IRCTC Package: कान्हा, जबलपूरला फिरायला जाण्याचा प्लॅन करताय?, हे टूर पॅकेज एकदम बेस्ट

IRCTC Tour packages : जर तुम्ही कान्हाला भेट देण्याचा विचार करत असाल तर IRCTC ने एक विशेष ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये तुम्ही रायपूरहून अनेक शहरांमध्ये जाऊ शकता.

IRCTC Package: कान्हा, जबलपूरला फिरायला जाण्याचा प्लॅन करताय?, हे टूर पॅकेज एकदम बेस्ट
वाघ

IRCTC Package:  तुम्ही केवळ IRCTC कडून तिकिटेच बुक करू शकत नाही, तर IRCTC तुमच्यासाठी वेगवेगळे टूर पॅकेजेस घेऊन येते. या पॅकेजमध्ये तुम्हाला फक्त एकदाच पैसे जमा करावे लागतील आणि त्यानंतर तुमच्या राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था कंपनीने केली आहे. IRCTC आता कान्हाला भेट देऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी अनेक पॅकेजेस घेऊन आले आहेत. यासह, तुम्ही वेगवेगळ्या बजेटनुसार तुमची योजना निवडू शकता.

अशा परिस्थितीत जाणून घ्या IRCTC च्या किती योजना आहेत आणि या योजनांमध्ये कोणत्या सुविधा दिल्या जात आहेत. तसेच, हा दौरा कुठून सुरु होतो आणि या पॅकेजेसची किंमत किती आहे… जाणून घ्या …

कान्हा जंगल टूर

ही टूर 2 रात्री आणि 3 दिवसांची आहे. ज्यामध्ये रायपूरहून रायपूरवरुन कान्हा आणि नंतर आणि कान्हामध्ये एक रात्र राहण्याची व्यवस्था केली जाईल. या पॅकेजमध्ये दोन लोकांच्या बुकिंगसाठी 11400 रुपये आणि तीन लोकांच्या बुकिंगसाठी 8350 रुपये खर्च करावे लागतील.

रायपूर कान्हा हॉलिडे पॅकेज

हे पॅकेज 3 रात्री आणि 4 दिवसांसाठी आहे. पॅकेज ट्रिप रायपूरपासून सुरू होईल आणि नंतर तुम्हाला कान्हाला घेऊन रिसॉर्टवर थांबेल. यानंतर सफारी केली जाईल आणि रिसॉर्टमध्ये अनेक प्रकारच्या ट्रिप केल्या जातील. यानंतर रायपूर देखील फिरवले जाईल. या प्रवासासाठी, दोन लोकांसाठी एका व्यक्तीच्या हिशेबानुसार 15350 रुपये आणि तीन व्यक्तींच्या बुकिंगसाठी एका जणाला 11300 रुपये खर्च करावे लागतील.

कान्हा वाईल्ड लाइफ टूर

हा दौरा 3 रात्री आणि 4 दिवसांचा आहे. ही ट्रिप दर गुरुवारी असते. या दौऱ्यात तुम्हाला रायपूर, कान्हा तसेच जबलपूर येथे नेले जाईल. या सहलीसाठी तुम्हाला दोन व्यक्तींच्या बुकिंगवर एका व्यक्तीसाठी 16900 रुपये खर्च करावे लागतील आणि त्याचवेळी तीन लोकांच्या बुकिंगवर तुम्हाला 12200 रुपये प्रति व्यक्ती खर्च करावे लागतील.

छत्तीसगड टूर

ही टूर 5 रात्री आणि 6 दिवसांचा असेल. या प्रवासात रायपूर, जगदलपूर- चित्रकोट वगैरे फिरवले जाईल. यामध्ये, तुमच्या राहण्याची व्यवस्था देखील IRCTC द्वारे केली जाईल. या ट्रिपमध्ये, जर तुम्ही दोन लोकांसाठी बुक केले तर तुम्हाला एका व्यक्तीसाठी 22850 रुपये आणि एका व्यक्तीनुसार तीन लोकांच्या बुकिंगसाठी 16800 रुपये खर्च करावे लागतील.

(IRCTC Tour packages Visit kanha Jabalpur And many Cities Check hre All details)

हे ही वाचा :

कन्याकुमारी, रामेश्वरमसह आणखी 6 शहरांत फिरण्याची संधी, जाणून घ्या IRCTC च्या टूर पॅकेजबाबत

तुम्हाला हिमालयात कॅम्पिंगला जायचे आहे का? जाणून घ्या तेथील काही उत्तम ठिकाणे

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI