Relationship ideas: भविष्यात तुमचा होणारा पती नात्यात गाजवेल वर्चस्व ,अशी काही लक्षणं जी लग्नाआधी ओळखायला हवीच!!

Relationship tips: साखरपुडा आणि लग्न या दोघांमध्ये अंतर ठेवणे खूपच महत्त्वाचे मानले जाते. जसे की जर तुमचा होणारा पती भविष्यात तुमच्यावर जर वर्चस्व गाजवणारा असेल तर अशावेळी आपल्याला काही संकेत जाणून घेणे गरजेचे ठरते. आज आपण या लक्षणांबद्दलच जाणून घेणार आहोत.

Relationship ideas: भविष्यात तुमचा होणारा पती नात्यात गाजवेल वर्चस्व ,अशी काही लक्षणं जी लग्नाआधी ओळखायला हवीच!!
रिलेशनशिप बद्दल काही टीप्स
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 8:48 PM

लग्नासाठी जोडीदार( Life partner ) निवडणे हा अतिशय महत्त्वाचा निर्णय असतो. आपला होणारा पार्टनर चांगला असावा. आपला संसार सुखाचा व्हावा अशी प्रत्येक मुलगी स्वप्न पाहत असते. प्रत्येक जण भविष्यात आपला पार्टनर कसा असावा याबद्दल विचार करत असतात आणि त्यानुसार वेगवेगळे स्वप्न सुद्धा पाहत असतात. जर आपल्या जोडीदाराची निवड चुकली तर त्याचे भविष्यात गंभीर परिणाम देखील आपल्याला भोगावे लागू शकतील. आपला जोडीदार हा स्वभावाने कसा असेल, त्याची वागणूक कशी असेल या सर्वांबद्दल जाणून घेणे देखील भविष्याच्या दृष्टिकोनातून अनेकदा महत्त्वपूर्ण ठरते म्हणूनच अशा वेळी जर आपली निवड चुकली तर आयुष्यभर आपल्याला पचतावा ( Life tips in marathi) करावा लागू शकतो. लग्न अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज असो.. या दोघांमध्ये जोडीदाराची निवड महत्त्वाची असते. प्रत्येक मुलाने व मुलीने आपला पार्टनर भविष्यात कसा असेल त्याची काही लक्षणे जाणून घेणे गरजेचे आहे.सुरुवातीच्या काळामध्ये सगळं काही व्यवस्थित चालते परंतु आपल्याला नात्याला जसा जसा वेळ होतो तसे अनेकदा आपल्यामध्ये काही गोष्टी खटकू लागतात. अनेकदा आपल्याला नात्याला खूप दिवस झाल्यावर एकमेकांबद्दलची सगळी माहिती आपल्याला कळलेली असते. बहुतेक वेळा जे घडायला नको असते तेच अनेकदा घडते.म्हणूनच लग्न आणि साखरपुडा या दरम्यान अंतर असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला तुमचे भविष्य उज्ज्वल बनवायचे असेल आणि तुमच्या नात्याला एक चांगले वळण द्यायचे असेल तर काही गोष्टींची काळजी (Relationship tips) आपल्याला घ्यायला हवी. जर भविष्यात होणार तुमचा नवरा तुमच्यावर वर्चस्व गाजवणारा असेल तर तुमचे जीवन नरकमय होऊ शकते आणि म्हणूनच आपल्याला काही लक्षणे जाणून घ्यायला पाहिजेत

निर्णय घेऊ न देणे

तज्ञ मंडळींच्या मते, ज्या लोकांमध्ये हुकूम गाजवण्याची प्रवृत्ती असते,अशा प्रकारचे लोक आपल्या पार्टनरला किंवा परिवारातील एखाद्या सदस्याला कोणताही निर्णय घेऊ देत नाही. लग्ना आधी तुम्ही तुमच्या पार्टनर मध्ये हुकूमशहाची वृत्ती तुम्हाला दिसत असेल तर भविष्यात तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी कठीण होऊन बसतील. तुमच्या नात्यांमध्ये तुमचा जोडीदार नेहमी स्वतः चेच म्हणणे खरे ठरवेल पण तुम्हाला कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ देणार नाही आणि अशा प्रकारचा स्वभाव भविष्यात धोकादायक ठरू शकतो.

