Immunity Booster Foods | इम्युनिटी वाढवतील आहारातील ‘हे’ टॉप 5 घटक, नियमित सेवनाने दूर होईल आजारांची चिंता!

Immunity Booster Foods | इम्युनिटी वाढवतील आहारातील ‘हे’ टॉप 5 घटक, नियमित सेवनाने दूर होईल आजारांची चिंता!
इम्युनिटी बूस्टर फूड

आपल्या घराच्या स्वयंपाकघराततच अशा बर्‍याच गोष्टी आहेत, ज्यांना आपण आपल्या आहाराचा भाग बनवल्यास प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी आपल्याला कोणत्याही सप्लिमेंट गरज भासणार नाही.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jun 04, 2021 | 12:34 PM

मुंबई : कोरोना काळात प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी प्रत्येकजण स्वत:च्या मार्गाने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. काढ्यांपासून पूरक आहार यासाठी लोक बर्‍याच गोष्टी घेत आहेत. परंतु, तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, आपल्या घराच्या स्वयंपाकघराततच अशा बर्‍याच गोष्टी आहेत, ज्यांना आपण आपल्या आहाराचा भाग बनवल्यास प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी आपल्याला कोणत्याही सप्लिमेंट गरज भासणार नाही. चला तर जाणून घेऊया इम्युनिटी वाढवणाऱ्या या टॉप 5 घटकांबद्दल…(Top 5 Immunity Booster Foods you should include in your daily meal)

लिंबू

लिंबूमध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते. उन्हाळ्यात, जर लिंबूपाणी दररोज प्यायले, तर केवळ आपली तहान तृप्त होत नाही, तर शरीरातील टॉक्सिक घटक देखील बाहेर पडतात. लिंबू आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतो आणि शरीराला ऊर्जा देतो. म्हणूनच बरेच लोक सकाळची सुरुवात लिंबाचे पाणी पिऊन करतात. लिंबू, शिकंजी, लिंबू चहा किंवा कोणत्याही खाद्यपदार्थात लिंबू घालून तुम्ही त्याचे सेवन करू शकता.

आले

आयुर्वेदात औषधी म्हणून आल्याचा वापर केला गेला आहे. त्यात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत जे सर्दी-खोकला आणि विषाणूजन्य संक्रमणापासून आपले संरक्षण करतात. आल्यामुळे छातीत अडकलेला कफ देखील बाहेर येऊ शकतो. जर दररोज आल्याचे पाणी प्यायले तर, ते आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. याशिवाय काळ्या मीठासोबत आल्याचा एक छोटा तुकडा चावून खाल्ल्यानंतर पाचन संबंधित समस्या दूर होतात (Top 5 Immunity Booster Foods you should include in your daily meal).

हळदीचे दूध

आता जवळजवळ प्रत्येकजण हळदीच्या दुधाचे फायदे जाणून आहे. कारण कोरोना उपचारादरम्यान रूग्णालयातही रूग्णांच्या आहारात त्याचा समावेश करण्यात आला आहे. हळद अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करते. हळद युक्त दूध नियमितपणे घेतल्यास जळजळ कमी होते, जीवाणू, विषाणू आणि संक्रमणापासून आपले संरक्षण होते. हळदी कर्क्युमिन असते, ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते. दररोज झोपण्यापूर्वी दुधात हळद घालून ते प्यायले पाहिजे. या दुधात चिमूटभर काळी मिरी घालल्यास त्याचे फायदे अनेक पटीने वाढतात.

लसूण

लसूण खरोखरच शक्तिशाली अँटी-व्हायरल गुणधर्मांनी भरलेला आहे. दररोज त्याचे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. तसेच, शरीरास संक्रमणाविरूद्ध लढायला मदत होते. आपण दररोज दोन पाकळ्या लसूण गरम पाण्यासोबत सेवन करू शकता. या व्यतिरिक्त आपण त्यास आपल्या आहाराचा एक भाग बनवू शकता. सकाळी रिकाम्या पोटी लसूण सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते.

काळे चणे

आपली प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी चणा हा एक चांगला पर्याय असू शकतो. काळे चणे हे हाय प्रोटीन फूड मानले जाते. आठवड्यातून 2 ते 3 वेळा काळे चणे खाल्ल्यास शरीराला व्हिटामिन सी, बी, के, बीटा कॅरोटीन आणि मॅंगनीजसारख्या सर्व आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात. चणे शरीरासाठी अतिशय चांगले आहेत. रिकाम्या पोटी सकाळी भिजवलेले चणे खाल्ल्याने केवळ रोगप्रतिकार शक्तीच बळकट होते असे नाही, तर पाचनशक्ती देखील सुधारते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Top 5 Immunity Booster Foods you should include in your daily meal)

हेही वाचा :

Teeth Whitening Tips : ‘हे’ घरगुती उपाय दातांचा पिवळेपणा काही मिनिटात दूर करतील !

वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी प्या ‘हे’ खास पेय, झटपट वजन कमी होईल!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें