50 वर्षांपूर्वीचं सूप प्यायचंय का ? मग या रेस्टॉरंटमध्ये नक्की जा… व्हिडीओ होतोय व्हायरल

50 Year Old Soup : 50 वर्षांहून अधिक जुन्या ब्रॉथ (रस्सा) मध्ये शिजवलेले सूप तुम्ही कधी खाल्ले आहे का?

50 वर्षांपूर्वीचं सूप प्यायचंय का ? मग या रेस्टॉरंटमध्ये नक्की जा... व्हिडीओ होतोय व्हायरल
Image Credit source: instagram
| Updated on: Apr 21, 2023 | 1:01 PM

बँकॉक : हिवाळ्यात शरीर उबदार ठेवायचे असो किंवा एखादी व्यक्ती आजारी असो, अशा वेळी कोणालाही गरमागरम सूप (hot soup) प्यायला खूप आवडते. ते बनवायला तर सोपं असतंच पण त्यासोबतच ते अतिशय पौष्टिकही (healthy) असतं. चविष्ट आणि गरम सूपची चव आपण सर्वांनीच चाखली असेल, पण 50 वर्षांहून अधिक जुन्या ब्रॉथमध्ये (रस्सा) शिजवलेले असे सूप (50 Year Old Soup) तुम्ही कधी पाहिले आहे का? हे वाचल्यानंतर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण हे अगदी खरं आहे.

थायलंड येथील बँकॉक मध्ये असेच एक रेस्टॉरंट आहे, जिथे 50 वर्षं जुन्या ब्रॉथमध्ये सूप बनवले जाते. या रेस्टॉरंटमध्ये वर्षानुवर्षे जुन्या ब्रॉथमध्ये ताजे मांस मिसळतात आणि त्याचे सूप तयार करून लोकांना सर्व्ह केले जाते. या रेस्टॉरंटचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

50 वर्ष जुनं सूप

@tonsil नावाच्या इंस्टाग्राम हँडलवरून या रेस्टॉरंटचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, रेस्टॉरंट ऑनर 50 वर्षांच्या रस्सापासून बनवलेले मांस, भाज्या आणि सूप सर्व्ह करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यातील कॅप्शनमध्ये असे लिहीण्यात आले आहे की – बँकॉकमधील वट्टाना पानिच रेस्टॉरंटमध्ये 50 वर्ष जुन्या रस्स्यामध्ये सूप शिजवले जात आहे. जवळजवळ पाच दशके, तोच रस्सा एका मोठ्या भांड्यात उकळत आहे आणि त्यात दररोज ताजे मांस टाकले जाते.

व्हिडिओ पहा –

बँकॉकमधील सर्वात लोकप्रिय रेस्टॉरंट

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टनुसार, वट्टाना पानिच हे बँकॉकमधील सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरंटपैकी एक आहे. इथे 50 वर्षांपासून सूप बनवण्यासाठी हाच ब्रॉथ (रस्सा) वापरला जात आहे. असे जुने सूप पिण्यासाठी रेस्टॉरंटच्या बाहेरही लोकांची गर्दी पाहायला मिळते. सूप बनवण्याचे हे काम एकाच कुटुंबातील तीन पिढ्या करत आहेत. या पोस्टवरील कमेंट्स वाचल्या तर लक्षात येईल की, हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत तर काहींनी या खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत चिंता व्यक्त केली आहे.