AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या 6 उपायांनी तुमच्या घरात येईल सुख-समृद्धी, आनंदी जीवनाचा हे आहेत उत्तम मार्ग

घरात शांती आणि समृद्धी टिकून राहण्यासाठी देवाचे आभार मानत 'कराग्रे वसते लक्ष्मी' या मंत्राचा जप करा. तसेच गरिबांना जेवण द्या, मोठ्याचे आशीर्वाद घ्या, घरात सुंगधित ठेऊन दिवा लावा.

या 6 उपायांनी तुमच्या घरात येईल सुख-समृद्धी, आनंदी जीवनाचा हे आहेत उत्तम मार्ग
| Edited By: Jitendra Zavar | Updated on: Feb 22, 2025 | 7:41 PM
Share

प्रत्येकालाच असे वाटते की त्यांच्या घरात आनंद आणि शांती असावी आणि कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. पण सध्याच्या काळात, अशी फार कमी घरे आहेत जिथे कोणत्याही प्रकारचा संघर्ष नाही. जर तुमच्या घरात दररोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर त्रास होत असेल, घरात अशांततेचे वातावरण निर्माण होत असेल, घरातील लोकं अजिबात आनंदी नसतील, तर आज आम्ही तुम्हाला ज्योतिषशास्त्रानूसार अशा काही टिप्स आणि उपाय सांगत आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंद आणू शकता. यासाठी हे उपाय करा.

देवाचे ध्यान करा

सकाळी आंघोळ केल्यानंतर तुम्ही देवघरात जाऊन बसले पाहिजे असे कोठेही नाही. तुमच्या मनात देवाबद्दल असलेली श्रद्धा फार महत्वाची आहे. यासाठी देवाचे ध्यान करा, त्याने तुम्हाला दिलेल्या गोष्टींसाठी देवाचे आभार माना आणि तुमचा दिवस शुभ जावो अशी प्रार्थना करा. हे दररोज नियमितपणे करा आणि मग पहा, जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता बाळगू शकाल, तेव्हा तुम्हाला सर्वत्र सकारात्मकता दिसेल. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुमचा आनंद शोधण्याचा प्रयत्न करा.

या मंत्राचा जप करा

शास्त्रांमध्ये कोणत्याही दैनंदिन दिनचर्येपूर्वी ‘कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती. करमूले तू ब्रह्माए प्रभाते कर दर्शनम्‌‌.’ या मंत्राचा जप करा. म्हणजेच सकाळी उठताच या मंत्राचा जप करा आणि दिवसभराच्या चिंतांपासून मुक्त व्हा. या मंत्राचा जप करताना तुमच्या तळहातांव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीकडे पाहू नका. सकाळी उठताच एकदा या मंत्राचा जप करणे म्हणजे स्वतःसाठी आनंदाची प्रार्थना करण्यासारखे आहे.

गरिबांना अन्न दान करा

प्रत्येकांच्या घरात दररोज जेवण बनवले जाते. तर अशावेळी जेवणातून थोडेसे अन्न अशा व्यक्तीसाठी काढून ठेवा जे खूप भूकेले आहेत. किंवा ज्यांना तुम्हीला इतर गोष्टींची मदत करण्याची इच्छा आहे. पण ते करू शकत नसल्यास तुम्ही त्यांना दररोज अन्न दान करून मदत करू शकता. असे केल्याने तुमच्या मनाला मिळणारी शांती इतर कोणत्याही आनंदापेक्षा मोठी नसेल.

वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद

रोज सकाळी उठून त्यांचे आशीर्वाद घ्या. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने घरात आनंद वातावरण राहते. तसेच तुम्ही वाईट संकटांपासून सुद्धा सुरक्षित राहता. आपल्या हिंदू धर्मात वडीलधाऱ्यांना देवाचा दर्जा दिला आहे. जर तुम्ही तुमच्या पालकांची खऱ्या मनाने सेवा केली तर तुम्हाला देवाची पूजा करण्याचीही गरज नाही. त्यांच्याकडून तुम्हाला जीवनातील सर्वात मोठा आशीर्वाद मिळतो.

घरातील वातावरण सुगंधित ठेवा

तुमच्या घरात नेहमी सुगंधी वातावरण असणे फार महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही घरात सुगंधीत अगरबत्ती लावा किंवा बाजारात मिळणारे लिक्विड फिलर्स तसेच रूम फ्रेशनर्स इत्यादी गोष्टी घरातील हवा ताजी ठेवतात. सुगंधित हवा तुमच्या मेंदूत आनंदाचे हार्मोन्स तयार होतात. जेव्हा तुम्ही कामावरून घरी येता तेव्हा तुम्हाला सुगंधित वातावरणामुळे ताजेतवाने वाटते.

देवघरात दिवा लावा

तुमच्या देवघरात नियमित दिवा लावावा. यालाच देवघर जागृत ठेवणे म्हणतात. तुम्ही देवाला वेळ द्या किंवा नका देऊ, पण जर तुमच्या देवघरात देवांचे स्थान असेल तर त्याच्यासमोर दिवा लावा, जर दिवसातून एकदा नाही तर किमान सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावावा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