घरातील टॉयलेट क्लिनरमुळे होईल वीज बिलात 25 टक्के कपात, भन्नाट देशी जुगाड, ते कसं? तुम्हीच पाहा
टॉयलेट क्लिन करण्यासाठी टॉयलेट क्लिनरचा वापर होतो, मात्र आणखी एका पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातील टॉयलेट क्लिनरचा वापर करू शकता, ज्यामुळे तुमच्या घरातील वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते.

आपण टॉयलेट क्लिन करण्यासाठी वेगवेगळ्या क्लिनरचा वापर करतो, टॉयलेट क्लिनरचा वापर केल्यामुळे टॉयलेट क्लिन होतं. मात्र टॉयलेट क्लिनरचा वापर फक्त टॉयलेट क्लिन करण्यासाठीच होत नाही. तर त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या लाईट बिलामध्ये 25 टक्के कपात देखील करू शकता, म्हणजे तुम्ही 25 टक्के वीज वाचू शकता. हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, आणि असं कधी होतं का? असा प्रश्नही तुम्ही विचाराल मात्र एका गृहिणीने या संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. चला तर मग जाऊन घेऊयात टॉयलेट क्लिनरचा वापर करून आपण कशापद्धतीने लाईट बिल कमी करू शकतो. जर तुमच्या घरात सर्वाधिक वीज कोणत्या उपकरणाला लागत असेल ती म्हणजे फ्रिज, फ्रिजमुळे मोठ्या प्रमाणात वीज लागले आणि लाईट बिल देखील प्रचंड येतं. मात्र टॉयलेट क्लिनरच्या एका छोट्या जुगाडाने तुम्ही तुमच्या घरचं लाईट बिल कमी करू शकता.
एका गृहिणीने यासंदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. फ्रिजचा उपयोग अनेक गोष्टींसाठी होतो. फ्रिजमुळे तुमच्या घरातील पदार्थ दीर्घकाळ टिकतात, मात्र आपण दिवसातून अनेकदा फ्रिजचा दरवाजा उघडतो, बंद करतो. त्यामुळे फ्रिजच्या आतील तापमानावर त्याचा परिणाम होतो,त्यामुळे फ्रिज आतील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जास्त वीजेचा वापर करतो, त्यामुळे वीज बिल प्रचंड प्रमाणात येते.
तुम्ही अनेकदा अनुभव घेतला असेल की तुम्ही जेव्हा फ्रिजचा दरवाजा अनेकदा उघडता, बंद करता त्यावेळी तसेच तुमचा फ्रिज जुना झाल्यानंतर त्याचा दरवाजा व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे थंड हवा सारखी बाहेर पडते. फ्रिजच्या कम्प्रेसरवर त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे अधिक ऊर्जा खर्च होते. जेव्हा तुम्ही फ्रिज नवीन खरेदी करता तेव्हा तुम्ही कधी हे पाहिलं आहे का, फ्रिजच्या दरवाज्याला चारही बाजूने असलेली रबराची पट्टी ही थोडीशी फुगरट असते, त्यामुळे दरवाजा पक्का बंद करण्यास मदत होते. मात्र जेव्हा फ्रिज जुना होतो, तेव्हा या पट्टीचा फुगरटपणा कमी होतो, तसेच तिच्यावर घाण देखील साचते, त्यामुळे दरवाजा व्यवस्थित लागत नाही, दरवाजा व्यवस्थित न लागल्यामुळे लाईट बिल जास्त येते. अशावेळी तुम्ही हा रबरी पट्टा जर टॉयलट क्लिनरने धुतला तर तो स्वच्छ होतो, त्याच्यावरील सर्व घाण निघून जाते आणि तुमच्या फ्रिजचा दरवाजा व्यवस्थित लागतो, त्यामुळे वीज बिलात मोठी बचत होते.
डिस्केमर – वरील माहिती ही उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे, या माहितीला टीव्ही 9 कोणताही दुजोरा देत नाही.
