AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यातील ही पाच स्थळे नाही पाहिली तर काय पाहिलं?; पर्यटकांनो, एकदा येऊन तर पाहा…

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यात पर्यटनासाठी अनेक महत्त्वाची ठिकाणे आहेत. हल्लीच्या काळात मुंबई बघायला येणारा पर्यटक ठाण्यात आल्याशिवाय राहत नाही. ठाण्यातील पर्यटन स्थळं निसर्ग रम्य आहेत. अनोखे आहेत. त्यामुळे या ठिकाणी एकदा तरी यायलाच पाहिजे.

ठाण्यातील ही पाच स्थळे नाही पाहिली तर काय पाहिलं?; पर्यटकांनो, एकदा येऊन तर पाहा...
upvan lakeImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 09, 2025 | 3:46 PM
Share

मुंबईत बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहे. मुंभई ही स्वप्न नगरी असल्याने या शहरात असंख्य अशा गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. इथला बॉलिवूड असेल गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, जुहू बीच, पवई तलाव आणि अनेक अन्य सुंदर ठिकाणे या शहराच्या आकर्षणांचा भाग आहेत. त्यामुळे या शहरात आलेला व्यक्ती इथल्या जादूई वातावरणात हरवून जातो. मुंबई तर आहेच, पण ठाण्यातही पाहण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत. ठाणे हे सुद्धा आता पर्यटकांचं दुसरं घर झालं आहे. तलावांचं शहर म्हणूनही ठाण्याची ओळख आहे. प्राचीन मंदिरे आणि किल्ले, उद्याने आणि पर्वतरांगा यामुळे ठाण्याच्या वैभवात भर पडली आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोड मुंबईजवळ एक दिवसाच्या सफरीसाठी एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. या रस्त्याच्या एका बाजूला हिरवाईने भरलेला परिसर आहे, तर दुसऱ्या बाजूला एक सुंदर खाडी आहे. या खाडीत तुम्हाला बोटिंगचा आनंदही घेता येऊ शकतं. म्हणूनच, जर तुम्हाला मुंबईच्या गर्दीपासून थोडा ब्रेक हवा असेल आणि मुंबईच्या वेगळ्या पैलूची शोध घेत असाल, तर ठाण्यातील प्रवासासाठी सर्वोत्तम ठिकाणे तुम्हाला आवडतील. आम्ही ठाण्यातील पाच महत्त्वाची ठिकाणं सांगणार आहोत. तुम्ही जर ती पाहिली नसतील तर काय पाहिले?

येऊर हिल्स

तुम्हाला ठाण्यात एक नवीन साहसी अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्हाला येऊर पर्वतावर ट्रेकिंग करायला हवे. या मार्गावर ट्रेकिंग करणे सोपे आहे, त्यामुळे तुम्ही सहजपणे येऊर पर्वताच्या शिखरावर पोहोचू शकता. ट्रेकिंग आवडत नसेल तरीही येथे येण्यास हरकत नाही. कारण इथला परिसर अत्यंत शांत आहे. तसेच या ठिकाणचं सौंदर्यही अप्रतिम आहे. येऊर पर्वत ठाण्यापासून फक्त 7 किमी अंतरावर आहे, त्यामुळे तुम्ही सार्वजनिक वाहतूक किंवा तुमच्या स्वतःच्या वाहनाने सहजपणे इथे पोहोचू शकता.

उपवन तलाव

उपवन तलावाला शहराच्या सर्वात रोमँटिक तलावांपैकी एक मानले जाते. या तलावाभोवती हिरवाई आणि संथ वाहणारं पाणी आहे. उपवन तलाव हे पर्यावरणास अनुकूल असलेले तलाव आहे आणि ते येऊर पर्वताच्या पायथ्याशी आहे. हे ठाण्याचे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.

द वॉक हिरानंदानी एस्टेट

द वॉक भारताचे पहिले टेकडीवरचे निवासी स्थान आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला कॅफे, रेस्टॉरंट, सुपरमार्केट आणि अनेक सुविधांची रेलचेल आहे. या ठिकाणी तुम्ही ओपन-एअर शॉपिंग मॉलचा अनुभव घेऊ शकता.

गायमुख चौपाटी

गायमुख चौपाटी, ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील रहिवाशांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तटाच्या हिरवळीने नेहमीच गायमुख क्रीकच्या आकर्षणाकडे पर्यटकांना आकर्षित केले आहे.

जगन्नाथ महादेव मंदिर

चौपाटीच्या समोर एका डोंगरावर स्थित असलेले हे मंदिर पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे. कालीबारी मंदिर देखील ठाण्याच्या पूर्व उपनगरांतील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.