AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hotel Check In Time: अनेक हॉटेल्सच्या चेक-इनची वेळ दुपारी 12 वाजताच का असते?

Hotel Check In Time: प्रत्येक हॉटेलचे नियम हे वेगळे असतात. काही हॉटेल्स असे देखील असतात, जेचे चेक इनची वेळ दुपारी 12 वाजताच असते... तर यामागे काय कारण आहे जाणून घ्या...

Hotel Check In Time: अनेक हॉटेल्सच्या चेक-इनची वेळ दुपारी 12 वाजताच का असते?
| Updated on: Oct 06, 2026 | 3:11 PM
Share

Hotel Check In Time: कुठेही बाहेर जाण्याची वेळ आली की, सर्वात आधी आपण हॉटेल बूक करतो. अशात ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपण सर्वात आधी हॉटेलमध्ये चेक-इन करतो. पण अनेक हॉटेलमध्ये चेक-इनची वेळ वेगळी असते. तर चेक-आउटची वेळ जवळपास सकाळी 11 ते दुपारी 12 च्या दरम्यान ठेवली जाते. पण या नियमासाठी नेमकी दुपारी 12 हीच वेळ का निवडली गेली? हा केवळ हॉटेलचा नियम आहे, की यामागे काही विशेष व्यावसायिक हिशोब दडलेला आहे? यामागे काही अत्यंत विशिष्ट कारणं आणि हॉटेल व्यवसायाची धोरणं आहेत. तर जाणून घ्या कोणती आहेत ती कारणं…

हॉटेल उद्योगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘टर्नओव्हर टाइम’. आधीचे पाहुणे सहसा सकाळी 11 वाजेपर्यंत खोली रिकामी करतात. त्यानंतर, नवीन पाहुणे येण्यापूर्वी, हाऊसकीपिंग टीमला संपूर्ण खोलीची सखोल स्वच्छता करावी लागते, बेडशीट आणि टॉवेल बदलावे लागतात. सर्व आवश्यक वस्तूंची मांडणी करावी लागते. पुढच्या पाहुण्यांसाठी एक परिपूर्ण आणि व्यवस्थित खोली तयार करायला किमान 2 ते 3 तास ​​लागतात. म्हणूनच चेक-इन आणि चेक-आउटच्या मध्ये हा वेळ ठेवला जातो.

हॉटेल व्यवसाय हा एक जागतिक उद्योग आहे. जगातील बहुतेक देशांमध्ये वेळेची ही विशिष्ट गणना किंवा मानक पाळलं जातं. दुपारचे 12 वाजले आहेत असं मानलं जातं, जेणेकरून वेगवेगळ्या देशांतून किंवा शहरांतून विमानाने येणारे प्रवासी त्यांच्या प्रवासाच्या वेळा सहज जुळवू शकतील. हा आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रणालीचा एक जुना नियम आहे.

हॉटेल्स सहसा त्यांच्या 24 तासांचं नियोजन अशा प्रकारे करतात की, त्यांच्या व्यवसायाचं नुकसान होऊ नये. जर तुम्हाला सकाळी किंवा पहाटे चेक-इन करायचे असेल, तर हॉटेल प्रशासन कधीकधी अतिरिक्त शुल्क म्हणजेअर्ली चेक-इन फी आकारू शकतं. कारण जरी ती खोली आदल्या रात्रीपासून रिकामी असली तरी, पुढील 24 तासांसाठी तिचा समावेश आदल्या दिवसाच्या बुकिंगमध्येच केला जातो.

मात्र, अनेक बुटीक हॉटेल्स किंवा रिसॉर्ट्स आता त्यांच्या ग्राहकांच्या सोयीचा विचार करून ‘फ्लेक्सिबल चेक-इन’ किंवा 24 तास चेक-इन धोरणं सादर करत आहेत. पण हा दुपारी 12 चा नियम पारंपरिक आणि मोठ्या हॉटेल चेन्सनाही तितकाच लागू आहे. म्हणून, पुढच्या वेळी बुकिंग करताना हे लक्षात ठेवा!

Follow Us
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा...
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा गंभीर आरोप
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय घडलं?
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय काय घडलं?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
India Alliance Morcha: दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल, पुढे म्हणाले....
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसचा पराभव...
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसच्या पराभवांचा इतिहास सांगत उपस्थित केला सवाल!
एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार...
Mumbai : एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार; मुंबईत राजकीय वातावरण तापलं
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची दिल्ली पोलिसांसोबत चर्चा सुरु
India Alliance Morcha : राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची दिल्ली पोलिसांसोबत चर्चा सुरु
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; राहुल गांधींसह....
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; इंडिया आघाडीचा मोर्चा अन् राहुल गांधींसह अनेक खासदार ताब्यात
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिस...
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं