Teeth Whitening Tips : ‘हे’ घरगुती उपाय दातांचा पिवळेपणा काही मिनिटात दूर करतील !

पिवळे दात कोणालाही आवडत नाहीत. दातांचा दातांचा पिवळेपणा काढण्यासाठी आपण डेंटीस्टकडे जातो किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल्स आणि पेस्टचा आधार घेतो.

Teeth Whitening Tips : 'हे' घरगुती उपाय दातांचा पिवळेपणा काही मिनिटात दूर करतील !
दात
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 10:25 AM

मुंबई : पिवळे दात कोणालाही आवडत नाहीत. दातांचा पिवळेपणा काढण्यासाठी आपण डेंटीस्टकडे जातो किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल्स आणि पेस्टचा आधार घेतो. मात्र, यातील रसायनांनमुळे आपल्या दातांची हानी देखील होऊ शकते. अशावेळी दातांचा हा पिवळेपणा दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील ट्राय करू शकता. आज आम्ही दातांचा पिवळेपणा काढण्यासाठी खास 5 टिप्स सांगणार आहोत. (Special tips to eliminate yellowing of teeth)

नारळ तेल

आपण दात स्वच्छ करण्यासाठी नारळ तेल वापरू शकता. पाच मिनिटांसाठी पिवळ्या दातांवर नारळाचे लावा. या व्यतिरिक्त आपण आपल्या टूथब्रशमध्ये काही थेंब नारळाचे तेल टाका आणि ब्रश करा. यानंतर तोंड धुवा. हे जर आपण दररोज केले तर लवकरच आपल्या दातांवरील पिवळेपणा दूर होईल.

लिंबाची साल

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट असतात आणि लिंबाच्या सालामुळे आपले दात स्वच्छ होऊ शकतात. आपल्या दातांवर लिंबाची साल चोळा आणि नंतर स्वच्छ धुवा. तसेच लिंबाच्या सालीचे पावडर तयार करा आणि दातांवर लावा. यामुळे देखील दातांचा पिवळेपणा दूर होईल.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी दातांवरील पिवळेपणा काढण्यासाठी फायदेशीर आहे. आपल्या दातांवर स्ट्रॉबेरी घासल्याने दात नैसर्गिकरित्या पांढरे होतात, कारण त्यात बरेच फायदेशीर अँटिऑक्सिडेंट्स आहेत. यामुळे दात पिवळसरपणा दूर होण्यास मदत होते.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण तयार करुन, त्याची व्यवस्थित पेस्ट बनवा. ही पेस्ट टूथब्रशवर घेऊन, त्याने नेहमीप्रमाणे दात घासा. यामुळे केवळ काही मिनिटांतच आपले दात मोत्यासारखे चमकदार होतील.

केळीचा साल

केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मॅगनीझ असते. हे घटक ब्लिचिंग एजंट असल्यामुळे आपल्या दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केळ्याची साल उपयोगी पडते. म्हणून केळी खाल्ल्यानंतर त्याची साल न फेकता, ती साल आपण आपल्या दातांवर घासू शकता. आठवड्यातून किमान 2 वेळा हा उपाय केल्यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

(Special tips to eliminate yellowing of teeth)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.