AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिना वॅक्सिंग किंवा रेझरशिवाय फेशियल हेअर रिमूव्ह करण्यासाठी ‘हे’ हॅक्स करतील मदत

फेशियल हेअर रिमुव्ह करण्यासाठी महिला सामान्यतः रेझर किंवा वॉक्सचा वापर करतात. परंतु यामुळे कधी कधी त्वचेचे नुकसान होते. तर आजच्या लेखात आपण अशा घरगुती उपायाबद्दल जाणून घेणार आहोत जो तुमच्या चेहऱ्याला इजा न करता चेहऱ्यावरील केस काढून टाकेल आणि चेहरा चमकदार ठेवेल.

बिना वॅक्सिंग किंवा रेझरशिवाय फेशियल हेअर रिमूव्ह करण्यासाठी 'हे' हॅक्स करतील मदत
बिना वॅक्सिंग किंवा रेझरशिवाय फेशियल हेअर रिमूव्ह करण्यासाठी 'हे' हॅक्स करतील मदतImage Credit source: Tatiana Meteleva/Moment/Getty Images
| Edited By: | Updated on: Jan 12, 2026 | 10:44 PM
Share

प्रत्येकालाच आपल्या चेहऱ्याचं सौदर्य नैसर्गिक असावं अशी इच्छा असते. मात्र चेहऱ्यावर असलेले छोटे हलके केस अनेकदा मेकअप करताना लूक खराब करतात. कारण मेकअपने हे लहान केस लपवावे लागतात तेव्हा चेहऱ्याचा लूक चांगला दिसतो. अशावेळेस अनेकदा महिला चेहऱ्यावरील केस काढून टाकतात. महिला चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी वॅक्सिंग आणि रेझरचा वापर करतात. अशा पद्धतीने केस काढणे कोणत्याही दृष्टीकोनातून योग्य नाही. कारण चेहऱ्यावरील नको असलेले केस काढत असताना त्वचेवर रेझर कधीकधी कट होऊ शकतात आणि वॅक्सिंगमुळे जळण्याचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. म्हणून जर तुम्हाला कोणत्याही समस्येशिवाय व वेदनेशिवाय चेहऱ्यावरील नको असलेले केस काढायचे असतील, तर हा लेख तुमच्यासाठी आहे.

आज आपण अशा पद्धतीबद्दल जाणून आहोत जे वॅक्सिंगग किंवा रेझरशिवाय चेहऱ्यावरील केस काढून टाकण्यास मदत करते. ही पद्धत पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित आहे. चला जाणून घेऊया ती पद्धत काय आहे आणि ती कशी करायची.

चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून टाकण्याचा नैसर्गिक मार्ग

चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी आजकाल अनेक घरगुती उपाय वापरले जात आहेत. असाच एक उपाय म्हणजे हळदीचा पॅक, जो वॅक्सिंग किंवा रेझरशिवाय चेहऱ्यावरील अगदी लहान केस देखील काढून टाकण्यास मदत करतो. सोशल मीडियावरील अनेक सौंदर्य तज्ञ आणि इंफ्लूएंसर देखील या पद्धतीने चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून टाकण्याची सल्ला देतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की फेस पॅक केवळ चेहऱ्यावरील केस काढून टाकत नाहीत तर चमकदार आणि नितळ त्वचा राखण्यास देखील मदत करतात.

चेहऱ्यावरील केस काढून टाकण्यासाठी फेस पॅक

हळदीचा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला तांदळाचे पीठ, मध आणि दूध यासारख्या घटकांसह हळद लागेल. हा फेसपॅक तयार करण्यासाठी तुम्हाला एका वाटी घ्या आणि त्यात तांदळाचे पीठ, मध आणि दूध मिक्स करा. त्यानंतर सर्व मिश्रणाची जाडसर पेस्ट तयार करा.

चेहऱ्यावर हा फेसपॅक कसा लावायचा?

हळद आणि तांदळाच्या पिठाचा हा पॅक तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर समान पद्धतीने लावा. यासाठी तुम्ही ब्रश देखील वापरू शकता. चेहऱ्यावर हा फेस पॅक 15-20 मिनिटे तसेच राहू द्या. पॅक पूर्णपणे सुकल्यानंतर केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने हलक्या हाताने फेसपॅक घासून काढून टाका.

पॅकचे काय फायदे आहेत?

हळद चेहऱ्यासाठी वरदान मानली जाते. त्यात दाहक-विरोधी, जीवाणूरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे त्वचेला उजळवतात आणि रंग सुधारतो. याव्यतिरिक्त या फेसपॅक मध्ये असलेले तांदूळ पीठ आणि मध हे चकमदार त्वचेसाठी फायदेशीर ठरते. तसेच ते त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते, ज्यामुळे त्वचा मऊ आणि नितळ राहते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

तुम्ही म्हणजे मुंबई, महाराष्ट्र नाही... फडणवीस यांचा ठाकरेंवर घणाघात
तुम्ही म्हणजे मुंबई, महाराष्ट्र नाही... फडणवीस यांचा ठाकरेंवर घणाघात.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांचं वादळी भाषण
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांचं वादळी भाषण.
पुढच्या 5 वर्षाचा प्लान सांगत शिवतीर्थावरून शिंदेंचा विरोधकांवर निशाणा
पुढच्या 5 वर्षाचा प्लान सांगत शिवतीर्थावरून शिंदेंचा विरोधकांवर निशाणा.
...त्यांना तिथेच ठोका आणि मारा, मतदारांना राज ठाकरेंचं भरसभेतून आवाहन
...त्यांना तिथेच ठोका आणि मारा, मतदारांना राज ठाकरेंचं भरसभेतून आवाहन.
राज ठाकरेंनी ५ कोटींची ऑफर नाकारणाऱ्या राजश्री नाईक यांचा केला सन्मान
राज ठाकरेंनी ५ कोटींची ऑफर नाकारणाऱ्या राजश्री नाईक यांचा केला सन्मान.
जगणं झालं छान कारण चोरला आमचा धनुष्यबाण, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
जगणं झालं छान कारण चोरला आमचा धनुष्यबाण, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका.
अण्णामलाईंची मुक्तापळं अन् ठाकरे बंधूंनी सुनावलं, तर राऊतांनी औकात....
अण्णामलाईंची मुक्तापळं अन् ठाकरे बंधूंनी सुनावलं, तर राऊतांनी औकात.....
काल आदानींच साम्राज्य दाखवून भाजपवर टीका,आज राज ठाकरेंचा तो फोटो बाहेर
काल आदानींच साम्राज्य दाखवून भाजपवर टीका,आज राज ठाकरेंचा तो फोटो बाहेर.
ठाकरेंना अदानी नव्हे तर... राज ठाकरे यांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर
ठाकरेंना अदानी नव्हे तर... राज ठाकरे यांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर.
संघर्ष मराठीचा की ठाकरेंच्या अस्तित्वाचा? ठाकरे बंधूंवर फडणवीसाची टीका
संघर्ष मराठीचा की ठाकरेंच्या अस्तित्वाचा? ठाकरे बंधूंवर फडणवीसाची टीका.