दुसऱ्यांचे म्हणने न ऐकणे

ज्या व्यक्तींचा स्वभाव डॉमिनेटिंग असतो अशा प्रकारच्या व्यक्ती कुणाचेच काही म्हणणे ऐकून घेत नाही. या व्यक्तींना स्वतःचे म्हणणे खरे करण्याची सवय असते. जर आपण त्यांच्याविरुद्ध काही बोललो तर त्याला त्वरित राग येतो आणि त्यांचा रागावर नियंत्रण राहत नाही. असेच अनेकदा पती-पत्नी आणि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मध्ये सुद्धा घडते. जर तुम्ही भविष्यात लग्न करणार असाल आणि तुमच्या नात्यामध्ये सुद्धा अशा काही गोष्टी घडत असतील तर हा एक संकेत आहे की भविष्यात तुमचा जोडीदार फक्त त्याचे म्हणणे खरे करेल. जर तुम्ही तुमच्या पार्टनर ची ही सवय बदलू शकणार असाल तरच अशा व्यक्ती सोबत लग्न करा अन्यथा तुमच्या निर्णयाला व तुमच्या मताला कोणताच मानसन्मान राहणार नाही हेही तितकेच खरे आहे.

नेहमी तुमच्या चुका काढणे

आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात, की त्यांना नेहमी इतरांच्या कामाबद्दल किंवा वागण्याबद्दल चुका काढण्याची सवय असते.अशा प्रकारच्या व्यक्ती प्रत्येक गोष्टींमधून काहीना काही कमतरता दाखवत असतात. जर तुम्ही भविष्यात लग्न करणार असाल आणि तुमचा जोडीदार सुद्धा तुमच्या प्रत्येक गोष्टींमधून चुका काढत असेल तर हे एक सावधानतेचे लक्षण ठरेल. तुमचा होणारा नवरा डॉमिनेटिंग स्वभावाचा आहे यावरून सिद्ध होते. अशा प्रकारच्या व्यक्ती सोबत लग्न करताना दहा वेळा विचार करा.

स्वतःची चूक कबूल न करणे

नेहमी आपलेच खरे मानणारे आणि इतरांचे वाईट चिंतणारे लोक कधीही स्वतःची चुक मान्य करत नाही. अशा प्रकारच्या व्यक्ती नेहमी आपली चूक इतरांवर टाकण्याचा प्रयत्न करत असतात.आपल्या चुकांचे खापर इतरांवर कशा पद्धतीने फोडता येईल आणि आपण कार्य करून नामानिराळे कसे होऊ याचा नेहमी प्रयत्न करत असतात. जर तुम्ही भविष्यात लग्न करत असाल आणि तुमचा जोडीदार या स्वभावाचा असेल तर तुम्हाला भविष्यात खूप अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

टिप्स: वरील माहिती सर्वसामान्य स्वरूपाची सांगण्यात आलेली आहे. जर तुम्हाला तुमच्या पार्टनर मध्ये वरील काही लक्षणे जाणवत असतील तर अशा वेळी त्याच्याशी बोला व तज्ञ मंडळींचा सल्ला अवश्य घ्या. टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्या प्रकारचा सल्ला देऊ इच्छित नाहीये.

उन्हाळ्यात ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा… पोटाच्या समस्यांपासून दूर रहा

तुम्ही हर्बल चहाचं सेवन करता… मग थांबा!, ही बातमी अवश्य वाचा…

‘पिकू’तील बिग बींप्रमाणे तुम्हालाही त्रास होतो? बद्धकोष्ठतेची कारणं आणि उपाय जाणून घ्या

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.