल किंवा कृत्रिम पदार्थांचा वापर जास्त केला जातो. त्यामुळेच हे पदार्थ अनहेल्दी मानले जाता. आहारात पोषक तत्वांचा अभाव अथवा कमतरता असेल तर हेअर फॉलिकल्सचे नुकसान होते.
फास्ट फूड
फास्ट फूडमध्ये अनहेल्दी फॅट्स आणि सोडिअमचे प्रमाण जास्त असते. तसेच या पदार्थांमध्ये पोषक तत्वांची कमतरता असते, त्यामुळे केसांवरही परिणाम होतो. लांब आणि दाट केसांसाठी फास्ट फूड टाळणे, त्यांचे सेवन न करणे हेच उत्तम ठरते.
लो प्रोटीन डाएट
केसांसाठी प्रोटीन हे अतिशय महत्वाचे मानले जाते. कमी प्रोटीन असलेले पदार्थ खाल्ल्याने किंवा तसा आहार घेतल्याने केस कमकुवत होतात. त्यामुळेच घनदाट, मजबूत केस हवे असतील आणि केसगळती रोखायची असेल तर आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा अवश्य समावेश करावा. ते फायदेशीर ठरते.
कॅफेन
कॅफिनचे अतिसेवन हेही केसांसाठी हानिकारक ठरू शकते. दररोज कॅफिनचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीर डिहायड्रेट होऊ शकते. यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते व त्यांची वाढ खुंटू शकते.
मद्यपान
जास्त मद्यपान केल्याने शरीर डिहाड्रेट होऊ शकते. त्यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरताही निर्माण होऊ शकते. केसांची मजबूती आणि वाढीसाठी व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स हे महत्वपूर्ण असतात. त्यामुळे मद्यपान करणे टाळावे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)